मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी सर्व सण उत्साहात साजरे करण्यासाठी ओळखली जाते. गणेशोत्सवापासून नवरात्री आणि दिवाळीपर्यंत, शिल्पा तिच्या घरी सण-उत्सवाने वातावरण भारुन सोडते. यंदाची होळीही तिने दणक्यात साजरी केली आहे. शिल्पाने काल रात्री घरी होलिका दहन केले आणि आज ती तिच्या मुलांसोबत रंगांचा सण साजरा करण्यात गुंतली आहे.
सोशल मीडियावर शिल्पाने तिच्या होळी सेलिब्रेशनचा व्हिडिओ टाकला आहे. अभिनेत्री शिल्पा निळ्या रंगाचा फ्लेर्ड पॅन्ट आणि प्रिंटेड दुपट्ट्यासह मरून कुर्ता परिधान केलेली दिसत आहे. रंग बाजूला ठेवून शेट्टी यांनी होळीच्या उत्सवात फुलांची भर घातली आहे. अभिनेत्री शिल्पाने तिचा मुलगा, विआन राज कुंद्रा आणि मुलगी, समिशा शेट्टी कुंद्रा यांच्यासोबत होळीचा आनंदाचा काळ घालवला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
शिल्पाने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, आई आणि मुले त्यांच्या बागेत होळी खेळताना दिसत आहेत तर पार्श्वभूमीत अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांच्या बागबानमधील होरी खेले रघुवीरा हे होळीचे गाणे वाजत आहे. व्हिडिओ शेअर करत शिल्पाने तिच्या चाहत्यांना आणि फॉलोअर्सना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शिल्पाच्या होळीच्या सेलिब्रेशनच्या व्हिडिओला सोशल मीडियावर खूप प्रेम मिळाले तर काही युजर्सनी होळी उत्सवादरम्यान तिचा पती राज कुंद्राच्या अनुपस्थितीकडे लक्ष वेधले आहे.
राज कुंद्रावर गेल्या काही काळापासून संकट आले होते. अश्लिल चित्रपटांच्या निर्मितीच्या केसमध्ये तो अटकेत होता. त्यामुळे गेली दोन वर्षे शिल्पाच्या घरातील होळीचा रंग खुलला नव्हता. मात्र ही सारी कसर तिने यंदाच्या होळीत भरुन काढलेली दिसत आहे. या व्हिडिओत राज कुंद्रा जरी दिसत नसला तरी तो त्यांच्यासोबत आहे हे मात्र निश्चित.
वर्क फ्रंटवर, शिल्पा पुढे स्त्री-केंद्रित सुखी चित्रपटात दिसणार आहे. सोनल जोशी दिग्दर्शित, हा आगामी चित्रपट अबंडंटिया एंटरटेनमेंट आणि टी-सिरीज यांनी संयुक्तपणे निर्मिती केला आहे. शिल्पा रोहित शेट्टीच्या आगामी वेब सीरिज इंडियन पोलिस फोर्समधून ओटीटी पदार्पण करणार आहे. तसेच सिद्धार्थ मल्होत्रा आणि विवेक ओबेरॉय यांचा समावेश असलेले, इंडियन पोलीस फोर्स अमेझॉन प्राईम व्हिडिओवर स्ट्रीम करेल.
हेही वाचा - Salman Khan Wish Fans On Holi : सलमान खानच्या होळीच्या पोस्टवर चाहत्यांचा जल्लोष