ETV Bharat / entertainment

आयरा खान आणि नुपूर शिखरे यांचे विवाहविधी उदयपूरमध्ये सुरू - विधी उदयपूरमध्ये सुरू

Ira-Nupur Wedding: अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान आणि नुपूर शिखरे यांचे विवाहविधी सध्या उदयपूरमध्ये सुरू आहेत. दरम्यान सोशल मीडियावर आयरानं काही व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत.

Ira-Nupur Wedding
आयरा आणि नुपूरचं लग्न
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 8, 2024, 11:31 AM IST

मुंबई - Ira-Nupur Wedding: आमिर खानची मुलगी आयरा खान आणि नुपूर शिखरेचं 3 जानेवारीला मुंबईत कोर्ट मॅरेज झालं. आता हे जोडपं राजस्थानमधील उदयपूरमध्ये पारंपरिक पद्धतीनं लग्न करणार आहे. या जोडप्याचा विवाह सोहळा तीन दिवस चालणार आहे. या सोहळ्याला कुटुंबीय, नातेवाईक आणि जवळचे मित्र उपस्थित राहणार आहेत. दरम्यान आयरा नुपूरचा एक रोमँटिक डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आयरा खान आणि नुपूर शिखरे तीन दिवसांच्या लग्नसोहळ्यासाठी 5 जानेवारी रोजी उदयपूरला पोहोचले होते. अलीकडेच आयरानं तिच्या सोशल मीडिया हँडलवर रोमँटिक डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे.

आयरा आणि नुपूरचा व्हिडिओ व्हायरल : या व्हिडिओमध्ये आयरा तिच्या पतीसाठी एक गाणं लिप सिंक करताना दिसत आहे, तर पार्श्वभूमीत एक गायिका जोनास ब्रदर्सचे 'व्हेन यू लुक मी इन द आय' गाताना दिसत आहे. दुसर्‍या व्हिडिओमध्ये, ती नुपूरच्या मांडीवर बसलेली दिसत आहे. आज 8 जानेवारी रोजी मेहंदी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर 9 रोजी पायजमा पार्टी व संगीत सोहळा होणार आहे. या जोडप्याचा विवाह 10 जानेवारी रोजी पारंपरिक पद्धतीनं होईल. उदयपूरमधील ताज अरावली रिसॉर्ट्समध्ये हे कार्यक्रम होणार आहेत. निमंत्रितांसाठी 176 हॉटेल रुम्ससह संपूर्ण हॉटेल बुक्ड आहे.

रिसेप्शन होणार मुंबईत : 7 जानेवारीपासून सुरू झालेल्या या सोहळ्यात सुमारे 250 लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या जोडप्याचं उदयपूरमधील लग्न 10 जानेवारी रोजी संपणार आहे. यानंतर नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये 13 जानेवारीला होणाऱ्या लग्नाच्या रिसेप्शनसाठी हे जोडपं मुंबईला परतणार आहेत. आता अलीकडेच आमिर खानचा मुलगा जुनैद खान आणि भाचा इमरान खान देखील उदयपूरमध्ये लग्नात सहभागी होण्यासाठी पोहोचले होते. आयरा खान आणि नुपूर शिखरेचा विवाह सोहळा उदयपूरमध्ये भव्य स्वरुपात होणार आहे. काही दिवसांपूर्वी या जोडप्याच्या हळदी समारंभातील फोटो व्हायरल झाले होते. या फोटोमध्ये नुपूर हा आयरावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसला होता.

हेही वाचा :

  1. बॉलिवूड सेलेब्रिटींनी चालवली लक्षद्वीप मोहीम, दिग्गज स्टार्सनी केले भेटीचे आवाहन
  2. गोल्डन ग्लोबमध्ये ओपेनहायमर, बार्बीचं वर्चस्व, 'हा' चित्रपट ठरला सर्वश्रेष्ठ
  3. 'सालार'चा बॉक्स ऑफिसवर अजूनही जलवा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.