मुंबई - बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल लवकरच दाक्षिणात्य चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहे. दिग्गज स्टार नंदामुरी बालकृष्णाच्या आगामी तेलुगू चित्रपटात तो भूमिका साकारेल. अभिनेता नंदामुरी बालकृष्णा हे सुपरस्टार एनटीआर यांचा मुलगा असून तेलुगू फिल्म इंडस्ट्रीचा सुपरस्टार आहे. बालकृष्णाची प्रचंड लोकप्रियता असून तो भन्नाट अॅक्शन्स सिक्वेन्ससाठी ओळखला जोता. या चित्रपटाचे शीर्षक अद्याप ठरले नसून 'एनबीके 108' असे तात्पुरते शीर्षक घेऊन या चित्रपटाचे दिग्दर्शन अनिल रविपुडी करत आहेत.
-
Team #NBK108 welcomes the talented National Award winning actor @rampalarjun on board as the antagonist in his Telugu debut ❤️🔥❤️🔥
— Shine Screens (@Shine_Screens) May 10, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
- https://t.co/pbHr4ChSAr
NataSimham #NandamuriBalakrishna @AnilRavipudi @MsKajalAggarwal @sreeleela14 @MusicThaman @sahugarapati7 @harish_peddi… pic.twitter.com/3Lqvy7XD9r
">Team #NBK108 welcomes the talented National Award winning actor @rampalarjun on board as the antagonist in his Telugu debut ❤️🔥❤️🔥
— Shine Screens (@Shine_Screens) May 10, 2023
- https://t.co/pbHr4ChSAr
NataSimham #NandamuriBalakrishna @AnilRavipudi @MsKajalAggarwal @sreeleela14 @MusicThaman @sahugarapati7 @harish_peddi… pic.twitter.com/3Lqvy7XD9rTeam #NBK108 welcomes the talented National Award winning actor @rampalarjun on board as the antagonist in his Telugu debut ❤️🔥❤️🔥
— Shine Screens (@Shine_Screens) May 10, 2023
- https://t.co/pbHr4ChSAr
NataSimham #NandamuriBalakrishna @AnilRavipudi @MsKajalAggarwal @sreeleela14 @MusicThaman @sahugarapati7 @harish_peddi… pic.twitter.com/3Lqvy7XD9r
खलनायकाच्या भूमिकेत अर्जुन रामपाल - फिल्म प्रॉडक्शन बॅनर शाइन स्क्रीन्सने त्यांच्या अधिकृत ट्विटरवर अर्जुन रामपालच्या कास्टिंगबद्दलची बातमी शेअर केली. टीम एनबीके 108 प्रतिभावान राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेता अर्जुन रामपालचे स्वागत करते. अर्जुन रामपाल हा त्याच्या तेलगू पदार्पणात खलनायकाची भूमिका साकारणार असल्याचे ट्विटमध्ये म्हटलंय. ओम शांती ओम आणि रा.वन सारख्या हिंदी चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या अर्जुन रामपालने सांगितले की, तो बालकृष्णासोबत चित्रपटात काम करण्यास उत्सुक आहे. आपल्याला त्यांनी यासाठी निवडलंय, त्यामुळे खूप उत्साहित आहे व काम करायला खूप मजा येईल असेही त्याने म्हटलंय.
-
Thank you for having me. Super excited. It’s gonna be mad fun 🤩
— arjun rampal (@rampalarjun) May 10, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Team #NBK108 welcomes the talented National Award winning actor @rampalarjun on board as the antagonist 💥
- https://t.co/bxg0qjtC3H
NataSimham #NandamuriBalakrishna @AnilRavipudi @MsKajalAggarwal @sreeleela14… pic.twitter.com/aqcodFLA2z
">Thank you for having me. Super excited. It’s gonna be mad fun 🤩
— arjun rampal (@rampalarjun) May 10, 2023
Team #NBK108 welcomes the talented National Award winning actor @rampalarjun on board as the antagonist 💥
- https://t.co/bxg0qjtC3H
NataSimham #NandamuriBalakrishna @AnilRavipudi @MsKajalAggarwal @sreeleela14… pic.twitter.com/aqcodFLA2zThank you for having me. Super excited. It’s gonna be mad fun 🤩
— arjun rampal (@rampalarjun) May 10, 2023
Team #NBK108 welcomes the talented National Award winning actor @rampalarjun on board as the antagonist 💥
- https://t.co/bxg0qjtC3H
NataSimham #NandamuriBalakrishna @AnilRavipudi @MsKajalAggarwal @sreeleela14… pic.twitter.com/aqcodFLA2z
बालकृष्ण आणि अनिल रविपुडी एकत्र - या चित्रपटात बालकृष्णाची समुहांना आकर्षित करण्याची अनोखी स्टाईल आणि अनिल रविपुडी यांची प्रोफेशनल दिग्दर्शनाची यशस्वी स्टाईल यांचा संगम यात पाहायला मिळू शकतो. या आगामी चित्रपटाची निर्मिती साहू गरपती आणि हरीश पेड्डी यांनी शाईन स्क्रीन्सच्या बॅनरखाली मोठ्या प्रमाणावर केली आहे. मार्चमध्ये, निर्मात्यांनी तेलगू नववर्ष म्हणून साजरे होणाऱ्या उगादी सणाच्या निमित्ताने चित्रपटातील अभिनेता बालकृष्णाच्या पहिल्या लूकचे अनावरण केले होते.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
कोण आहे सुपरस्टार बालकृष्ण ? - अभिनेता बालकृष्ण हे अभिनयासोबत राजकारणातही सक्रिय असलेले नाव आहे. संयुक्त आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एनटी रामाराव यांचे ते पुत्र आहेत व चंद्रा बाबू नायडू यांचे मेव्हणे आहेत. अलिकडेच एनटीआर यांच्या कार्यक्रमासाठी सुपरस्टार रजनीकांतने हजेरी लावली होती. लाखो लोकांच्या उपस्थित पार पडलेल्या या कार्यक्रमाचे आयोजन बालकृष्ण यांनी केले होते. बालकृष्ण यांनी लिजेंड, सिम्हा, नरसिंह नायडू, श्री रामा राज्यम आणि आदित्य 369 सारखे चित्रपट केले आहेत.
हेही वाचा - Adipurush : आदिपुरुषांसाठी प्रभासने घेतली कठोर मेहनत