मुंबई : बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवालचा (Vidyut Jammwal) आगामी चित्रपट आयबी 71 (IB 71) हा लकरच सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत होते. हा चित्रपट १२ मे प्रदर्शित होणार असून या चित्रपटाची विद्युतने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउट या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. अभिनेता विद्युत जामवाल यांनी यापुर्वी कमांडो चित्रपटात एका कमांडोची भूमिका सादर केली होती या चित्रपटात देखील तो इंटेलिजन्स ब्युरो ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
सत्य घटनेवर आधारित : या चित्रपटात विद्युतची अॅक्शन फाईट प्रेक्षकांना बघायला मिळेल. या चित्रपटाचे कथानक हे सत्य घटनेवर आधारित आहे असे म्हटल्या जात आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन संकल्प रेड्डी यांनी केले आहे. मीडियाशी बोलतांना विद्युतने सांगितले की, तो युद्धकथा ऐकत मोठा झाला आहे. तो पुढे म्हणाला, 'माझा संगोपन अशा वातावरणात झाला आहे जिथे आम्हाला सेवा देणार्या लोकांना सांगण्यासाठी कथा होत्या. त्या सर्वांनी असे काहीतरी केले होते जे करण्याची क्षमता फार कमी लोकांकडे होती, अगदी स्वयंपाक्यानेही लढाई लढली होती, ती व्यक्ती जो तुम्हाला तुमच्या घरातील सामान हलवण्यात मदत करत होता तो देखील एका लढाईचा भाग होता. ज्यांनी देशाची सेवा केली त्यांच्याबद्दल मला खूप आदर आहे
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
इंटेलिजन्स ब्युरो : 'पुढे त्याने सांगितले, जेव्हा तुम्ही एखाद्या चित्रपटाचा भाग असता आणि तुम्ही ज्या वातावरणात वाढलात, त्या वातावरणा सारखा असणाऱ्या चित्रपटात काम करणे हे अवघड नसते असं विद्युतने यावेळी म्हटलं. या चित्रपटांमधील मृत्यू-परिभाषित अॅक्शन सीक्वेन्स इंटेलिजन्स ब्युरो त्याच्यासाठी खास का आहे हेही विद्युतने शेअर केले. इंटेलिजन्स ब्युरो माझ्यासाठी खास आहे कारण आम्ही फक्त त्यांच्याबद्दल ऐकतो, आम्ही त्यांना कधीच भेटत नाही. आम्हाला या मुलांबद्दल सत्य कधीच कळत नाही. त्या वातावरणात राहणे हा वेगळा आणि उत्तम अनुभव आहे असं त्याने सांगितले.
हेही वाचा : The Kerala Story in Kochi : कोचीमध्ये 'द केरळ स्टोरी'चे शो रद्द, फक्त एकाच चित्रपटगृहात सिनेमा रिलीज