हैदराबाद : भारतासाठी ऑस्कर्स पुरस्कार सोहळ्यातून आनंदाची बातमी आली आहे. गुनीत मोंगा निर्मित कार्तिकी गोन्साल्विस यांचा लघुपट 'द एलिफंट व्हिस्परर्स'ने सर्वोत्कृष्ट लघुपटासाठी 95 वा ऑस्कर पुरस्कार जिंकला आहे. द एलिफंट व्हिस्परर्स ही नेटफ्लिक्सची निर्मिती आहे आणि ती बोमन आणि बेली नावाच्या स्थानिक जोडप्याची कथा सांगते ज्यांना रघु नावाच्या अनाथ हत्तीच्या बाळाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
मानव आणि प्राणी यांच्यातील संबंधांवर आधारित : या डॉक्युमेंट्रीला बनण्यासाठी 5 वर्षे लागली जिचा एकूण रनटाइम 450 तासांचा आहे. ही डॉक्युमेंट्री मानव आणि पॅचीडर्म्स यांच्यातील प्रेमाच्या गुंतागुंतीवर आधारित आहे. या डॉक्युमेंट्रीतील दृष्ये जंगलाच्या सौंदर्याने दर्शकांना मोहित करते. कार्तिकी गोन्साल्विस यांनी या डॉक्युमेंट्री द्वारे मानव आणि प्राणी यांच्यातील संबंध या विषयाला स्पर्श केला आहे. औद्योगीकरणामुळे मानव अनेकदा प्राण्यांच्या हक्काच्या जंगलाच्या प्रदेशांवर अतिक्रमण करतात. 'द एलिफंट व्हिस्परर्स' ही अशा लोकांची कथा आहे, जे पिढ्यानपिढ्या हत्तींसोबत काम करत आहेत आणि त्यांना जंगलाच्या गरजांची जाणीव आहे, असे निर्मात्यांनी सांगितले. यापूर्वी देखील 'पीरियड' या डॉक्युमेंट्रीच्या निर्मीतीसाठी मोंगा यांना गौरवण्यात आले आहे. या डॉक्युमेंट्रीने सर्वोत्कृष्ट लघुपटासाठी 2019 चा अकादमी पुरस्कार जिंकला होता.
-
'The Elephant Whisperers' wins the Oscar for Best Documentary Short Film. Congratulations! #Oscars #Oscars95 pic.twitter.com/WeiVWd3yM6
— The Academy (@TheAcademy) March 13, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">'The Elephant Whisperers' wins the Oscar for Best Documentary Short Film. Congratulations! #Oscars #Oscars95 pic.twitter.com/WeiVWd3yM6
— The Academy (@TheAcademy) March 13, 2023'The Elephant Whisperers' wins the Oscar for Best Documentary Short Film. Congratulations! #Oscars #Oscars95 pic.twitter.com/WeiVWd3yM6
— The Academy (@TheAcademy) March 13, 2023
भारताला तीन नामांकने : दुसरीकडे, शौनक सेनच्या 'ऑल दॅट ब्रेथ्स'ला सर्वोत्कृष्ट माहितीपट चित्रपटाच्या श्रेणीत पराभव पत्करावा लागला आहे. Navalny या चित्रपटाला या श्रेणीतील ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. मात्र कार्तिकी गोन्साल्विसच्या 'द एलिफंट व्हिस्पर्स'ला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. यंदाचा हा पहिलाच ऑस्कर पुरस्कार असल्यामुळे संपूर्ण देशात जल्लोषाचे वातावरण आहे. या वर्षीच्या ऑस्करमध्ये भारताने एकूण तीन ऑस्कर नामांकने मिळवली होती - सर्वोत्कृष्ट मूळ गाण्यासाठी RRR चे गाणे नाटू नाटू, सर्वोत्कृष्ट माहितीपट फीचर फिल्म शौनक सेनचा ऑल दॅट ब्रेथ्स, आणि सर्वोत्कृष्ट लघुपट कार्तिकी गोन्साल्विस दिग्दर्शित द एलिफंट व्हिस्परर्स.
हेही वाचा : Highlight of Oscars 2023 : अभिनेत्री नर्तिका लॉरेन गॉटलीब करणार अकादमी पुरस्कार सोहळ्यात नाटू नाटूवर परफॉर्म