ETV Bharat / entertainment

वरुण धवनच्या 'दुल्हनिया 3'मध्ये जान्हवी कपूरनं घेतली आलिया भट्टची जागा - आलिया भट्ट

Dulhaniya 3 Update: अभिनेता वरुण धवन आणि आलिया भट्टची जोडी 'दुल्हनिया' फ्रँचायझीमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार नाही. 'दुल्हनिया' फ्रँचायझीत आता आलिया ऐवजी जान्हवी कपूर दिसेल.

Dulhaniya 3 Update
दुल्हनिया 3 अपडेट
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 4, 2024, 5:45 PM IST

मुंबई - Dulhaniya 3 Update: अभिनेता वरुण धवन आणि आलिया भट्टची जोडी 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' आणि 'बद्रीनाथ की दुल्हनिया' या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये दिसली होती. दरम्यान, दोघांच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. आलिया भट्ट या फ्रँचायझीच्या तिसऱ्या भागामध्ये दिसणार नसल्याचं आता सांगण्यात येत आहे. 'दुल्हनिया 3' चित्रपटाच्या तिसऱ्या भागात अभिनेत्री जान्हवी कपूर दिसेल. जान्हवी या फ्रँचायझीची नवी 'वधू' असेल. आलिया या हिट फ्रँचायझीमध्ये का परतत नाही याबद्दलचं कारण सध्या समोर आलेलं नाही. कदाचित तिच्या व्यग्र शेड्यूलमुळं तिनं हा चित्रपट नाकारला असेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

जान्हवी आलियाची घेतली जागा : वरुण आणि जान्हवी गेल्या वर्षी 'बवाल'नंतर पुन्हा एकत्र 'दुल्हनिया 3'मध्ये दिसणार आहेत. दिग्दर्शक शशांक खेतान 'दुल्हनिया 3'चे दिग्दर्शन करत आहे. या चित्रपटामध्ये यावेळी प्रेक्षकांना वेगळी पात्र पाहायला मिळतील. यासोबतच या चित्रपटाच्या मागील दोन चित्रपटांशी कोणताही संबंध नसणार असल्याचं समजत आहे. हा चित्रपट नव्यानं तयार केला जाणार आहे. 'दुल्हनिया 3'चे प्री-प्रॉडक्शन सुरू झाले असून येत्या काही महिन्यांत या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे. धर्मा प्रॉडक्शन आणि करण जोहर यांनी अद्याप या रिपोर्टवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

'कॉफी विथ करण'मध्ये हिंट दिली गेली : 'कॉफी विथ करण सीझन 8' च्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये करणनं जान्हवीला छेडल्यानंतर तिच्या हातात एक मोठा प्रोजेक्ट असल्याचा खुलासा केला होता, मात्र तिला याबद्दल बोलण्याची परवानगी नाही, असं सांगण्यात आलं होत. वरुण आणि जान्हवीचे आणखी काही चित्रपट यावर्षी येणार आहेत, हा देखील यावेळी खुलासा केला गेला. वरुण अ‍ॅटलीसोबत 'वीडी 18' मध्ये व्यग्र आहे. त्याचा सामंथा रुथ प्रभूसोबत 'सिटाडेल' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. तर जान्हवीकडे सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि टायगर श्रॉफसोबतचा एक चित्रपट आहे. सध्या या चित्रपटाबाबत माहिती समोर यायची आहे. याशिवाय जान्हवी कपूर ज्युनियर एनटीआरसोबत 'देवरा' या चित्रपटामध्ये दिसेल.

हेही वाचा :

  1. रणबीर कपूर आणि रोहित शेट्टी एकत्र, व्हायरल फोटोनंतर चर्चेला उधाण
  2. 'टॉक्सिक'मध्ये साऊथ सुपरस्टार यशसोबत करणार स्क्रिन शेअर करीना कपूर खान
  3. प्रीटी झिंटानं पती जीन गुडनॉफसोबत केला फोटो शेअर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.