ETV Bharat / entertainment

R Madhavans birthday : उत्कृष्ट अभिनेता ते सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, आर माधवनचा चढता प्रवास - रॉकेट्री

अभिनेता आर माधवनचा चित्रपटसृष्टीतील प्रवास अनन्यसाधारण राहिला आहे. त्याने आपल्या अष्टपैलू प्रतिभेने लाखो मने जिंकली. अलिकडेच अबुधाबीत पार पडलेल्या आयफा २०२३ मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार आर माधवनला मिळाला. त्याच्या वाढदिवसानिमित्य त्याच्या कारकिर्दीवर एक नजर टाकूयात.

R Madhavans birthday
आर माधवन
author img

By

Published : May 31, 2023, 5:55 PM IST

मुंबई - तामिळ आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आर माधवनचा अभिनय प्रवास खास राहिला आहे. एक अभिनेता म्हणून त्याने अष्टपैलुत्व दाखवत विविध प्रकारच्या व्यक्तीरेखा पडद्यावर साकारल्या आहेत. अलिकडेच त्याने दिग्दर्शित केलेला आणि भूमिकाही साकारलेला रॉकेट्री चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली. या चित्रपटातून त्याने एक बहुप्रतिभावान अभिनेता म्हणून स्वतःचे स्थान भक्कम केले. १ जून रोजी तो ५३ व्या वर्षात पदार्पण करणार आहे. त्यामुळे त्याच्या वाढदिवसानिमित्य अष्टपैलुत्वावर एक नजर टाकूयात.

R Madhavans birthday
रेहना है तेरे दिल में

रेहना है तेरे दिल में

'रेहना है तेरे दिल में' या चित्रपटामधील मॅडीच्या भूमिकेमुळे त्याने कायमची छाप सोडली आणि प्रेक्षकांना त्याच्या पात्राच्या प्रेमात पाडले. मॅडीची सुरुवात एक निश्चिंत आणि खोडकर महाविद्यालयीन विद्यार्थी म्हणून होते, परंतु दिया मिर्झाची भूमिका साकारलेल्या रीना मल्होत्राच्या प्रेमात पडल्यावर त्याच्या आयुष्यात एक वळण येते. माधवनच्या ब्रॅटच्या बाजूकडून मॅडीच्या पात्राच्या रोमँटिक बाजूकडे बदल झाल्यामुळे प्रेक्षक त्यांच्या प्रेमकथेत भावनिक गुंतवले गेले. सच कह रहा है हे गाणे भावनिक गडबड सुंदरपणे टिपते. माधवनच्या चॉकलेट बॉय इमेजमुळे त्याचे पात्र जीवंत झाले. त्याचा हा एक हृदयस्पर्शी चित्रपट ठरला होता.

R Madhavans birthday
तन्नू वेड्स मन्नू

तन्नू वेड्स मन्नू

या रोमँटिक-कॉमेडी नाट्यमय चित्रपटात माधवनने मनूच्या भूमिकेत अनिवासी भारतीय डॉक्टरचा उत्कृष्ट अभिनय सादर केला. प्रेमाच्या त्रिकोणात अडकलेल्या एका साध्या, सौम्य स्वभावाच्या डॉक्टरच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले. माधवनने ही व्यक्तिरेखा सहज आणि प्रामाणिकपणाने जिवंत केली. मनूच्या भावना आणि अनुभवांचे बारकावे चित्रित करण्यात त्याच्या प्रामाणिकपणाने आणि कठोर परिश्रमाचे फळ मिळाले, कारण चाहते त्या पात्राकडे आकर्षित झाले आणि त्याच्या प्रेमात पडले. तनुची भूमिका साकारणारी माधवन आणि कंगना राणौत यांच्यातील केमिस्ट्रीचेही खूप कौतुक झाले. त्यांची ऑन-स्क्रीन जोडी आणि त्यांच्या नात्यातील गतिमानता यामुळे कथेत अधिक खोलवर भर पडली. मनूचे अखंड प्रेम आणि अंतर्गत संघर्ष व्यक्त करण्याची माधवनची क्षमता या चित्रपटांच्या यशात कारणीभूत ठरले.

R Madhavans birthday
थ्री एडियट

थ्री एडियट

या ब्लॉकबस्टर कॉमेडी-ड्रामामध्ये माधवनने भूमिका केलेली फरहान कुरेशी हा रॅंचो (आमिर खान) आणि राजू (शरमन जोशी) यांच्यासोबत चित्रपटातील तीन मुख्य नायकांपैकी एक आहे. फरहान कुरेशीचे पात्र एक प्रतिभावान आणि उत्कट महत्त्वाकांक्षी छायाचित्रकार म्हणून दाखवले गेले. घरच्या बदाबावामुळे तो आपली खरी आवड बाजूला ठेवून इंडिनिअरिंगचे शिक्षण घेत असतो. आयुष्यात खरी आवड शोधणे आणि लादलेल्या अपेक्षांना नकार देणे किती आवश्यक आहे यावर चित्रपटात भाष्य करण्यात आले होते.

R Madhavans birthday
साला खडूस

साला खडूस

साला खडूस हा चित्रपट अभिनेता म्हणून माधवनच्या अष्टपैलुत्वाचा पुरावा आहे. हा चित्रपट आदि तोमरच्या व्यक्तिरेखेभोवती फिरतो, जो एक अयशस्वी बॉक्सर बनून बॉक्सिंग प्रशिक्षक बनतो आणि प्रतिभावान तरुण महिला बॉक्सरला प्रशिक्षण देतो. बॉक्सरच्या भूमिकेत त्याने अक्षरशाः प्राण फुंकले होते. एक जबरदस्त उर्जा बाळगून त्याने ही व्यक्तीरेखा साकारली होती. या चित्रपटातून त्याने वैविध्यपूर्ण आणि आव्हानात्मक भूमिका घेऊ शकतो हे सिद्ध केले.

R Madhavans birthday
रॉकेट्री

रॉकेट्री

आर माधवनने केवळ मुख्य भूमिकेतच नाही तर चित्रपटाचा दिग्दर्शक आणि सहलेखक म्हणूनही स्वतःला सिद्ध केले आहे. हा चित्रपट माधवनसाठी एक महत्त्वकांक्षी प्रोजेक्ट होता. काही वर्षा त्याने स्वतःला यासाठी झोकून देऊन काम केले. या चित्रपटात माधवनने साकारलेली नंबी नारायणनची भूमिका साकारणे अत्यंत अपेक्षित होते. नंबी नारायणनच्या जीवनातील विविध टप्प्यांमध्ये विविध रूपे दाखवून या व्यक्तीरेखेला त्याने मूर्त रुप दिले. अलिकडेच अबुधाबीत पार पडलेल्या आयफा २०२३ मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार आर माधवनला मिळाला.

हेही वाचा -

१ ) - Kk 1st Death Anniversary : केके ची पहिली पुण्यतिथी, गायकाच्या मृत्यूमागील ५ कारणे

२) - Kabir Khans Next Directorial : कबीर खानच्या आगामी चित्रपटात कार्तिक आर्यनसोबत झळकणार भुवन अरोरा

३ ) - Sonu Sood International School : सोनू सूद तर्फे बिहारमधील अनाथ मुलं जाणार इंटरनॅशनल स्कूलमध्ये!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.