ETV Bharat / entertainment

'मी अश्लील चित्रपट बनवलेला नाही': सालारला 'ए' प्रमाणपत्र मिळाल्यानंतर दिग्दर्शक नाराज - सालार दिग्दर्शक प्रशांत नील

Salaar got an A certificate from the Censor Board : प्रशांत नील दिग्दर्शित 'सालार' चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून 'ए' सर्टिफिकेट मिळाले आहे. सेन्सॉरच्या सूचनेनुसार सीन्सवर कात्री चालवली असती तर कथेमध्ये तडजोड झाली असती, त्यामुळे त्यांनी हे 'ए' सर्टिफिकेट स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल प्रभासचा सल्ला घेतल्याचेही दिग्दर्शकाने सांगितले.

Salaar got an A certificate from the Censor Board
सालारला 'ए' प्रमाणपत्र मिळाल्यानंतर दिग्दर्शक नाराज
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 20, 2023, 5:05 PM IST

मुंबई - Salaar got an A certificate from the Censor Board : प्रभासच्या आगामी अ‍ॅक्शन ड्रामा 'सालार' चित्रपटाला (CBFC) कडून 'ए' प्रमाणपत्र मिळाले आहे. प्रभासचा चाहता वर्ग 18 वर्षा खालील मुलांमध्ये मोठा असल्याने त्यांना हा निर्णय आवडणारा नाही. खरंतर सेन्सॉर बोर्डाने सुचवलेल्या बदलांचे पालन करून चित्रपट निर्मात्यांना U/A प्रमाणपत्र मिळू शकले असते. परंतु चित्रपटाचा दिग्दर्शक प्रशांत नीलने नमूद केले की, सीन्सवर कात्री चालवली तर कथानकावर त्याचा परिणाम होऊ शकतो.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

एसएस राजामौली यांच्याशी भेटीमध्ये टीम 'सालार' चित्रपटाच्या टीमने निर्मितीतील यापूर्वी कधीही शेअर न केलेले किस्से उघड केले. मुलाखतीदरम्यान, एसएस राजामौली यांनी सालारला 'ए' प्रमाणपत्र मिळाल्याबद्दल प्रशांत नीलचे म्हणणे विचारले. आपले मत व्यक्त करताना प्रशांतने सांगितले की, "चित्रपट हिंसक बनवून त्याला 'ए' प्रमाणपत्र मिळवण्याचा कोणताही हेतु समोर ठेवला नव्हता."

चित्रपट निर्मात्याने स्पष्ट केले की गेल्या 30 वर्षांपासून प्रेक्षकांमध्ये प्रभास लोकप्रिय आहे. आजवरच्या त्याने केलेल्या अ‍ॅक्शनला प्रेक्षकांनी पसंत केले आहे. त्यामुळे त्याचा दर्जा आणखी उंचावण्याचे ध्येय समोर ठेवून 'सालार' चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.

दिग्दर्शक प्रशांत नील यांनी सांगितले की चित्रपटाला 'U/A' प्रमाणपत्र मिळावे यासाठी सेन्सॉर बोर्डाने खूप सीन्सवर कात्री चालवण्यास सांगितले होते. त्यातील काही सीन्स कमी करण्याची तयारी होती मात्र काही सीन्स आवश्यक होते. हे सीन्स काढले तर चित्रपटाच्या कथेशी तडजोड झाली असती. प्रमाणपत्रावर विचार करताना, प्रशांत नीला म्हणाले, "मी खूप निराश झालो. मी जवळजवळ 15-20 मिनिटे शांतपणे बसलो कारण मला माहित आहे की मी हिंसाचारासह अश्लील किंवा असंवेदनशील चित्रपट बनवलेला नाही. ही सर्व आवश्यक हिंसा 'सालार'मध्ये एकत्रित केली आहे."

'सालार'मधील हिंसाचाराचा बचाव करताना प्रशांतने कथनाचे महत्त्व पटवून दिले, "हा चित्रपट मैत्री आणि त्याग यावर आधारित आहे." त्याने प्रभासच्या व्यक्तिरेखेचे सविस्तर वर्णन करताना सांगितले की तो सांसारिक बाबींमध्ये रस नसलेला व्यक्ती आहे. परंतु परिस्थिती त्याला असे करण्यास भाग पाडते.

सालारसाठी 'ए' प्रमाणपत्राबाबत माहिती मिळाल्यावर प्रशांतने ताबडतोब प्रभासचा सल्ला घेतला. कारण त्याला मुलं खूप मोठ्या प्रमाणावर फॉलो करतात आणि ते हा चित्रपट पाहू शकणार नाहीत. चित्रपटाच्या निर्मात्याने यावर भर दिला की कथेला अशा सीक्वेन्सची आवश्यकता आहे. प्रभासनेही सेन्सॉरची मार्गदर्शक तत्त्वे समजून घेतल्याची कबुली दिली, कारण तो देखील 'सालार'सारखा चित्रपट त्याच्या स्वतःच्या मुलांसाठी योग्य आहे की नाही याचा विचार करत होता. अखेर त्यांनी 'ए' प्रमाणपत्र घेण्याचा निर्णय घेताल

'सालार' हा दोन भागांचा चित्रपट आहे जो खानसार या काल्पनिक शहरात सेट करण्यात आला आहे. 'केजीएफ' आणि 'कांतारा' सारख्या भव्य चित्रपटाची निर्मिती केलेल्या होंबाळे फिल्सच्या बॅनरखाली याची निर्मिती करण्यात आली आहे. 22 डिसेंबर रोजी हिंदी, तमिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नडमध्ये हा चित्रपट रिलीज होत आहे. या चित्रपटात प्रभास, पृथ्वीराज सुकुमारन, श्रृती हासन, बॉबी सिम्हा आणि जगपती बाबू प्रमुख भूमिकेत आहेत.

हेही वाचा -

  1. 2023 या वर्षातील सर्वात वादग्रस्त बॉलिवूड आणि साऊथ चित्रपट
  2. संदीप रेड्डी वंगाने दिले 'अ‍ॅनिमल पार्क'च्या संभाव्य शुटिंग शेड्यूलचे संकेत
  3. सोहेल खानचा वाढदिवस साजरा केल्यावर सलमान खान पॅप्सवर चिडला, पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.