ETV Bharat / entertainment

Nora Fateh in hindi movies : आयटम सॉंग्स स्पेशलिस्ट नोरा फतेही आता दिसणार नायिकेच्या भूमिकेत... - हिंदी चित्रपटाची नायिका

अप्रतिम नृत्यांगना असलेली नोरा फतेही आता हिंदी चित्रपटाची नायिका म्हणून काम करणार आहे. ती लवकरच हिंदी चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

Nora Fateh in hindi movies
आयटम सॉंग्स स्पेशलिस्ट नोरा फतेही
author img

By

Published : Apr 14, 2023, 10:50 AM IST

मुंबई : बॉलिवूडची जादू भारतातच नव्हे तर जगभर पसरलेली आहे. जसे भारतभरातून हजारो जण, खासकरून मुली, सिनेमात संधी मिळविण्यासाठी मुंबईत येत असतात. तशाच परदेशस्थ मुलीदेखील बॉलिवूडकडे आकृष्ट झालेल्या दिसतात. अनेक विदेशी तरुणी हिंदीचा एकही शब्द येत नसताना बॉलिवूडमध्ये नशीब आजमवायला मुंबईत दाखल होतात. जेव्हापासून कतरीना कैफ सुपरस्टार बनली आहे. तेव्हापासून विदेशातून फिल्म इंडस्ट्रीत येणाऱ्या मुलींमध्ये खूप वाढ झाली आहे. खरेतर हिंदी चित्रपटांत चान्स मिळणे ही काय खायची गोष्ट नाही. हे कोणाच्या खिजगणतीतही नसते. त्यामुळे जवळपास सर्वांनाच परतीची वाट धरावी लागते. परंतु अलीकडच्या काळात, फिल्म इंडस्ट्रीतील आव्हानांना तोंड देत, आपल्यात अनेक बदल करीत आणि कठोर परिश्रमाने आपले वेगळे स्थान बनविणारी एक अभिनेत्री म्हणजे नोरा फतेही. अप्रतिम नृत्यांगना असलेल्या नोराने चित्रपटांतून छोट्या छोट्या भूमिका केल्या आणि अनेक सुपरहिट आयटम सॉंग्स तिच्या नावावर आहेत. परंतु तिने अजून एक मोठी झेप घेतली आहे. ती म्हणजे ती आता हिंदी चित्रपटाची नायिका म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

सत्यमेव जयते चित्रपटानंतर बॉलिवूडमध्ये प्रकाशझोतात : नोरा फतेही २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सत्यमेव जयते' चित्रपटानंतर बॉलिवूडमध्ये प्रकाशझोतात आली. त्यात तिने एक छोटीशी पण महत्वपूर्ण भूमिका केली होती. तिने त्यात 'दिलबर' वर केलेले नृत्य बरीच प्रशंसा मिळवून गेले. तिचा डान्स व्हिडिओ रिलीज झाल्याच्या २४ तासांत २० दशलक्षहून अधिक व्ह्यूज मिळाले. या गाण्याने अल्पावधीतच १०० दशलक्ष व्ह्यूज क्लबमध्ये प्रवेश केला. आपल्या डान्सिंगसाठी प्रसिद्ध असलेली नोरा अभिनय सुद्धा करू शकते हे तिच्या ‘सत्यमेव जयते' मधील भूमिकेमुळे कळून आले. 'गर्मी', 'ओ साकी साकी', 'दिलबर', 'कमरिया', 'एक तो कम जिंदगानी' यांसारख्या अनेक बॉलीवूड हिट गाण्यांमधील तिच्या नृत्यशैलीने तिला प्रचंड फॅन फॉलोइंग मिळवून दिले आहे. अभिनय आणि गायनाव्यतिरिक्त, तिने म्युझिक व्हिडिओ देखील तयार केले आहेत आणि विविध आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवर सादर केले आहेत. आता नोरा तब्बल पाच प्रोजेक्ट्समध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहे.

लवकरच दिसू शकते हॉलिवूड प्रोजेक्टमध्ये : नोरा ज्या पाच प्रोजेक्ट्समध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे, त्यातील एक म्हणजे ‘मडगाव एक्सप्रेस’. या चित्रपटाद्वारे कुणाल खेमू दिग्दर्शनक्षेत्रात पदार्पण करीत आहे. या चित्रपटातील तिची भूमिका रोमांचक आहे. नोरा सध्या पोस्ट-प्रॉडक्शनमध्ये असलेल्या इतर दोन चित्रपटांमध्ये दिसणार आहे. जिथे ती स्वतःची एक पूर्णपणे वेगळी, मोहक आणि सुंदर बाजू दाखवू शकणार आहे. नोरा आंतरराष्ट्रीय संधी देखील शोधत आहे आणि लवकरच ती हॉलिवूडच्या प्रोजेक्ट मध्ये दिसली तर नवल वाटायला नको.

हेही वाचा : Kapil Sharma In The Crew : बॉलीवूडच्या तीन अभिनेत्रींसह कॉमेडियन कपिल शर्मा 'या' सिनेमात काम करणार, चाहत्यांमध्ये उत्सुकता

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.