मुंबई : जिनिलिया डिसूझा ५ ऑगस्ट २०२३ रोजी आपला ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे. जिनिलिया रोमन-कॅथलिक रीतिरिवाजांमध्ये वाढली आहे. तिने बॉलिवूड, तेलुगु आणि तामिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिचा जन्म ५ ऑगस्ट १९८७ रोजी मुंबईत झाला होता. ती मराठी भाषिक मँगलोरियन कॅथोलिक कुटुंबातून आली आहे. ती तिच्या करिअरमध्ये यशस्वी होण्याचे श्रेय तिच्या आईला देते. जिनिलियाने बॉलीवूडमध्ये 'तुझे मेरी कसम' या चित्रपटाद्वारे पदार्पण केले होते. चला तर जाणून घेऊ या तिच्याबद्दलच्या काही खास गोष्टी.
जिनिलियाची पहिली जाहिरात वयाच्या १५ व्या वर्षी : जिनिलिया राज्यस्तरीय धावपटू आणि राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल खेळाडू होती. जिनिलियाने वयाच्या १५ व्या वर्षी मॉडेलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. जिनिलियाने २००३ ते २०१२ पर्यंत तेलुगू हिंदी, कन्नड आणि तामिळसह अनेक भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने २००३ ते २०१२ या कालावधीत अनेक तेलुगु चित्रपटांमध्ये अभिनय करून तेलुगु चित्रपटसृष्टीत स्वत:ची ओळख निर्माण केली. तिला दक्षिणेकडच्या चित्रपटसृष्टीत खूप प्रसिद्धी मिळाली.
जिनिलियाने अमिताभबरोबर एक जाहिरात केली : जेनेलिया पहिल्यांदा अमिताभ बच्चनबरोबर एका प्रिमियम पेनच्या जाहिरातीत दिसली होती, तिचा हिंदी चित्रपटसृष्टीतला पहिला चित्रपट 'तुझे मेरी कसम' होता. 'बॉईज' या तमिळ चित्रपटातून जेनेलियाला चांगलीच ओळखी मिळाली. या चित्रपटामुळे तिला खूप चित्रपट साऊथ चित्रपटसृष्टीत मिळाले. 'हॅप्पी' या तेलुगु चित्रपटानंतर जेनेलियाचा स्वतंत्र चाहतावर्ग तयार झाला. तिने २००३ ते २००५ या काळात तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले.
जिनिलियाने १० वर्षे डेटिंग केल्यानंतर लग्न केले : २००३ मध्ये रिलीज झालेला 'तुझे मेरी कसम' हा जेनेलियासह रितेश देशमुखचाही हिंदीतला पहिला चित्रपट होता. या चित्रपटादरम्यान रितेश देशमुख जिनिलियाला पसंत करू लागला. मीडिया रिपोर्टसनुसार, जिनिलियाने सांगितले होते की, रितेशबद्दल तिच्या मनात असे काही नव्हते. पण चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान दोघेही एकमेकांच्या जवळ येऊ लागले आणि प्रेमात पडले. चित्रपटानंतरच दोघांना एकमेकांशी लग्न करायचे होते. मात्र काही वर्ष डेट केल्यानंतर त्यांनी ३ फेब्रुवारी २०१२ रोजी मराठी रितीरिवाजाप्रमाणे लग्न केले.
हेही वाचा :