मुंबई - गेल्या काही दशकांत आपल्याकडील सिनेमा 'मोठा' झाला. पूर्वी दोन फुलं एकमेकांना चिकटून असलेली दाखविली जायची जेणेकरून प्रेक्षकांना समजेल की हिरो हिरॉईन किस करताहेत. त्यानंतर दोघांचे ओठ एकदम जवळ आलेले दिसे आणि नंतर नायिका लाजत तोंड पुसत पळून जात असे, म्हणजे त्यांनी किस केलं असं अभिप्रेत असायचं. त्याउलट त्याकाळी पाश्चिमात्य सिनेमांत सर्रास चुंबनदृश्ये बघायला मिळायची आणि अनेक प्रेक्षक ते सीन्स बघण्यासाठी त्या सिनेमांना गर्दीही करीत. पुढे आपणही प्रोग्रसीव्ह झालो आणि पडद्यावर नायक नायिका किस करताना दिसू लागली. त्यातच मराठी चित्रपटही पुढे चालू लागला आणि त्यातही कधी कधी किसिंग सीन्स दिसू लागले. त्यामुळे मराठी कलाकारांना, सगळ्याच नाही, पडद्यावर किसिंग करण्यात वावगे वाटत नाही.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
आता मराठी चित्रपटसृष्टीत नवीन पिढी कामं करतेय. आजच्या तरुणाईच्या मते किस करणे ही मामुली बात आहे आणि त्यात बाऊ करण्यासारखे काहीही नाही असे त्यांना वाटते. याच पिढीतील कलाकार मराठी चित्रपटसृष्टीत वावरत असून चुंबनदृष्यांना त्यांचा आक्षेप नाहीये. परंतु काही मात्र अजूनही पडद्यावर किस करताना अवघडलेल्या स्थितीत दिसतात किंवा असतात. आता हेच उदाहरण बघाना. फकाट नावाचा एक नवीन चित्रपट येऊ घातलाय आणि त्यातील सुयोग गोऱ्हे आणि रसिका सुनीलच्या किसचा किस्सा चर्चेत आहे.
तर झाले असे की फकाट या चित्रपटाच्या एका सीन मध्ये सुयोग गोऱ्हेला रसिका सुनीलला किस करायचे होते. आता शक्यतो अश्यावेळी मुलगी अनकम्फर्टटेबल होण्याची शक्यता जास्त असते. परंतु इथे झाले उलटेच. रसिकाला चुंबन दृष्यासाठी काहीही आक्षेप नव्हता परंतु सुयोग कमालीचा अनकम्फर्टटेबल झाला. त्याने याआधी असा सीन न केल्यामुळे तो घाबरला होता आणि तो सीन कसा टाळता येईल हे बघत होता. त्याला किसिंग सीन करण्यापूर्वीच खूपच अवघडलेपण वाटत होते. परंतु रसिका सुनील ने त्याला घीर दिला आणि 'तो' सीन एकदाचा पार पडला.
त्या चुंबन सीनबद्दल रसिका सुनील ने सांगितले की, 'जेव्हा सुयोग ला किसिंग सीन बद्दल सांगितले गेले तेव्हा तो चक्क घाबरला होता. खरंतर अश्या सीनसाठी स्त्री कलाकार तयार नसते परंतु येथे तरुण पुरुष कलाकार टरकला होता. तसं बघायला गेलो तर मी आणि सुयोग खूप चांगले मित्र आहोत. बेस्ट फ्रेंड्स आहोत. मी त्याला समजावलं की आपण मित्र आहोत. आपण कलाकार आहोत. आपण प्रोफेशनल आहोत. मग प्रसंगाची गरज असेल तर आपण तसे दृश्य दिले तर त्यात गैर काय आहे? तसेच मला चुंबन दृश्य देण्यासाठी काहीही ऑब्जेक्शन नाहीये. मग प्रॉब्लेम कुठे आहे? तसेच इथे मी नमूद करते की जेव्हा हा प्रसंग घडला तेव्हा आम्हा दोघांचीही लग्नं झालेली नव्हती. शेवटी मी आणि दिग्दर्शक श्रेयश जाधवने भरपूर समजवल्यानंतर सुयोग किसिंग सीन साठी राजी झाला आणि तो उत्तमरीत्या पार पडला.'
या चित्रपटाची प्रस्तुती गणराज स्टुडिओज आणि वक्रतुंड एंटरटेनमेंट्स ने केली असून निर्माती आहे नीता जाधव. श्रेयश जाधव दिग्दर्शित 'फकाट' मध्ये सुयोग गोऱ्हे आणि रसिका सुनील सोबत हेमंत ढोमे, अनुजा साठे, अविनाश नारकर, नितीश चव्हाण, महेश जाधव, किरण गायकवाड आणि कबीर दुहान सिंग हे कलाकार सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकांत दिसतील. एक धमाल कौटुंबिक चित्रपट फकाट येत्या २ जूनला चित्रपटगृहांत प्रदर्शित होत आहे.
हेही वाचा - Hollywood Entry : राम चरण हॉलिवूडमध्ये प्रवेश करणार ; 'आरआरआर' स्टारने दिला हा मोठा इशारा