ETV Bharat / entertainment

आलिया भट्टनं वाढदिवसानिमित्त बहिण शाहीन भट्ट्ला दिल्या शुभेच्छा - आलिया भट्ट दिल्या बहिण शाहीन भट्ट्ला शुभेच्छा

Alia Bhatt's Sister Birthday : अभिनेत्री आलिया भट्टची बहिण शाहीन भट्टचा आज वाढदिवस आहे. या खास प्रसंगी आलियानं काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत बहिणीला शुभेच्छा दिल्या आहेत.

Alia Bhatts Sister Birthday
आलिया भट्टच्या बहिणीचा वाढदिवस
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 28, 2023, 5:07 PM IST

मुंबई - Alia Bhatt's Sister Birthday : अभिनेत्री आलिया भट्टसाठी आज 28 नोव्हेंबर हा दिवस खूप खास आहे. या दिवशी तिची मोठी बहीण शाहीन भट्ट 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. खास प्रसंगी शाहीन भट्टनं रणबीर कपूर, बहीण आलिया आणि कुटुंबासह काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. दरम्यान या पोस्टवर अनेकांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. याशिवाय आलिया भट्टनं बहीण शाहीन भट्टला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आलियानं बहिणीसोबतचे चार फोटो शेअर केले आहेत , ज्यामध्ये एक बालपणीचा फोटो आहे. हा फोटो शेअर करून तिनं बालपणीच्या आठवणी ताज्या केल्या आहेत.

आलिया भट्टनं शेअर केले : आलियानं शेअर केलेल्या पोस्टवर अनेक चाहते प्रतिक्रिया देत आहेत आणि ते शाहीन भट्टला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. आलिया भट्टची मोठी बहीण शाहीन चित्रपटांच्या चकचकीत दुनियेपासून दूर आहे, परंतु सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते. आलियानं शेअर केलेल्या पोस्टवर कॅप्शनमध्ये लिहिलं, 'तू आनंददायी आहोस..तू प्रकाश आहेस....प्रत्येक आता आणि नंतर आपण भांडतही राहू...तू सुर्य किरणं आहेस, तू वाऱ्याची झुळूक आहेस...तू तुझ्या गुडघ्यांची काळजी घे...मी लेखकही नाही मी कविही नाही...मी केवळ तुझ्यावर प्रेम करणारी बहिण आहे आणि मला खात्री आहे की ते तुला माहित आहे., अशा आशयाची कविता तिनं शेअर केली आहे. आलियानं शेअर केलेल्या बालपणीच्या फोटोमध्ये शाहीन बहीण आलियाच्या केसांना विंचरताना दिसत आहे. तर बाकीच्या फोटोत त्यांची खोडकर शैली दिसत आहे.

आलिया भट्टची 'स्किनकेअर' गुरू : आलिया भट्ट आणि शाहीन भट्ट या दोघीही एकमेकांना इंस्टाग्रामवर चिअर करत असतात. आलिया आणि शाहीननं त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर स्वतःचे स्किनकेअर व्लॉग बनवले आहेत. आलियानं तिच्या बहिणीला तिची 'स्किनकेअर' गुरू देखील म्हटलं आहे. शाहीन आलियासोबतचा एक फोटो इस्टा स्टोरीवर शेअर केला आहे. हा एक व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीनशॉट आहे. यामध्ये आलिया शाहीनला मीठीत पकडून आहे.

हेही वाचा :

  1. डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आलिया भट्टनं महिलांना केलं जागृत
  2. रश्मिका मंदान्नाच्या 'द गर्लफ्रेंड' चित्रपटाच्या शुटिंगला हैदराबादमध्ये सुरुवात
  3. फॅशन डिझायनर रोहित बलची प्रकृती चिंताजनक; रुग्णालयात केलं दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.