ETV Bharat / entertainment

Hemant Dhome : 'रॉकी और रानी...'मध्ये क्षिती जोगला पाहून हेमंत ढोमेला झाले आकाश ठेंगणे!! - आलिया भट्ट

रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटामध्ये मराठी अभिनेत्री क्षिती जोगने रणवीर सिंहच्या आईची भूमिका साकारली आहे. यासाठी तिचे चोहीकडून कौतुक होत आहे. दरम्यान आता क्षितीसाठी एक खास पोस्ट तिच्या नवऱ्याने लिहीली आहे.

Hemant Dhome And kshitee jog
हेमंत ढोमे आणि क्षिती जोग
author img

By

Published : Jul 29, 2023, 12:04 PM IST

Updated : Jul 29, 2023, 12:19 PM IST

मुंबई : रणवीर सिंग आणि आलिया भट्ट स्टारर 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपट बॉक्स ऑफिसवर २८ जुलै रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट रूपेरी पडद्यावर चांगली कमाई करत असून या चित्रपटामध्ये एक मराठमोळा चेहरा देखील दिसला आहे. या चित्रपटात मराठीतील आघाडीची अभिनेत्री क्षिती जोग महत्त्वाच्या भूमिकेत आहे. क्षिती ही मराठी चित्रपट दिग्दर्शक, अभिनेता हेमंत ढोमेची पत्नी आहे. क्षिती जोग हिच्या अभिनयाचे कौतुक करत हेमंत ढोमेने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यापूर्वी देखील क्षितीने बऱ्याच मराठी मालिकामध्ये आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे, मात्र 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट तिच्यासाठी मोठी संधी देऊन गेला. यातील तिच्या भूमिकेचे प्रेक्षक कौतुक करत आहेत.

हेमंत ढोमेने पत्नी क्षिती जोगसाठी शेअर केली पोस्ट : दरम्यान आता क्षिती जोगचा पती हेमंत ढोमेने तिचे खूप कौतुक करत एक तिच्यासाठी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहीले, पाटलीणबाई, आज तुझ्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा दिवस! करण सरांच्या ॲाफिस मधून फोन आल्याचं तू मला सांगितलंस आणि घाईघाईत लुक टेस्ट आणि त्यांच्याबरोबरची तुझी मिटींग आणि तारखा आणि बाकी सगळे ठरले, बघता बघता सिनेमाचे शूट झाला. हा सगळा प्रवास मी जवळून पाहिला. प्रीमियर शो ला तुझ्या सोबत आलो 'He is my husband!' अशी तू सगळ्यांना ओळख करून देत होतीस… काय भारी फिलींग होतं ते! त्या शो नंतर कोण कोण येऊन तुझे कौतुक करत होते… काय कमाल वाटत होतं!

हेमंतने केले क्षितीचे कौतुक : हेमंतने पुढे लिहीले, आज आपण आपल्या मित्रांसोबत सिनेमा पाहिला… तुझे काम आज पुन्हा एकदा बारकाईने बघत होतो! तुझी आजवरची मेहनत, स्वतःच्या जीवावर सारं काही करण्याची जिद्द हळूहळू फळाला येतेय… सिनेमा संपल्यावर गर्दीतून लोक तुला भेटायला आले आणि त्या साऱ्यांनी तुझ्यासाठी टाळ्या वाजवल्या…त्या टाळ्या कधी संपूच नयेत असं वाटत राहिलं… तुझं कौतुक कधीच थांबू नये असं वाटत राहिलं… हे सारं मी साठवून ठेवलंय कायमचं आणि आज तुला आवडत नसताना ही पोस्ट लिहीतोय… इतक्या भव्य दिव्य सिनेमात, एवढ्या मोठ्या नटांमधे, त्या सगळ्या झगमाटात तू लख्ख चमकत होतीस… तुझ्या कामाने! कमाल! क्षिती मला तू कायमंच आनंद दिलायस पण #rockyaurranikipremkahani या चित्रपटाबद्दल Thank you! आपणच हे सारे केलंय, हे सग्गळे आपलेच यश आहे असं खुळ्यागत वाटणारा तुझा या जगातला सगळ्यात मोठा चाहता… हेमंत. खूप खूप मोठी हो, love you! (टिपः सिनेमा लवकरात लवकर बघा आपल्या क्षितीचे काम तुम्हाला नक्की आवडेल!), असे हेमंत पोस्टद्वारे क्षितीचे कौतुक केले.

क्षितीने चित्रपटात साकारली महत्वपूर्ण भूमिका : 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात रणवीर सिंग, आलिया भट्ट, शबाना आझमी, धर्मेंद्र, जया बच्चन यांच्यासह जबरदस्त स्टारकास्ट आहे. या चित्रपटात तिच्या पात्राचे नाव पूनम रंधावा आहे. दरम्यान, आता हेमंतच्या पोस्टवर अनेक चाहते कमेंटस् करत आहेत. या चाहत्यांनी चित्रपट पाहिला आणि ते क्षितीचे भरभरून कौतुक करत आहेत. हा चित्रपट येणाऱ्या काळात खूप कमाई करेल असे दिसत आहे.

हेही वाचा :

  1. Prabhas Facebook Account Gets Hacked : प्रभासचे फेसबुक अकाउंट झाले हॅक आणि पुढे काय घडले? जाणून घ्या...
  2. Guns and Gulaabs trailer : 'गन्स अँड गुलाब' ची पहिली झलक, दुल्कर सलमानने केली ट्रेलर रिलीजची घोषणा
  3. Bawaal under fire : ओटीटीवरुन 'बवाल' चित्रपट काढून टाका, ज्यू संघटनेची मागणी

Last Updated : Jul 29, 2023, 12:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.