नवी दिल्ली - रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना त्यांच्या आगामी 'अॅनिमल' चित्रपटाच्या शूटिंगसाठी मनाली, हिमाचल प्रदेशात पोहोचले आहेत. दोघांचे फोटो इंटरनेटवर फिरत आहेत ज्यात ते त्यांच्या चाहत्यांसोबत पोज देताना दिसत आहेत. हे कलाकार निसर्गरम्य डोंगरात चित्रपटाचे पहिले शुटिंग शेड्यूल सुरू करतील.

रणबीर पांढर्या पँटसह काळ्या जॅकेट व टी-शर्टमध्ये दिसत आहे. असे दिसते की त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी कलाकारांचा सत्कारही करण्यात आला कारण ते पारंपारिक हिमाचल टोपी आणि शाल परिधान करून चाहत्यांसोबत पोझ देताना दिसत आहेत. याआधी परिणीती चोप्राला रणबीरसोबत लीड लेडीची भूमिका साकारण्यात आली होती. तथापि, ती अज्ञात कारणास्तव चित्रपटातून बाहेर पडली.

अॅनिमल या क्राईम ड्रामा चित्रपटाचे दिग्दर्शन 'कबीर सिंग' व 'अर्जुन रेड्डी' फेम संदीप रेड्डी वंगा करणार आहेत. बॉबी देओल आणि अनिल कपूर हे देखील या प्रकल्पाचा एक भाग आहेत. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांच्या टी-सीरीज, प्रणय रेड्डी वंगा यांच्या भद्रकाली पिक्चर्स आणि मुराद खेतानी यांच्या सिने1 स्टुडिओने केली आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
हेही वाचा - ओरिजनल 'जर्सी' स्टार नानीने केले शाहिद कपूर आणि टीमचे कौतूक