ETV Bharat / entertainment

Jaane Tu Ya Jaane Na Movie : इमरान खान आणि जेनेलिया देशमुखच्या व्हायरल फोटोनंतर चाहत्यांमध्ये खळबळ - जेनेलिया देशमुख

Jaane Tu Ya Jaane Na Movie : 2008 मध्ये रिलीज झालेल्या 'जाने तू या जाने ना' या चित्रपटाच्या आठवणी आजही चाहत्यांच्या मनात ताज्या आहेत. या चित्रपटामध्ये इमरान खान आणि जेनेलिया देशमुख यांच्या प्रमुख भूमिका होत्या. आता या दोौघांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Jaane Tu Ya Jaane Na Movie
जाने तू या जाने ना चित्रपट
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 28, 2023, 4:46 PM IST

मुंबई - Jaane Tu Ya Jaane Na Movie : हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता इमरान खान सध्या चर्चेत आहे. तो आता पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार असल्याचं दिसत आहे. आतापर्यंत इमराननं चित्रपटात पुनरागमन करण्याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. दरम्यान, आता सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये इमरान खान आणि जेनेलिया देशमुख एकत्र दिसत आहेत. 'जाने तू या जाने ना' चित्रपटाच्या रिलीजला 15 वर्षे पूर्ण झाल्यानंतर हे दोन्ही स्टार्स एकत्र आले आहेत. इमरान आणि जेनेलियाचा हा चित्रपट त्यांच्या चाहत्यांना खूप पसंत पडला होता.

फोटो झाले व्हायरल : इमरान आणि जेनेलियाचा फोटो इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान आता त्याच्या चाहत्यांना प्रश्न पडला आहे की, हे दोघेही 'जाने तू या जाने ना' या चित्रपटाच्या सीक्वलच्या तयारी करत आहेत का? इमरान आणि जेनेलिया इतक्या वर्षांनंतर एकत्र आले आहेत, यामुळे त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. एका चाहत्यानं पोस्टवर कमेंट करत लिहलं, 'या दोघांना पाहून नेहमीच आनंद होतो'. दुसऱ्या एका चाहत्यानं लिहलं, 'दोघेही एकत्र खूप खास दिसत आहे'. याशिवाय अनेकजन या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत.

वर्कफ्रंट : जेनेलिया आणि इमरान दोघेही या फोटोमध्ये स्मितहास्य देताना दिसत आहे. जेनी ही पांढऱ्या टॉपमध्ये दिसत आहे. यावर तिनं केसांचा बन बांधला आहे. याशिवाय ती नो- मेकअप लूकमध्ये दिसत आहे. याशिवाय इमरान बेज पॅंटसह ब्लू कॉलर टी-शर्टमध्ये परिधान केला आहे. या लूकमध्ये तो देखणा दिसत आहे. इमरान खान आणि जेनेलिया देशमुख स्टारर रोमँटिक चित्रपट 'जाने तू या जाने ना' हा चित्रपट 2008 मध्ये प्रदर्शित झाला होता. इमरान खान अनेक दिवसांपासून चित्रपटांमध्ये दिसला नाही आहे. तो शेवटी 'कट्टी बट्टी'मध्ये दिसला होता. हा चित्रपट बॉक्सवर फ्लॉप झाला होता. या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत कंगना रणौत दिसली होती. दुसरीकडे जेनेलिया ही 'ट्रायल पीरियड' या चित्रपटामध्ये दिसली होती.

हेही वाचा :

  1. 12th Fail Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर कंगनाचा 'तेजस' फेल, तर विक्रांत मॅसीचा 'ट्वेल्थ फेल' पास
  2. Indian 2 major update : कमल हासनच्या चाहत्यांसाठी गोड बातमी, 'इंडियन 2'च्या प्रदर्शनाबाबत लेटेस्ट अपडेट
  3. Koffee With Karan 8 : रणवीरनं सांगितला दीपिकाच्या नैराश्येचा किस्सा, करण जोहरलाही आला होता पॅनिक अटॅक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.