ETV Bharat / entertainment

'फायटर' चित्रपटाचा टीझर होणार 'या' तारखेला रिलीज

Fighter Movie : 'फायटर' चित्रपटाचा टीझर लवकरच रिलीज होणार आहे. हा चित्रपट 2024 वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित होईल.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 25, 2023, 2:28 PM IST

Fighter Movie
फायटर चित्रपट

मुंबई - Fighter Movie : हृतिक रोशन, दीपिका पदुकोण स्टारर एरियल अ‍ॅक्शन 'फायटर' चित्रपटाची वाट पाहत असलेल्या चाहत्यांसाठी एक मोठे अपडेट समोर आली आहे. आता 'फायटर'च्या टीझरची रिलीज डेट समोर आली आहे. बॉलिवूडमधून एकापाठोपाठ एक अ‍ॅक्शन आणि थ्रिलर चित्रपट येत असताना 2024 वर्षाची सुरुवात 'फायटर' चित्रपटानं होणार आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यास फारसा वेळ उरलेला नाही. याआधी चित्रपटाच्या पोस्टर्सनी खळबळ उडवून दिली होती. आता या चित्रपटाचा टीझर 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. अद्याप याबद्दलची पुष्टी या चित्रपटाच्या निर्मात्यांनी केलेली नाही.

'फायटर' टीझर : शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणसोबत ब्लॉकबस्टर चित्रपट करणारे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदनं 'फायटर'चं दिग्दर्शन केलं आहे. 'फायटर'चं अर्ध्याहून अधिक काम पूर्ण झाले असून सध्या चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनचे काम सुरू आहे. हा चित्रपट वायकॉम 18 नेटवर्कच्या बॅनरखाली बनवला गेला आहे. सिद्धार्थ आनंद सोबत ज्योती देशपांडे, अजित अधेरे, ममता आनंददास, रेमन छिब आणि अंकू पांडे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 'फाइटर' मध्ये हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण व्यतिरिक्त अनिल कपूर, करण सिंग ग्रोव्हर, अक्षय ओबेरॉय, तलत अझीझ आणि इतर कलाकार आहेत. हा देशातला पहिला एरियल अ‍ॅक्शन चित्रपट आहे. 25 जानेवारी 2024 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाद्वारे पहिल्यांदाच दीपिका आणि हृतिक एकत्र काम करत आहेत. दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदसोबत हृतिकचा हा दुसरा चित्रपट आहे. त्यानं यापूर्वी टायगर श्रॉफसोबत 'वॉर'मध्ये काम केलं होतं.

'फायटर' चित्रपटचं बजेट : 'फाइटर' 250 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला चित्रपट आहे. आता सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून देणार असल्याचं दिसत आहे. या चित्रपटामध्ये हृतिक अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसेल . हृतिकच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर तो 'वॉर 2'मध्ये कियारा अडवाणी अडवणीसोबत दिसणार आहे. हा चित्रपट 2024मध्ये रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होईल. याशिवाय तो 'क्रिश 4'मध्ये देखील झळकणार आहे. 'फायटर' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 'पठाण' सारखी जादू दाखवेल की नाही हे पाहणं लक्षणीय ठरणार आहे.

हेही वाचा :

  1. बॉबी देओलसोबत 'बदतमीज दिल' गाण्यावर थिरकल्यानंतर रणबीर कपूरनं केली 'ही' विनंती
  2. अखेर प्रतीक्षा संपली! कंतारा : चॅप्टर 1 चा फर्स्ट लूक होणार लॉन्च
  3. 'बाळाचा बाप कोण?' हे सांगणारा फोटो शेअर करुन इलियाना डिक्रूझनं केलं चकित

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.