लॉस एंजेलिस - अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि लेखक क्वेंटिन टॅरँटिनो यांनी किल बिल व्हॉल्यूम 3 वर काम करत असल्याच्या बातम्या खऱ्या नसल्याचे म्हटलंय. २०१९ मध्ये टॅरँटिनो म्हणाले होते की किल बीलचा सीक्वेल बनवण्याबद्दल कल्ट मार्शल आर्ट्स फ्रँचायझीच्या स्टार उमा थर्मनशी बातचीत केली होती. बर्याच चाहत्यांना आशा होती की चित्रपट निर्माता टॅरँटिनो किल बिल मालिकेला पुन्हा भेट देईल आणि आगामी संभाव्य सिक्वेलमध्ये थर्मनची मुलगी आणि स्ट्रेंजर थिंग्ज स्टार माया हॉकेला कास्ट करेल.
किल बीलचा तिसरा भाग येणार नसल्याचे स्पष्ट संकेत - एका नवीन मुलाखतीत, टारँटिनो यांनी त्याच्या आगामी 10 व्या चित्रपटाचे दिग्दर्शन केल्यानंतर निवृत्त घेणार असल्याचे निश्चित केले आहे. त्यांनी किल बिल: व्हॉल्यूम 3 करणार नसल्याचेही सांगितले होते. याविष्यी बोलताना क्वेंटिन टॅरँटिनो यांनी सांगितले की, 'मला ते दिसत नाही. माझा शेवटचा चित्रपट समीक्षा, पुरुष समीक्षकाचा आहे. आणि तो 70 च्या दशकाच्या पार्श्वभूमीवरील आहे'. गेल्या वर्षी, थर्मनने तिसऱ्या किल बिल चित्रपटाच्या शक्यतोबद्दल बोलताना सांगितले होते की, 'मी तुम्हाला याबद्दल काहीही सांगू शकत नाही. मला असे म्हणायचे आहे की बऱ्याच वर्षांपासून यावर चर्चा केली जात आहे. याबद्दल फार वर्षापूर्वी एकदा खरंतर विचार झाला होता. मला ते घडेल अशी शक्यता तुर्तास तर लगेच दिसत नाही', असे ती म्हणाली. किल बिलचे पहिले दोन भाग, २००३ आणि २००४ मध्ये परत-परत रिलीज झाले होते, यामध्ये थर्मनला वधूच्या भूमिकेत दाखवले होते. तिला व तिच्या न जन्मलेल्या मुलाची हत्या करण्याचा कट रचणाऱ्याच्या विरोधात लढणाऱ्या महिलेची भूमिका तिने साकारली होती.
काय आहे किल बील? - किल बील भाग १ हा २००३ चा अमेरिकन मार्शल आर्ट चित्रपट क्वेंटिन टॅरँटिनो यांनी दिग्दर्शित केला होता. यात वधूच्या व्यक्तीरेखेत असलेली उमा थरमन तिचे जुने सहकारी आणि त्यांचा पुढारी बील यांचा बदला घेण्यासाठी पोटून उठताना दिसते. दोघांच्यात संघर्ष होता आणि तिला मृत समजून ते तिला सोडून देतात. पुढे ती टोकियोला जाते आणि तिचा सामना याकुझाशी होतो. किल बील हा चित्रपट बनवताना सीक्वेलचा विचार नव्हता. एकच चित्रपट बनवताना शूट झालेले सीन्स मोठे झाले होते. त्यांना कात्री न लावता दिग्दर्शक टॅरँटिनोने ही कथा दोन भागात सादर केली. पहिल्या भागाला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर सहा महिन्यांनी दुसरा भाग रिलीज करण्यात आला आणि दोन्ही भागांना प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. त्यानंतर किल बीलचा तिसरा भाग येणार अशी चर्चा गेल्या २० वर्षात अनेकदा रंगली. अखेरीस दिग्दर्शक टॅरँटिनो यांनी ही चर्चा फोल असल्याचे आता जाहीर करुन टाकले आहे.
हेही वाचा -
१. SatyaPrem Ki Katha News : 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाच्या कमाईची बॉक्स ऑफिसवर घसरण...
३. Mrunal Thakurs first look : नानी ३० मधील मृणाल ठाकूरच्या फर्स्ट लूकने इंटरनेटवर धुमाकूळ