ETV Bharat / entertainment

Jaane Jaan trailer out: करीना कपूर स्टारर 'जाने जान'चा ट्रेलर रिलीज.... - जाने जान

Jaane Jaan trailer out : करीना कपूरचा आगामी चित्रपट 'जाने जान'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये करीना कपूरचा नवा इंटेन्स लूक समोर आला आहे. 'जाने जान' चित्रपटामध्ये विजय वर्मा जयदीप अहलावत हे कलाकार देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Jaane Jaan trailer out
जाने जानचा ट्रेलर रिलीज
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 5, 2023, 4:18 PM IST

मुंबई Jaane Jaan trailer out : बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर खान अनेक दिवसांपासून मोठ्या पडद्यावर झळकत आहे. दरम्यान आता करीनाने ओटीटीवर पदार्पण केले आहे. सुजॉय घोषच्या 'जाने जान' या चित्रपटातून करीना सर्वांना आश्चर्यचकित करण्यासाठी येत आहे. नुकताच करीनाच्या 'जाने जान' चित्रपटाचा ट्रेलर हा प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सुरुवातीला करीना कपूर दिसत आहे. हा ट्रेलर पाहिल्यानंतर जी कहाणी समोर येते ती खूपच रंजक आहे. या चित्रपटामध्ये करीनाला एक व्यक्ती मारताना दिसत आहे. तसंच करीना स्वत:ला वाचवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. 'जाने जान'च्या ट्रेलरमध्ये करीना अनेकदा स्वत:ला वाचविताना दिसत आहे.

'जाने जान'चा ट्रेलर : करीनाशिवाय या चित्रपटातील दोन पात्रे खूप विशेष आहेत. करीनाच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीची भूमिका जयदीप अहलावतने केली आहे. याशिवाय या चित्रपटामध्ये दुसरे महत्त्वाचे पात्र विजय वर्माने साकारले आहे. या चित्रपटामध्ये तो पोलिसाच्या भूमिकेत झळकणार आहे. या ट्रेलरमध्ये विजय वर्मा हा एका हत्येचं गूढ उकलण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहेत. खुनाचे सत्य बाहेर येण्यापासून रोखण्यासाठी करीना या दोघांनाही तिच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवताना दिसत आहे. याशिवाय या चित्रपटामध्ये करीनाने किसिंग सीनही दिला आहेत. ट्रेलरच्या शेवटी करीना विजय वर्माला किस करताना दिसत आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

नेटफ्लिक्सवर होणार प्रदर्शित : 21 सप्टेंबरला करीनाचा 'जाने जान' हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. करीनाचे चाहते या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत. कारण याआधी करीना रुपेरी पडद्यावर अशी भूमिका साकारताना दिसली नाही. चित्रपटात जयदीप अहलावतचा लूकही खूप बदललेला दिसत आहे. या चित्रपटाची निर्मिती एकता कपूरने केली आहे. हा चित्रपट केगो हिगाशिनोच्या 2005 च्या जपानी कादंबरी 'द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स'पासून प्रेरीत आहे. 'जाने जान' व्यतिरिक्त करीना कपूर 'द क्रू' मध्ये दिसणार आहे. रिया कपूर आणि एकता कपूर निर्मित 'द क्रू'मध्ये करीना ही क्रिती सेनॉन आणि तब्बूसोबत दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. Vijay Deverakonda : विजय देवरकोंडा आपल्या 'खुशी'च्या कमाईतील 1 कोटी रुपये करणार दान...
  2. Shah Rukh Khan Tirupati : 'जवान' चित्रपट रिलीज होण्यापूर्वी शाहरुख खान तिरुपती मंदिरात...
  3. Dono trailer out: 'दोनो' चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.