ETV Bharat / entertainment

महेश बाबूच्या 'गुंटूर कारम'चे बॉक्स ऑफिसवर वादळ, अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये होऊ शकते 'इतकी' कमाई - पहिला दिवस

Guntur Kaaram Advance Booking : साऊथ अभिनेता महेश बाबू स्टारर 'गुंटूर कारम' हा चित्रपट 12 जानेवारी रोजी रिलीज होणार आहे. हा चित्रपट रिलीजच्या पहिल्या दिवशी प्रचंड कमाई करू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Guntur Kaaram Advance Booking
गुंटूर काराम अ‍ॅडव्हान्स बुकिंग
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 11, 2024, 4:11 PM IST

Updated : Jan 11, 2024, 5:08 PM IST

मुंबई - Guntur Kaaram Advance Booking : साऊथ अभिनेता महेश बाबू पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर धमाका करायला येत आहे. महेश बाबू स्टारर आगामी अ‍ॅक्शन ड्रामा 'गुंटूर कारम' रुपेरी पडद्यावर रिलीजसाठी सज्ज आहे. दरम्यान महेश बाबूच्या चाहत्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. 'गुंटूर कारम' उद्या म्हणजेच 12 जानेवारीला मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर रिलीज होणार आहे. महेश बाबूच्या उत्तर भारतीय चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की, हा चित्रपट हिंदीतही प्रदर्शित होत आहे. 'गुंटूर कारम' चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी, या चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगबद्दल जाणून घेऊ या.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
  • Superstar #MaheshBabu's #GunturKaaram has SOLD 7 lac plus tickets for the opening day till now in India.

    National Multiplex Chains
    PVR - 57,380 - ₹ 2.0 cr
    INOX - 49,299 - ₹ 1.47 cr
    Cinepolis - 21,203 - ₹ 0.74 cr

    All theatres
    Tickets - 7,09,100… pic.twitter.com/nXBV8vSBzT

    — Manobala Vijayabalan (@ManobalaV) January 11, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पहिल्या दिवशी चित्रपट किती करणार कलेक्शन : हा चित्रपट साऊथ सिनेसृष्टीत धमाका करणार आहे. या आठवड्यात साऊथ सिनेसृष्टीत एक नव्हे तर पाचहून अधिक चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहेत. 'गुंटूर कारम' व्यतिरिक्त 'हनुमान' हा चित्रपट 12 जानेवारी, साऊथ स्टार व्यंकटेश दग्गुबतीचा 'सिंधवा' 13 जानेवारी, अभिनेता नागार्जुन स्टारर 'ना सामी रंगा' 14 जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहेत. दरम्यान 200 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या 'गुंटूर कारम'नं गुरुवारी 11 जानेवारी रोजी सकाळपर्यंत आगाऊ बुकिंगमध्ये 35 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटानं आगाऊ बुकिंगमध्ये सुमारे 18.18 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. 'गुंटूर कारम'नं परदेशात आगाऊ बुकिंगमध्ये 16.6 कोटीची कमाई केली आहे.

जगभरातील टॉप अ‍ॅडव्हान्स बुकिंग

सालार – 81 कोटी

आदिपुरुष – 45 कोटी

गुंटूर करम - 35 कोटी

वीर सिम्हा रेड्डी- 14.25 कोटी

वॉलटेर वीरैया- 11 कोटी

चित्रपटाची स्टारकास्ट : देशात आत्तापर्यंत 7 लाखाहून अधिक तिकिटे विकली आहेत. या चित्रपटाच्या जगभरातील ओपनिंग कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर 65 ते 75 कोटी रुपये असू शकणार, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. देशांतर्गत 43 ते 45 कोटी रुपयांचा हा चित्रपट व्यवसाय करू शकतो. चित्रपटाच्या स्टारकास्टमध्ये महेश बाबू आणि श्रीलीला मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय मीनाक्षी चौधरी, जगपती बाबू आणि रम्या कृष्णा यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका या चित्रपटामध्ये आहेत. 'गुंटूर कारम'चं दिग्दर्शन त्रिविक्रम श्रीनिवास यांनी केलं आहे. यापूर्वी त्यांनी साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनसोबत 'आला वैकुंठपुरमुलो' हा ब्लॉकबस्टर चित्रपट निर्मित केला होता.

हेही वाचा :

  1. 'पुष्पा 2' बॉक्स ऑफिसवर भिडणार 'सिंघम अगेन'सोबत
  2. अंकिता लोखंडेशी बोलताना आयेशा खाननं केला मुनावर फारुकीवर गंभीर आरोप
  3. 'मोऱ्या'चे दिग्दर्शक जितेंद्र बर्डेने सेन्सॉर बोर्डाकडून दुय्यम वागणूक मिळत असल्याचा केला आरोप

Last Updated : Jan 11, 2024, 5:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.