ETV Bharat / entertainment

Happy birthday SRK : शाहरुखचा थक्क करणारा अष्टपैलू प्रवास, रोमान्स किंग बनला अ‍ॅक्शन स्टार - बॉलिवूडचा बादशाह

किंग खान आज त्याचा 58 वा वाढदिवस साजरा करत असताना, त्याची तीन दशकांचा प्रवासही रोमांचक आहे. आपल्यातील अभिनेत्याला त्यानं नेहमी आव्हान दिलंय. वेगवेगळ्या भूमिका साकारताना त्यानं आपली अभिनयक्षक्षमता पणाला लावल्याचं अनेक कलाकृतीवरुन दिसतं. यावरच एक नजर टाकण्याचा इथे प्रयत्न आम्ही केलाय.

Happy birthday SRK
रोमँटिक आयकॉन बनला अ‍ॅक्शन स्टार
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 2, 2023, 12:21 PM IST

Updated : Nov 2, 2023, 3:01 PM IST

मुंबई - शाहरुख खानची ओळख 'बॉलिवूडचा बादशाह' आणि 'रोमान्सचा किंग' अशी आहे. भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये अपारंपरिक भूमिका स्वीकारण्यासाठीही त्याला ओळखलं जातं. रोमँटिक हिरोच्या प्रतिमेच्या पलीकडं जाऊन त्यानं चित्रपटसृष्टीच्या पारंपरिक नियमांचं आणि त्याच्या स्वत:च्या वारशाचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्तिरेखा तो स्वीकारत आलाय. आज शाहरुख आपला 58 वा वाढदिवस साजरा करत असताना त्याच्या अष्टपैलू अभिनयक्षमतेनं आणि कलाकृतीच्या सीमा ओलांडण्याच्या इच्छेनं त्यानं तीन दशकाहून अधिक काळाच्या कलाप्रवासात आपलं एक अढळ स्थान कसं निर्माण केलंय, हे थोडं जाणून घेऊयात.

'रोमँटिक आयकॉन' बनला 'अ‍ॅक्शन स्टार' : शाहरुखनं पन्नाशी पार केल्यानंतरही आपला लूक आणि रोमँटिक भूमिकांवर लक्ष केंद्रीत ठेवलं. सिनेमॅटिक प्रेमकथांसाठी त्याच्या चाहत्यांनी त्याला नेहमी समर्थन दिलं. पन्नाशीच्या उत्तरार्धात त्यानं साहसी अ‍ॅक्शन भूमिका साकारत 'पठाण' आणि 'जवान' सारख्या अलीकडील हिट चित्रपटातून धाडसी झेप घेतली. यामुळे तो आपली रोमँटिक नायकाची प्रतिमा ओलांडू शकला आणि आयुष्याच्या या टप्प्यावर त्यानं आपलं महत्त्व वाढवलं.

आव्हानात्मक भूमिका: 'माय नेम इज खान' या 2010 मध्ये आलेल्या चित्रपटात शाहरुखनं एस्पर्जर सिंड्रोम असलेल्या रिजवान खानची आव्हानात्मक व्यक्तिरेखा साकारली होती. दिव्यांग व्यक्तीसमोरची आव्हानं, त्याच्या सूक्ष्म छटा आणि भाव त्याने अतिशय तडफेनं साकारला. त्याच्या या समर्पित कामाची दखल प्रेक्षकांसह समीक्षकांनीही घेतली. एका महत्त्वाच्या सामाजिक समस्येवर प्रकाश टाकणाऱ्या या चित्रपटाला आणि त्याच्या भूमिकेला अनेक पुरस्कारांनीही गौरवण्यात आलं.

एजिंग सुपरस्टार: 2016 मध्ये त्याचा 'फॅन' हा चित्रपट प्रदर्शित झाला. यात त्यानं एक सुपरस्टार आमि त्याचा वेडसर चाहता अशी दुहेरी भूमिका साकारली होती. स्वत:चं स्टारडम जपणाऱ्या स्वार्थी नायकाची ग्रे छटा असलेलं पात्र त्यानं साकारलं, तर त्याच वेळी इरेला पेटलेल्या चाहत्याची भूमिका करताना त्यानं अपारंपरिक स्क्रिप्ट्स निवडल्या. त्यावर त्यानं आपल्या अष्टपैलू अभिनयाचं प्रदर्शन करण्याचं धैर्य दाखवलं.

'डुप्लिकेट'मधील भूमिका : शाहरुख खानला अभिनयात प्रयोग करायला आवडतं. 1998 मध्ये आलेल्या 'डुप्लिकेट' या चित्रपटात त्यानं दुहेरी भूमिका साकारली होती. यातील एका पात्रानं केलेली तोतयागिरी, विनोद स्वीकारण्याची आणि पडद्यावर परावर्तित करण्याची त्याची क्षमता बॉलिवूडच्या सीमा ओलांडणारी होती.

प्रायोगिक सिनेमा: 2004 मध्ये आलेल्या शाहरुखच्या 'स्वदेस' चित्रपटानं त्याकाळात एक वेगळं परिवर्तन आणलं. यात त्यानं अनिवासी भारतीय नागरिकाची भूमिका साकारली होती. यात त्यानं साकारलेला हळवा तरुण संस्मरणीय ठरला. त्यानंतर 'चक दे' चित्रपटात त्याने एक महिला हॉकी संघाचा प्रशिक्षकाची भूमिका रूढीवादी पद्धतींना आव्हान देणारी होती.

नकारात्मक भूमिका: पारंपारिक नायकाच्या प्रतिमेतून बाहेर येत त्यानं 2006 मध्ये आलेल्या 'डॉन' चित्रपटात साकारलेली भूमिका एकदम वेगळी होती. 'डॉन'च्या भूमिकेत शाहरुखनं एक विद्युतीय करिष्मा दाखवला. त्याच्या कारकिर्दीला मिळालेला हा एक टर्निंग पॉइंट होता.

डार्क थीम्स : 1993 मध्ये आलेला मानसशास्त्रीय थ्रिलर 'डर' आणि मनोवैज्ञानिक नाट्य असलेला 'बाजीगर' या चित्रपटांनी शाहरुख खानच्या कारकिर्दीत महत्त्वपूर्ण बदल घडवून आणला. ध्यास आणि सूडाच्या छटांसह नैतिकदृष्ट्या अशी संदिग्ध व्यक्तिरेखा साकारणं हे त्या काळात एक धाडसी पाऊल होतं. आपल्या प्रतिमेचा, स्टारडमचा विचार न करता त्यानं हे पाऊल टाकलं आणि तो यशस्वीही झाला. 'डर', 'बाजीगर', 'अंजाम', 'रामजाने' या चित्रपटांनंतर हा कायम ग्रे शेडच रंगवणार काय, असा प्रश्न चित्रपटसृष्टीतून विचारला जाऊ लागला. तेव्हाच त्याने गियर बदलत रोमॅंटिक भूमिका साकारल्या. तिथे तो इतका यशस्वी झाला की, शाहरुख खान हा रोमॅंटिसिजमचा समानार्थी शब्द बनला. पुढे जे घडलं तो तर इतिहास आहे.

अपारंपरिक आणि आव्हानात्मक भूमिका स्वीकारण्याच्या इच्छेने शाहरुख खाननं चित्रपटसृष्टीतल्या सिनेमाची चाकोरी सातत्याने ओलांडली. एक सुपरस्टार कसा अष्टपैलू असू शकतो आणि वेगवेगळ्या भूमिका तो कसा लीलया साकारु शकतो, हे त्यानं दाखवून दिलं. 58 वा वाढदिवस साजरा करणाऱ्या किंग खानचा वारसा केवळ रोमान्सचा नाही तर जोखीम पत्करणारा आहे. त्यानं आता एक अ‍ॅक्शन स्टार म्हणूनही नवी ओळख निर्माण केलीय. स्टारडमचे नियम नव्याने परिभाषित करणाऱ्या या सुपरस्टारला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

हेही वाचा -

  1. Srk Birthday : मन्नत बाहेर दिवाळी : 'मी तुमच्या प्रेमाच्या स्वप्नात जगतो', म्हणत शाहरुखनं मानलं आभार

2. Dunki Teaser Released : शाहरुख खानचा बहुप्रतीक्षित 'डंकी'चा टीझर प्रदर्शित; प्रेक्षकांना भुरळ घालण्यासाठी किंग खान सज्ज

3. Bigg Boss 17 : अंकिता लोखंडे आणि ऐश्वर्या शर्मा यांनी बिग बॉसच्या घरात पतीसह साजरा केला करवा चौथ

Last Updated : Nov 2, 2023, 3:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.