मुंबई - हिंदी चित्रपटसृष्टीतील आणखी एक तारा निखळला ( Manju Singh Passes Away ) आहे. ज्येष्ठ हिंदी अभिनेत्री मंजू सिंग (Manju Singh) यांचे वयाच्या ७३ व्या वर्षा निधन झाले. याबाबत गीतकार, आणि पटकथा लेखक स्वानंद किरकिरे यांनी मंजू सिंग यांच्या निधनाबद्दल माहिती दिली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करीत त्यांनी दूरदर्शनमध्ये त्यांच्यासोबत काम केल्याची आठवण सांगितली आहे.
स्वानंद यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय, 'मंजू सिंग राहिल्या ( Manju Singh dies ) नाहीत! दूरदर्शनसाठी स्वराज हा कार्यक्रम लिहिण्यासाठी मंजूजींनी मला दिल्लीहून मुंबईत बोलावले होते! डीडीसाठी त्यांनी एक कहानी, शो टाईम इत्यादी अनेक उत्कृष्ठ शो केले होते. हृषीकेश मुखर्जी यांच्या गोलमाल चित्रपटामधील ( Golmaal fame actress dies ) रत्ना आपली प्रेमळ मंजू जी तुमचे प्रेम कसे विसरु शकेल…!'
-
मंजू सिंह जी नहीं रही ! मंजू जी मुझे दिल्ली से मुंबई लायी थी दूरदर्शन के लिए उनका शो स्वराज लिखने ! उन्होंने DD के लिए कई नायब शोज़ एक कहानी, शो टाइम आदि बनाए थे . हृषिकेश मुखर्जी की फ़िल्म गोलमाल की रत्ना हमारी प्यारी मंजू जी आपका प्यार कैसे भूल सकता है .. अलविदा ! pic.twitter.com/aKFvMJeFYF
— Swanand Kirkire (@swanandkirkire) April 15, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">मंजू सिंह जी नहीं रही ! मंजू जी मुझे दिल्ली से मुंबई लायी थी दूरदर्शन के लिए उनका शो स्वराज लिखने ! उन्होंने DD के लिए कई नायब शोज़ एक कहानी, शो टाइम आदि बनाए थे . हृषिकेश मुखर्जी की फ़िल्म गोलमाल की रत्ना हमारी प्यारी मंजू जी आपका प्यार कैसे भूल सकता है .. अलविदा ! pic.twitter.com/aKFvMJeFYF
— Swanand Kirkire (@swanandkirkire) April 15, 2022मंजू सिंह जी नहीं रही ! मंजू जी मुझे दिल्ली से मुंबई लायी थी दूरदर्शन के लिए उनका शो स्वराज लिखने ! उन्होंने DD के लिए कई नायब शोज़ एक कहानी, शो टाइम आदि बनाए थे . हृषिकेश मुखर्जी की फ़िल्म गोलमाल की रत्ना हमारी प्यारी मंजू जी आपका प्यार कैसे भूल सकता है .. अलविदा ! pic.twitter.com/aKFvMJeFYF
— Swanand Kirkire (@swanandkirkire) April 15, 2022
मंजू सिंग हे भारतीय टीव्ही इंडस्ट्रीतील एक सुप्रसिद्ध चेहरा होत्या. त्यांनी स्वराज, एक कहानी, शो टाईम इत्यादी कार्यक्रमांची निर्मिती केली. 'दीदी' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मंजू 'खेल खिलोने' या लहान मुलांच्या शोची सूत्रसंचालिका होत्या. हा शो सुमारे सात वर्षे चालला. याशिवाय मंजू सिंग या हृषिकेश मुखर्जीच्या गोलमाल या चित्रपटातही दिसल्या होत्या. या चित्रपटात त्यांनी रत्नाची भूमिका साकारली होती.
हेही वाचा - Arman Kohli Bail Rejected : अभिनेता अरमान कोहलीला दिलासा नाही.. जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला