ETV Bharat / entertainment

Saba Azad birthday : गर्लफ्रेंड सबा आझादसोबतचे साधे क्षणही हृतिक रोशनला वाटतात जादुई - Saba Azad turns 38

Saba Azad birthday : हृतिक रोशननं गर्लफ्रेंड सबा आझादवर तिच्या 38 व्या वाढदिवसानिमित्य प्रेमाचा वर्षाव केला. हृतिकने सोशल मीडियावर साबासाठी एक सुंदर पोस्ट लिहिलीय. तिच्या सहवासातील क्षण त्याला जादुई वाटत असल्याचं तो म्हणतो.

Saba Azad birthday
हृतिक रोशन आणि सबा आझाद
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 1, 2023, 1:54 PM IST

Updated : Nov 1, 2023, 2:56 PM IST

मुंबई - Saba Azad birthday : हृतिक रोशननं त्याची गर्लफ्रेंड सबा आझादच्या 38 व्या वाढदिवशी तिला इन्स्टाग्रामवर प्रेमानं शुभेच्छा दिल्या आहेत. हृतिकची माजी पत्नी सुझैन खाननं देखील सबाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. गेल्या काही महिन्यापासून हृतिक आणि सबा यांनी आपलं नातं उत्तम जपलंय. एकमेकांवरील उत्कट प्रेम ते नेहमी व्यक्त करत आलेयत.

सबा आझादच्या 38 व्या वाढदिवसानिमित्त हृतिक रोशननं सोशल मीडियावर एक मजेदार पोस्ट शेअर केली आहे. बर्थडे गर्लच्या आनंदी फोटोसह त्यांच्यातील पार्टनरशीपमध्ये जाणवणारं प्रेम, आस्था प्रेरणा व्यक्त करणारा एक हृदयस्पर्शी मेसेज लिहिलाय. तिच्या प्रेमामुळं आराम, सुरक्षितता आणि जीवनातील साहसे एकत्र स्वीकारण्याचं धैर्य मिळत असल्याचं म्हटलंय. तिच्याबरोबर राहण्यानं घरी आपल्यासारखं वाटत असल्याचं आणि तिच्यासोबतच्या प्रवासातील साधे क्षण जादुई वाटत असल्याचंही त्यानं पुढे म्हटलंय. हृतिकनं सबाकडून शिकलेले मौल्यवान धडे देखील स्वीकारले आहेत. 'माय लव्ह', म्हणत त्यानं तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.

हृतिक आणि सुझैन खान यांचा प्रेमविवाह 2000 मध्ये झाला आणि त्यांनी 14 वर्षे सुखी संसार केला. त्यांना हृहान आणि हृधन ही दोन मुलं झाली, परंतु त्यांच्यातील नातं टिकलं नाही. त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय चर्चेअंती घेतला असला तरी दोघंही मुलांसाठी पालक म्हणून वेळ देतात. हृतिकनं आपल्या भविष्याचा मार्ग निवडताना जोडीदार म्हणून सबा आझादची निवड केलीय. तर सुझैनंही अभिनेता अर्सलान गोनीसोबत रिलेशनशिप वाढवलीय.

कामाच्या आघाडीवर हृतिक रोशन 'विक्रम वेधा' या चित्रपटात झळकला होता. यामध्ये त्यानं सैफ अली खानसोबत स्क्रीन शेअर केली होती. त्याच्याकडील आगामी प्रकल्पांमध्ये 'फायटर' हा एक महत्त्वाकांक्षी चित्रपट आहे. यामध्ये तो दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर यांच्याबरोबर काम करत आहे. यानंतर 'वॉर 2' मध्ये तो जूनियर एनटीआर सोबत दिसणार आहे. हृतिकनं 'क्रिश 4' चं स्क्रिप्ट लॉक केलं आहे आणि पुढील वर्षाच्या सुरुवातील तो प्रत्यक्ष शूटिंगला सुरुवात करणार आहे.

सबा आझाद ही एक प्रतिभावान गायक-संगीतकार असून तिनं 'दिल कबड्डी' आणि 'मुझसे दोस्ती करोगे' या चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. तिनं नेटफ्लिक्सवरील 'लाइक इश्क' या मालिकेमध्येही योगदान दिलं आहे आणि 'रॉकेट बॉईज 2' या वेब सीरिजमध्येही तिने काम केलंय.

हेही वाचा -

1. Ileana D'cruz Birthday: इलियाना डिक्रूझनं पदार्पणाच्या चित्रपटासाठी जिंकला होता फिल्मफेअर पुरस्कार

2. Aishwarya Rai Birthday Special: 'देवदास'पासून 'ps I' पर्यंत, ऐश्वर्या रायच्या काही सर्वोत्तम कामगिरीवर एक नजर

3. Bigg Boss 17 : अंकिता लोखंडे आणि विकी जैनचा बिग बॉसच्या घरातील रोमँटिक व्हिडिओ व्हायरल

Last Updated : Nov 1, 2023, 2:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.