ETV Bharat / entertainment

Hrithik Roshan and Saba Azad: सोशल मीडियावर हृतिक रोशन आणि सबा आझाद झाले ट्रोल... - ह्रदान रोशन

Hrithik Roshan and Saba Azad: हृतिक रोशन आणि सबा आझाद दोघेही रात्री स्पॉट झाले. हे जोडपे डिनर डेटसाठी गेले होते. यावेळी हृतिकसोबत त्याची मुलं देखील होती. दरम्यान आता सोशल मीडियावर हृतिक आणि सबाला ट्रोल केले जात आहे.

Hrithik Roshan and Saba Azad
हृतिक रोशन आणि सबा आझाद
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 2, 2023, 11:30 AM IST

मुंबई - Hrithik Roshan and Saba Azad: बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशन सध्या त्याच्या चित्रपटासाठी नाही तर त्याच्या नात्यामुळे खूप चर्चेत आहे. तो आणि त्याची गर्लफ्रेंड सबा आझाद नेहमीच एकत्र स्पॉट होतात. हृतिक हा त्याच्यापेक्षा 12 वर्षांनी लहान असलेल्या सबाला डेट करत आहे. हे लव्हबर्ड त्यांच्या लव्ह लाईफमुळे अनेकदा प्रकाशझोतात येतात. अनेकवेळा या कपलला सोशल मीडिया ट्रोल देखील केले जाते. दरम्यान आता या जोडप्याला पुन्हा एकदा ट्रोल करण्यात आले आहे. काल रात्री हृतिक रोशन आणि सबा आझाद डिनर डेटसाठी बाहेर गेले होते. हृतिक रोशनची दोन मुले रिहान आणि ह्रदानही त्याच्यासोबत होती. हृतिक रोशनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लोक या व्हिडिओवर खूप कमेंट करत आहेत.

हृतिकने गर्लफ्रेंड सबा आझादचा हात पकडला : हृतिक रोशन या व्हिडिओमध्ये पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट, खाकी पॅन्ट आणि पांढऱ्या शूजमध्ये खूप डॅशिंग दिसत आहे. तर सबा आझाद निळ्या रंगाच्या ड्रेस आणि स्नीकर्समध्ये दिसत आहे. याशिवाय रिहानने काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि पँट घातला आहे, तर हृदानने पांढरा टी-शर्ट आणि राखाडी पँट परिधान केली आहे. यासह या दोघांनी पांढऱ्या रंगाचे शूज घातले आहे. व्हिडिओमध्ये हृतिक रोशन त्याची गर्लफ्रेंड सबा आझादचा हात धरून तिला आपल्यासोबत कारमध्ये घेऊन जात असल्याचे दिसत आहे. तसेच हृतिकची दोन्ही मुले वडिलांच्या मागे जाताना दिसत आहेत.

हृतिक झाला ट्रोल : हृतिकच्या या व्हिडिओवर अनेक यूजर खूप कमेंट करत आहे. एका यूजरने या व्हिडिओवर कमेंट करत लिहले, 'मुलींमध्ये हृतिकची निवड पूर्णपणे हास्यास्पद आहे'. तर दुसऱ्या यूजरने लिहले, 'ती लहान मुलगी आहे का जिला सतत हात धरून चालावे लागते?' तसेच काही हृतिकच्या चाहत्यांनी या जोडीचे कौतुक केले आहे. हृतिक रोशन शेवटी 'विक्रम वेधा' या चित्रपटात दिसला होता, जो साऊथ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. आता लवकरच तो 'फायटर' चित्रपटात दिसणार आहे. सध्या सोशल मीडियावर या चित्रपटाबाबत खूप चर्चा सुरू आहे. चित्रपटात हृतिक रोशनसोबत दीपिका पदुकोणही दिसणार आहे. हा चित्रपट 25 जानेवारी 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

  1. Vijay Varma schools paparazzi : मर्यादा ओलंडणाऱ्या पापाराझीचा विजय वर्माने घेतला क्लास, तमन्नानेही सांगितली खटकणारी गोष्ट
  2. Jawan advance booking : 'जवान'चा पहिल्या दिवशी पहिला शो पाहणार ८५ हजार चाहते; अ‍ॅडव्हान्स बुकिंगला अफाट प्रतिसाद
  3. Anurag Kashyap sensational disclosure : सलमानच्या चित्रपटासाठी हटवला गेला 'गँग्स ऑफ वासेपूर', अनुराग कश्यपचा सनसनाटी खुलासा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.