मुंबई - Indian Navy Day 2023 : भारतीय सैन्य हे जगातील सर्वात शक्तिशाली सैन्यांपैकी एक आहे. 4 डिसेंबर रोजी 'भारतीय नौदल दिन' साजरा केला जातो. देशाच्या सुरक्षेत नौदलाचीही मोठी भूमिका आहे. भारतीय नौदलाचे सैनिक, ज्यांना आपण जलरक्षक म्हणू शकतो, ते जलमार्गाच्या सुरक्षेत सतर्क असतात. 1971 मध्ये भारत-पाक युद्धात भारतीय नौदलानं देशाला विजय मिळवून दिल्यापासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. भारताच्या तिन्ही सेना सर्व बाजूंनी देशाचे रक्षण करण्यासाठी सज्ज आहेत.
नौदल दिनानिमित्त शेअर करण्यात आला व्हिडिओ : आज सिंधुदुर्ग येथे नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या सागरी वारसा याच्या आठवण करत आदरांजली वाहिली जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतीय नौदलाचा पाया रचला होता. दरम्यान, आता त्यांना ट्रिब्युट देणारा एक खास व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आवाज हा महानायक अमिताभ बच्चन यांनी दिला आहे. नौदल सेनानं त्यांच्या एक्स हँडलवर अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील हा खास व्हिडिओ पोस्ट करत लिहिलं, 'भारतीय नौदलच्या पराक्रमाचे आणि अष्टपैलुत्वाचे साक्षीदार व्हा, कारण ते 'जलमेव यस्य, बलमेव तस्य' या प्राचीन मंत्राचे उदाहरण देते. जे भारताच्या समृद्धी आणि कल्याणासाठी आमच्या अदम्य नौसेना सामर्थ्याचे महत्त्वपूर्ण प्रासंगिकता दर्शवतं. आमचा सागरी इतिहास आणि शौर्य या आधुनिक नौदलाच्या भावनेशी जोडणारा व्हिडिओ पाहा. सायंकाळी 4.30 वाजता भारतीय नौदलाच्या यूट्यूब चॅनलवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण' असं यावर कॅप्शन देण्यात आलं आहे.
-
#NavyDay23!
— IN (@IndiannavyMedia) December 4, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
⛵️🪂 Witness the prowess and versatility of the #IndianNavy as it exemplifies the age-old mantra "Jalameva Yasya, Balameva Tasya", demonstrating the crucial relevance of our indomitable #naval strength to India’s prosperity and well-being. 🇮🇳⚓
Stay tuned for a… pic.twitter.com/LNHDH3zmm3
">#NavyDay23!
— IN (@IndiannavyMedia) December 4, 2023

Stay tuned for a… pic.twitter.com/LNHDH3zmm3#NavyDay23!
— IN (@IndiannavyMedia) December 4, 2023
⛵️🪂 Witness the prowess and versatility of the #IndianNavy as it exemplifies the age-old mantra "Jalameva Yasya, Balameva Tasya", demonstrating the crucial relevance of our indomitable #naval strength to India’s prosperity and well-being. 🇮🇳⚓
Stay tuned for a… pic.twitter.com/LNHDH3zmm3
छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याचं होणार अनावरण : सिंधुदुर्गात आज 'नौदल दिना'निमित्त खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजींच्या इतिहासाची आठवण म्हणून राजकोट किल्ल्यावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलं जाणार आहे. शिवाजी महाराजांनी बांधलेला राजकोट किल्ला हा भारताच्या समृद्ध सागरी इतिहासाची महती सांगतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी 4.15 वाजता सिंधुदुर्गात पोहोचणार आहेत. त्यानंतर ते सिंधुदुर्गात 'नेव्ही डे'च्या कार्यक्रमात सहभागी होईल. नौदल दिनाच्या खास कार्यक्रमामध्ये सिंधुदुर्ग येथून भारतीय नौदलाची जहाजे, पाणबुड्या, विमाने आणि दलांची परेडदेखील होणार आहे.
हेही वाचा :