ETV Bharat / entertainment

Aamir Khan Exclusive Interview : लाल सिंग चड्ढाच्या निर्मितीची आमिरने उघडली 'अनेक' रहस्यं...

बहुप्रतीक्षित लाल सिंग चड्ढा चित्रपट आज रिलीज झाला आहे. या चित्रपटाची निर्मिमध्ये अनेक रहस्य दडलेली आहेत. याची कथा अतुल कुलकर्णीने लिहिली असून तो पहिल्यांदाच स्क्रिप्ट लिहित आहे. विशेष म्हणजे दोन वर्षे आमिरने ही कथा ऐकायचे टाळले होते. त्याचे कारणही त्याने सांगितले. शिवाय या चित्रपटात आमिर काम करणार नव्हता तर ही भूमिका त्याचा मुलगा जुनैदने करावी अशी आमिरची इच्छा होती. मात्र ही भूमिका त्याने का स्वीकारली याचाही खुलासा त्याने आमचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदमसोबत बोलताना केला आहे. पूर्ण मुलाखत वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा.

author img

By

Published : Aug 11, 2022, 5:22 PM IST

लाल सिंग चड्ढाच्या निर्मितीची आमिरने उघडली 'अनेक' रहस्यं...

मुंबई - तब्बल चार वर्षांनंतर आमिर खान लाल सिंग चड्ढा मार्फत प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. त्याचा आधीचा ठग्स ऑफ हिंदुस्थान बॉक्स ऑफिसवर आपटला होता, त्यामुळे लाल सिंग चड्ढाबाबत प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता आहे. बऱ्याच कालावधीनंतर आमिर मोठ्या पडद्यावर येत असल्यामुळे त्याच्या भावना काय आहेत असे आमचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम यांनी विचारल्यावर आमिर खान उत्तराला, “माझ्यात एक्ससाईटमेन्ट, धाकधूक, कॉन्फिडन्स अशा अनेक संमिश्र भावनांचे मिश्रण आहे. आम्ही खूप इमानदारीने चित्रपट बनविला आहे आणि प्रेक्षकांना तो आवडावा याच उद्देशाने बनविला आहे. आम्ही त्यांच्या अपेक्षांवर खरे उतरू हा कॉन्फिडन्स जरूर आहे परंतु नेहमीप्रमाणे थोडीफार धाकधूक नक्कीच आहे. आणि अशी धाकधूक मला माझ्या प्रत्येक चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी असते. तुम्हाला माहीतच असेल की लाल सिंग चड्ढा टॉम हँक्स अभिनित हॉलिवूड चित्रपट फॉरेस्ट गम्पवर आधारित आहे. आम्ही त्याचे भारतीयीकरण केले असून तो संपूर्णतः कौटुंबिक चित्रपट आहे. संपूर्ण फॅमिली एकत्र बसून हा चित्रपट बघू शकेल याची ग्वाही मी देतो. अभिनेता अतुल कुलकर्णीने याचे रूपांतर केले असून ते अप्रतिम झाले आहे. तुम्हाला एक गंमत सांगतो, फॉरेस्ट गम्प हा माझा निवडक आवडीच्या चित्रपटांपैकी एक आहे आणि अतुलने मला सांगितले की त्याने त्यावर आधारित संहिता लिहिली आहे. खरंतर ओरोजिनल चित्रपट क्लासिक आहे आणि अतुलने पहिल्यांदाच सिनेमासाठी लिखाण केलं आहे. मी साशंक होतो की संहिता चांगली असेल की नाही त्यामुळे अतुलने अनेकदा सांगूनही ती ऐकण्याचे मी टाळत होतो. अतुल माझा जुना मित्र आहे आणि जर का मला स्क्रिप्ट आवडली नसती तर तसे त्याला सांगणे मला अवघड गेले असते म्हणून मी टाळत होतो. तब्बल दोन वर्षांनंतर मी ती ऐकली आणि चाट पडलो. लिखाण इतकं सुरेख होत की मी त्याच्या प्रेमात पडलो आणि लाल सिंग चड्ढा बनविण्याचे नक्की झाले.”

ईटीव्ही भारत प्रतिनिधी  कीर्तिकुमार कदमसोबत आमिर खान

नवोदित दिग्दर्शकाने केली कमाल - दिग्दर्शक अद्वैत चंदन सारख्या नवोदित दिग्दर्शकाकडे दिग्दर्शनाची जबाबदारी टाकण्याबाबत आमिर म्हणाला, “हो, अद्वैत नक्कीच नवीन दिग्दर्शक आहे परंतु त्याने सिक्रेट सुपरस्टारचे दिग्दर्शन कमालीचे केले होते. त्यामुळे त्याचा विचार झाला. परंतु मी त्याला सांगितलं की हा एक कठीण चित्रपट आहे त्यामुळे तू काही ७-८ सीन्स दिग्दर्शित करून आम्हाला दाखव आणि त्यानंतर आम्ही फायनल डिसिजन घेऊ. आम्ही त्याला थोडे कठीण सीन्स दिग्दर्शित करायला सांगितले जेणेकरून त्याची दिग्दर्शनीय परिपक्वता तपासता येईल. त्याने त्याप्रमाणे केले आणि त्याने कमाल काम केले होते. अजून एक गंमतीची गोष्ट. माझा मुलगा जुनैद नुकताच अमेरिकेतून अभिनयाचे प्रशिक्षण घेऊन परतला होता. मी अद्वैतला सांगितले की जुनै ला लाल सिंगच्या भूमिकेत घेऊन सीन्स करून घे. थोडक्यात माझा मुलगा नक्की काय शिकून आलाय आणि अद्वैत इतका कठीण चित्रपट हाताळू शकेल की नाही या दोन्ही गोष्टींचा शहानिशा होणार होता. तुम्हाला सांगतो की अद्वैतने सीन्स सुंदररित्या दिग्दर्शित केले होतेच परंतु लाल सिंग चड्ढाच्या भूमिकेत जुनैदने अफलातून काम केले होते. मी आणि किरण (राव) यांनी त्या ऑडिशन्स बघितल्या आणि चाटच पडलो. जुनैद ती भूमिका जगतोय अशी आमची धारणा झाली. मी तर किरणला बोललो की मी इतक्या ताकतीने ही भूमिका आता करूच शकणार नाही. ते कदाचित पितृप्रेम असेल पण अनेकांनी मला हेच सांगितले की जुनैद ही भूमिका जगलाय आणि त्यालाच या भूमिकेत घ्या.”

आमिरने भूमिका का केली ? - मग या चित्रपटात अभिनेता आमिर खानची एंट्री कशी झाली या प्रश्नावर आमिर ने उत्तर दिले की, “त्यातही एक गंमत आहे. आम्ही जुनैदची ऑडिशन अनेकांना दाखविली आणि सगळ्यांचेच मत पडले की जुनैदनेच लाल सिंग चड्ढाची भूमिका करावी. मी ती भूमिका करणार होतो म्हणून सहा महिने दाढी वाढविली होती आणि ती भरपूर वाढलेली होती. सर्वांचेच मत पडत होते की जुनैदने लाल सिंग अफलातून पद्धतीने सादर केलाय. माझीदेखील खात्री होती की जुनैदने मी करू शकेन त्यापेक्षा उत्तम काम केले आहे आणि त्यालाच घेऊन हा चित्रपट बनवायला हवा. त्यामुळे मी माझी वाढविलेली दाढी कापून टाकली. परंतु दोन लोक या निर्णयाविरोधात होते. ते म्हणजे आदित्य चोप्रा आणि अतुल कुलकर्णी. त्यांच्या मते ही भूमिका खूप कठीण आहे आणि ती एका नवोदिताने करू नये. या चित्रपटाचा आवाका आणि भूमिकेचा कॅनवास मोठा आहे त्यामुळे माझ्यासारख्या कसलेल्या अभिनेत्यानेच ही भूमिका साकारायला हवी अशी त्यांची धारणा होती. मला आणि माझ्या टीमला हे पटले. आणि जुनैद देखील मला म्हणाला होता की त्याच्यासारख्या नवोदितासाठी इतक्या मोठ्या बजेटची फिल्म बनविणे धोक्याचे आहे. त्यामुळे लाल सिंग चड्ढामध्ये माझी अभिनेता म्हणून एंट्री झाली.”

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

सरदारजी लूक - लाल सिंग चड्ढाच्या लूकबद्दल सांगताना आमिर म्हणाला, “त्याची पण एक गंमत आहे. या भूमिकेची तयारी करताना जिममध्ये वर्क आउट करताना मी एका सरदारजींना तेथे व्यायाम करताना पाहिले. त्यांची खूप मोठी दाढी होती आणि मला तो लुक आवडला. मी त्यांच्या परवानगीने त्यांचा फोटो काढला आणि मला त्यांचा हा लुक आवडल्याचे सांगितले. तसेच मी हा लुक लाल सिंग चड्ढा साठी वापरण्याचा विचार करतोय असे सांगितले. त्यांना ते नक्कीच आवडले आणि त्यानंतर आमची दोस्तीदेखील झाली. चित्रपटात माझी ओरिजिनल दाढी आहे परंतु त्याची लांबी अधिक दाखविण्यासाठी एक्सटेन्शन वापरण्यात आले आहेत. मी आधी सहा महिने वाढविलेली दाढी कापली होती, त्यानंतरचे चार पाच महिने जेव्हा मी दाढी वाढविली नव्हती आणि त्यानंतरचे सहाएक महिने जेव्हा मी पुन्हा दाढी वाढविली त्यामुळे एक्सटेन्शन चा वापर करावा लागला. नाहीतर चित्रपटात संपूर्णतः माझी स्वतःचीच दाढी असती. (हसतो).”

मुलगा जुनैदने साकारलेल्या भूमिकेचा फायदा - जुनैदने केलेल्या भूमिकेचा तुला काही फायदा झाला का असे विचारल्यावर आमिरने प्रांजळपणे कबुली दिली की, “नक्कीच फायदा झाला. आधी सांगितल्याप्रमाणे तो ती भूमिका जगतोय हे जाणवले होते. त्यामुळे काही कठीण प्रसंग साकारताना मी जुनैदने सादर केले प्रसंग बघितले आणि त्याने त्या त्या सीन साठी लावलेला सूर पकडला. आणि हे सांगताना मला खरंतर आनंद वाटतोय. तसेच इतर काही प्रसंग चित्रित करताना अडथळा येतोय असे वाटले तर मी आणि अद्वैत ओरिजिनल फिल्मचे फक्त ते सीन बघायचो हे जाणून घेण्यासाठी की त्यांनी ते कसे चित्रित केलेत. त्याव्यतिरिक्त कुठलेही रेफरन्स घेतलेले नाहीयेत.”

नायिका करीना कपूरची एन्ट्री - चित्रपटाची नायिका करीना कपूर खान बद्दल सांगताना आमिर बोलला की, “करीना उत्कृष्ट अभिनेत्री आहे हे सर्वश्रुत आहेच. परंतु सुरुवातीला आम्ही इतर नव्या-जुन्या अभिनेत्रींची चाचपणी करीत होतो. अचानकपणे मला तिच्या ‘पू’ ची आठवण झाली. माझ्या मते कभी ख़ुशी कभी गम मध्ये तिने लाजवाब भूमिका केली होती. तसेच ती एक उत्तम अभिनेत्री आहे, सुंदर व्यक्ती आहे तसेच आमचे मित्रत्वाचे सूर जुळतात. तलाश, थ्री इडियट्समध्ये आम्ही एकत्र काम केलंय आणि आमची केमिस्ट्रीसुद्धा प्रेक्षकांना भावलीय. तेव्हा आम्हाला जाणवले की, करीनाच आमची रूपा आहे. करीनाच्या भूमिकेचं नाव रूपा आहे. आम्ही तिला नरेशन दिल आणि तिने ताबडतोब होकार दिला. गंमत म्हणजे तिने अजूनही चित्रपट पाहिलेला नाही आणि ती मला सूचना देत असते की तो सीन आणि तिथल्या प्रसंगात हे हे हवे. परंतु तिने या अनेक पदरी भूमिकेचे सोने केले आहे.”

हेही वाचा - लाल सिंग चड्ढा रिलीज, आलियाने केले 'नणंद' करीनाचा चित्रपट पाहण्याचे आवाहन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.