ETV Bharat / entertainment

Hema Malini traveled by metro : ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी आधी केला मेट्रो प्रवास, मग घेतला ऑटोचा आनंद, पहा व्हिडिओ

अभिनेत्री ते राजकारणी बनलेल्या हेमा मालिनी यांनी मंगळवारी मुंबईतील मेट्रोने प्रवास केला. यानंतर त्यांनी ऑटोने देखिल प्रवास केला आणि इच्छित स्थळी पोहोचल्या. मेट्रो प्रवासाचे व्हिडिओ आणि पोस्ट त्यांनी शेअर केले आहेत.

Hema Malini traveled by metro
ड्रीम गर्ल हेमा मालिनी
author img

By

Published : Apr 12, 2023, 9:54 AM IST

Updated : Apr 12, 2023, 12:09 PM IST

मुंबई : मायानगरीतील अवजड वाहतुकीच्या समस्येतून सुटका करण्यासाठी प्रवाशांनी मेट्रोने प्रवास करणे पसंत केले आहे. सुप्रसिद्ध व्यक्तीही आपल्या आलिशान गाड्या सोडून मेट्रोने प्रवास करताना दिसत आहेत. अलीकडेच 'ड्रीम गर्ल' (1997) अभिनेत्री हेमा मालिनी मुंबई मेट्रोमध्ये दिसल्या होत्या.

  • I must share with all of you my unique, wonderful experience.Drove 2 hours to reach Dahisar by car, so tiring! In the eve decided I would try the metro, and OMG! What a joy it was!True, we went thro tough times during the constr, but worth it! Clean, fast & ws in Juhu in 1/2 hr💕 pic.twitter.com/2OZPMtORCu

    — Hema Malini (@dreamgirlhema) April 11, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेमा मालिनी यांनी केला मेट्रोने प्रवास : हेमा मालिनी यांनी मंगळवारी सोशल मीडियावर त्यांच्या मेट्रो प्रवासाची एक झलक शेअर केली. ज्यामध्ये त्यांनी सांगितले की, कारने मुंबईच्या उपनगरातील दहिसरपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना दोन तास लागले. त्यामुळे त्यांनी कारऐवजी मेट्रोने प्रवास करण्याचा निर्णय घेतला आणि वेळेवर पोहोचल्या. मेट्रोची पहिली पोस्ट शेअर करताना हेमा मालिनी यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, 'माझा अनोखा, अद्भुत अनुभव मी तुम्हा सर्वांसोबत शेअर केला पाहिजे. गाडीने दहिसरला पोहोचण्यासाठी २ तासांचा प्रवास केला, त्यामुळे दमछाक झाली. त्यानंतर मी मेट्रोने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. ओएमजी! किती आनंददायी होता. स्वच्छ आणि जलद मेट्रोने १/२ तासात जुहूला पोहोचले.

  • After my metro experience, decided to go by auto from DN Nagar to Juhu & that too was fulfilled. Landed by auto at my house & the dazed security could not believe their eyes! All in all, a wonderful, pleasurable experience for me!
    In the metro with the public👇 pic.twitter.com/Whr7mOIRM8

व्हिडिओ शेअर : मेट्रोमधील वातावरण कसे होते, याचा व्हिडिओही हेमा मालिनी यांनी शेअर केला आहे. त्याच दिवशी हेमा मालिनी यांनी ऑटो रिक्षातूनही प्रवास केला होता. व्हिडिओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मेट्रोच्या अनुभवानंतर मी डीएन नगर ते जुहू ऑटोने जायचे ठरवले आणि तेही पूर्ण झाले. घरी ऑटोतून उतरल्यावर माझ्या सिक्युरिटीचा त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. लोकांसोबत मेट्रोमध्ये प्रवास करणे, हा सगळा अद्भूत आणि आनंददायी अनुभव होता. अलीकडेच हेमा मालिनी व्यतिरिक्त अभिनेत्री नुसरत भरुचा आणि बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार देखील मेट्रो राईडचा आनंद लुटताना दिसले आहेत.

'या' चित्रपटात त्या शेवटच्या दिसल्या : ड्रीम गर्ल अभिनेत्री 70 च्या दशकात त्यांच्या अभिनय कौशल्यामुळे आणि अद्वितीय भूमिकांमुळे प्रसिद्ध झाली. नंतर त्यांनी अभिनेता धर्मेंद्रसोबत लग्न केले, ज्यांच्यासोबत त्यांनी 20 हून अधिक चित्रपट केले. तथापि त्यांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. 2020 मध्ये शिमला मिर्ची नावाच्या चित्रपटात त्या शेवटच्या दिसल्या आहेत.

हेही वाचा : Salman khan : सलमान खान पडद्यापुरतातरी आहे अत्यंत संस्कारी; जाणून घ्या काय म्हणाला भाईजान

Last Updated : Apr 12, 2023, 12:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.