ETV Bharat / entertainment

Main Atal Hoon : 'मैं अटल हूं' या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण; पंकज त्रिपाठीने शेअर केला अनुभव... - पंकज त्रिपाठीने शेअर केला अनुभव

अभिनेता पंकज त्रिपाठीने आगामी चित्रपट 'मैं अटल हूं'चे शूटिंग पूर्ण केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रवी जाधव यांनी केले आहे. तसेच या चित्रपटाशी संबंधित एक व्हिडिओ पंकज त्रिपाठीने पोस्ट केला आहे.

Main Atal Hoon
मैं अटल हूं
author img

By

Published : Jul 15, 2023, 6:26 PM IST

मुंबई : बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठी हा त्याच्या आगामी 'मैं अटल हूं' या पॉलिटिकल चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. या चित्रपटात पंकज हा माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटावर बऱ्याच दिवसांपासून काम सुरू होते. आता १५ जुलै रोजी या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. या चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती ही पंकज त्रिपाठी आणि चित्रपट निर्मात्यांनी दिली आहे. तसेच या चित्रपटामधील व्हिडिओदेखील सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये पंकज हा अटल बिहारी वाजपेयींच्या भूमिकेत शूटिंग करताना दिसत आहेत. या लूकमध्ये तो फार वेगळा दिसत आहे. या लूकमध्ये त्याला ओळखणे फार कठीण आहे. या चित्रपटात पंकज हा आपल्या वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

पंकज त्रिपाठीने केली पोस्ट : पंकजने शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती देताना लिहिले, हा 'अटल' प्रवास सदैव संस्मरणीय राहील! 'श्री अटलबिहारी वाजपेयी' सारख्या महान व्यक्तिमत्वाच्या व्यक्तिचा पैलू मोठ्या पडद्यावर साकारण्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो.

'मैं अटल हूं' बाबत जाणून घ्या : 'मैं अटल हूं' या चित्रपटाचे दिग्दर्शन रवी जाधव यांनी केले असून चित्रपटाचे लेखन ऋषी विरमानी यांनी केले आहे. या चित्रपटाच्या लखनऊ शूट दरम्यान, चित्रपट निर्मात्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली आणि चित्रपटाबाबत खूप चर्चा केली. १५ जुलै रोजी या चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाली असून या चित्रपटात अटलबिहारी वाजपेयीबाबत अनेक गोष्टी रूपेरी पडद्यावर आपल्याला पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे फायनल शूट आज मुंबईत पूर्ण झाले. हा चित्रपट ४५ दिवसांत पूर्ण झाला आहे. या चित्रपटाची शूटिंग मुंबई, दिल्ली, कानपूर आणि लखनऊ याठिकाणी झाली आहे.

अटलबिहारी वाजपेयी यांचे बालपण आणि राजकीय प्रवास: या चित्रपटात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे बालपण आणि राजकीय प्रवासबद्दल दाखविले जाणार आहे. हा चित्रपट रूपेरी पडद्यावर कधी दाखल होणार याबाबत निर्मात्यांनी अद्याप माहिती दिलेली नाही. हा चित्रपट भानुशाली स्टुडिओ लिमिटेड आणि लिजेंड स्टुडिओज प्रोडक्शन अंतर्गत तयार करण्यात आला आहे. विनोद भानुशाली, संदीप सिंग, सॅम खान आणि कमलेश भानुशाली हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.

हेही वाचा :

  1. Rohit Shetty on Cirkus failure : 'सर्कस'च्या अपयशाची रोहित शेट्टीने स्वीकारली जबाबदारी , केले धक्कादायक खुलासे
  2. MI 7 Collection Day 3 : टॉम क्रूझ स्टारर 'मिशन इम्पॉसिबल ७' ची भारतात बाजी, जगभरात तुफान कमाई सुरूच
  3. Vicky Kaushal and Katrina Kaif : वाढदिवस साजरा करण्यासाठी विक्की कौशल पत्नी कतरिना कैफसह निघाला परदेशी...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.