ETV Bharat / entertainment

EXCLUSIVE INTERVIEW : मी विकी कौशलसोबत कधीच काम करणार नाही - कतरीना कैफ - फोन भूत

अभिनेत्री कतरीना कैफचे नुकतेच अभिनेता विकी कौशल सोबत लग्न झाले. तिची प्रमुख भूमिका असलेला फोन भूत (Phone Bhoot) नावाचा चित्रपट प्रदर्शित होत आहे. ETV च्या प्रतिनिधीने कतरीना कैफसोबत (katrina kaif) संवाद साधला.

Katrina Kaif- Vicky Kaushal
कतरीना कैफ- विकी कौशल
author img

By

Published : Nov 3, 2022, 3:16 PM IST

लग्नानंतर काय फरक जाणवतोय ? कतरीना (katrina kaif ) यावर म्हणाली, लग्नानंतर आयुष्यात फरक नक्कीच आला आहे. माझ्या आयुष्यात स्थिरता आली आहे. मी खूप विचार करणारी व्यक्ती आहे. भविष्यात काय घडेल याबाबत मी सतत विचार करते. त्यामुळे माझा स्ट्रेस लेव्हल खूप जास्त असतो. विकी आयुष्यात आल्यापासून मी बरीच शांत झाली आहे. तो वर्तमानात जगतो आणि हसतखेळत आयुष्य जगण्यात विश्वास ठेवतो. त्याच्याबरोबर संसार करताना मला आयुष्यात स्टॅबिलिटी मिळाली आहे. म्हणतात ना, 'अपोजिट अट्रॅक्ट्स’ हे आमच्याबाबतीत तंतोतंत जुळते.

विकीच्या अभिनयक्षमतेचा आदर करते: लग्नानंतर नवरा बायको अर्थातच एकमेकांच्या निर्णय प्रक्रियेत भाग घेत असतात. त्याबाबत विचारले असता कतरीना म्हणाली, 'हो. आम्ही सर्वच गोष्टींवर चर्चा करतो. परंतु दोघांपैकी कोणीही आपला निर्णय दुसऱ्यावर थोपत नाही. मी विकीच्या अभिनयक्षमतेचा आदर करते. त्याच्या निवडींबाबत आदर ठेवते. त्याच्या कामाचा आदर करते आणि तोदेखील माझ्या निर्णयांचा आदर करतो.

जीवनाचे सत्य: ती पुढे म्हणाली की, आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर आपण वेगवेगळ्या गोष्टींना प्राधान्य देत असतो. मी सिंगल असताना निरनिराळे चित्रपट केले. आता मला आशयघन चित्रपटांवर काम करावेसे वाटते. लग्न झाल्यावर माझ्या डोक्यात हनिमून होता परंतु विकी आणि मी ताबडतोब आपापल्या कामांत बिझी झालो. लग्नानंतर मला फॅमिली टाइम हवा होता परंतु आधीच्या कमिटमेंट्स मुळे ते शक्य झाले नाही. परंतु हेच जीवनाचे सत्य आहे.

मी विकी कौशलसोबत कधीच काम करणार नाही: कतरीनाचा नवरा विकी कौशल राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता आहे. आता जोडीदार असलेल्या विकी बरोबर काम केव्हा करणार असे विचारल्यावर कतरीना म्हणाली, मी विकीला (Vicky Kaushal) सांगितले की, मी त्याच्याबरोबर कधीच काम करणार नाही (I would never work with him). खरे सांगायचे तर विकी इतका टॅलेंटेड आहे की विचारू नका, आणि तो माझा नवरा आहे म्हणून बोलत नाही. एकदा मी घरी मेरी क्रिसमस चे डायलॉग्स वर काम करीत होते. तेव्हा विकी ने विचारले की मी काही मदत करू का? म्हणजे दुसऱ्या कॅरॅक्टरचे संवाद मी म्हणतो, म्हणजे तुला तुझे डायलाॅग वाचताना प्रॉब्लेम येणार नाही. मी त्याला चार पाने दिली आणि त्याने त्यावर एक नजर फिरविली आणि ते कागद बाजूला ठेऊन म्हणाला चल सुरुवात करूया.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.