ETV Bharat / entertainment

'फायटर'च्या शूटिंग सेटवरील हृतिक रोशनचा व्हिडिओ व्हायरल ; पाहा व्हिडिओ - फायटर चित्रपट

Deepika and Hrithik BTS Pic : 'फायटर' चित्रपटच्या शूटिंग सेटवरील अभिनेता हृतिक रोशन एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तो 'शेर खुल गए' या गाण्यावर नाचताना दिसत आहे.

Deepika and Hrithik  BTS Pic
हृतिक आणि दीपिकाचा बीटीएस फोटो
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 19, 2023, 1:01 PM IST

मुंबई - Deepika and Hrithik BTS Pic : अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण स्टारर 'फायटर' चित्रपट 25 जानेवारी 2024 रुपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे. काही दिवसांपूर्वीच निर्मात्यांनी या चित्रपटामधील 'शेर खुल गए' हे पहिलं गाणं रिलीज केलं होतं. 'शेर खुल गए' हे पार्टी साँग आहे. 'फायटर' या चित्रपटातील हे गाणं चाहत्यांना खूप आवडलं. दरम्यान आता या गाण्याच्या शूटिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या चित्रपटाची वाट चाहते खूप आतुरतेनं पाहत आहे. 'फायटर'मध्ये हृतिक आणि दीपिका अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसणार आहेत.

हृतिक रोशनचा व्हिडिओ व्हायरल : 'फायटर' कोरिओग्राफर बॉस्को मार्टिसनं हृतिक रोशन आणि टीमसोबत टिपलेले क्षण इंस्टाग्रामवर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं , 'शेर खुल गए हृतिक रोशन आणि माझी टीम सिद्धार्थ आनंद, सचित पाउलोस, रजत पोद्दार यांच्यासोबत कॅप्चर केलेला शूटिंगचा एक बीटीएस (BTS) क्षण''. व्हिडिओमध्ये हृतिक गाण्याच्या तालावर डान्स करताना दिसत आहे. व्हि़डिओत या गाण्याचा कोरिओग्राफर संपूर्ण टीम हृतिकचं कौतुक करत असल्याचं दिसत आहे. याशिवाय हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांचा कोरिओग्राफर बॉस्को मार्टिससोबतचा 'शेर खुल गए'च्या सेटवरील एक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हृतिक आणि दीपिकाचा फोटो : या फोटोमध्ये हृतिक आणि दीपिका काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहेत. तिघेही हसत हसत कॅमेरासमोर पोझ देताना दिसत आहेत. 'फायटर' निर्मात्यांनी 15 डिसेंबर रोजी 'शेर खुल गए' पार्टी गाणे रिलीज केलं होतं. गाण्यात हृतिक आणि दीपिका पार्टीमध्ये अप्रतिम डान्स करताना दिसत आहेत. हे गाणं कुमार यांनी लिहिलं असून विशाल ददलानी, बेनी दयाल, शेखर आणि शिल्पा राव या संगीतकारांनी संगीतबद्ध केलं आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केलंय. हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणच्या वर्क्रफंटबद्दल बोलायचं झालं तर हृतिक 'वॉर 2' आणि 'क्रिश 4'मध्ये दिसणार आहे. दुसरीकडे दीपिका 'सिंघम 3' आणि कल्कि 2898 एडीमध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. 'अ‍ॅनिमल'नं बॉक्स ऑफिस कलेक्शनने केला 500 कोटीचा आकडा पार
  2. रजनीकांत स्टारर 'लाल सलाम'मधील पहिलं धमाल गाणं लॉन्च
  3. लंडनमधील मादाम तुसाद संग्रहालयात रणवीर सिंगनं त्याच्या मेणाच्या पुतळ्यासोबत दिली पोझ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.