ETV Bharat / entertainment

Sanjay Dutt birthday : संजय दत्तच्या वाढदिवशी मान्यताची खास पोस्ट, बनवला आठवणींचा कोलाज - संजयला वाढदिवसाच्या शुभेच्छा

HBD Sanjay Dutt : अभिनेता संजय दत्तच्या वाढदिवसानिमित्त त्याची पत्नी मान्यताने त्याच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. तिने रम्य आठवणी जागवणाऱ्या फोटोंचा कोलाज तिने शेअर केला आहे.

Sanjay Dutt  birthday
संजय दत्त आणि मान्यता दत्त बर्थडे
author img

By

Published : Jul 29, 2023, 1:20 PM IST

Updated : Jul 29, 2023, 2:17 PM IST

मुंबई - बॉलिवूडचा संजू बाबा ६४ वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी त्याच्यावर वाढदिवस शुभेच्छांसह प्रेमाचा भरपूर वर्षाव होत आहे. इंडस्ट्रीतील दोस्त मंडळी, चाहते आणि कुटुंबीय त्याला शुभेच्छा संदेश पाठवत आहेत. यानिमित्ताने त्याची पत्नी मान्यता दत्तने त्याला दिलेल्या शुभेच्छा सर्वांच्या लक्ष वेधणाऱ्या आहेत. मान्यताने सोशल मीडियावर संजय दत्तसाठी एक बर्थ डे पोस्ट शेअर केली आहे. यात मान्यताने संजय दत्तशी संबंधित फोटोंचा कोलाज बनवला आहे. यातून संजय आणि मान्यता यांच्यातील प्रेमाचे दर्शन चाहत्यांना घडत आहे.

मान्यताने पती संजयला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना लिहिलंय, 'माझ्या सुंदर जोडीदाराला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तू आजपर्यंत माझ्यासाठी जे काही केले आहेस ते शब्दात गुंफणे कठीण आहे. तू असाच राहा. तू शानदार आहेस, तुझे आयुष्य खुशालीचे राहू देत, तुझ्यासाठी येणारी पुढील वर्षे उत्तम असू देत आणि तुझे भरपूर चित्रपट हिट होवोत. तुझ्या सुंदर आयुष्याचा एक भाग बनून मी धन्य झाले आहे, तू नेहमी आनंदी राहा.'

२२ जुलै हा मान्यताचा वाढदिवस. त्यावेळी संजय दत्तनेही तिला अशाच प्रकारे पोस्ट करत शुभेच्छा दिल्या होत्या. संजयने मान्यतावर प्रेम व्यक्त करताना तिचे आयुष्यात येणे ही सर्वात मोठी कमाई असल्याचे म्हटले होते. संजय दत्त आणि मान्यताने २००८ मध्ये लग्न केले होते. या जोडप्याला दोन मुले आहेत.

मान्यता दत्तचा जन्म मुस्लीम कुटुंबात झाला होता. तिचे मूळ नाव दिलनवाझ शेख आहे. सारा खान या नावाने तिने यापूर्वी हिंदी चित्रपटातून अभिनयही केला आहे. प्रकाश झा यांच्या 'गंगाजल' चित्रपटात तिने आयटम नंबर सादर केला होता. केआरकेच्या देशद्रोही चित्रपटातून तिचे लॉन्चिंग झाल्यानंतर तिने मान्यता हे स्क्रीन नेम धारण केले. तिच्या वडिलांचे निधन झाल्याने त्यांच्या व्यवसायाची जबाबदारी तिच्यावर आली आणि तिचे स्टार होण्याचे स्वप्न भंगले. त्यानंतर तिने संजय दत्तसोबत विवाह केला आणि त्यांचा सुखी संसार सुरू झाला. संजय दत्तला दुर्धर आजार झालेला असताना मान्यता त्याच्याबरोबर सावलीसारखी राहिली. दुबईत वाढलेली मान्यता आता दोन्ही मुलांसह दुबईतच राहते.

हेही वाचा -

१. Hemant Dhome : 'रॉकी और रानी...'मध्ये क्षिती जोगला पाहून हेमंत ढोमेला झाले आकाश ठेंगणे!!

२. RARKPK box office collection day 1 :'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटाने पहिल्या दिवशी केली धमाकेदार कमाई...

३. Bawaal under fire : ओटीटीवरुन 'बवाल' चित्रपट काढून टाका, ज्यू संघटनेची मागणी

Last Updated : Jul 29, 2023, 2:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.