ETV Bharat / entertainment

रितेशचे दिग्दर्शन पदार्पण आणि जेनेलियाच्या मराठी पदार्पणाच्या 'वेड' चित्रपटाचे पोस्टर लॉन्च - Ved poster launch

रितेश देशमुखने 'वेड'च्या फर्स्ट लूक पोस्टर्सचे अनावरण केले आहे. 'वेड' चित्रपटातून जेनेलिया डिसूझाही मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. विशेष म्हणजे अभिनेता सलमान खान त्याच्या दिग्दर्शनाच्या पहिल्या प्रोजेक्टमध्ये पाहुण्यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

'वेड' चित्रपटाचे पोस्टर लॉन्च
'वेड' चित्रपटाचे पोस्टर लॉन्च
author img

By

Published : Oct 27, 2022, 12:10 PM IST

मुंबई - बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुख याने बुधवारी त्याच्या आगामी मराठी चित्रपट 'वेड' चे फर्स्ट लूक पोस्टर लॉन्च केले आहे. इंस्टाग्रामवर रितेशने पोस्टर टाकले ज्याला त्याने कॅप्शन दिलंय, "वेडेपणा करायला मुहूर्त नसतो पण केलेला वेडेपणा एखाद्या मुहूर्तावर जाहिर करायला काय हरकत आहे! आज दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छांसकट सादर करतोय तारिख आणि चित्रपटाचा फर्स्ट लुक. आमचं वेड तुमच्यापर्यंत येतंय ३० डिसेंबरला..तुमचं प्रेम आणि आशिर्वाद असू द्या.''

रितेश देशमुखने त्याच्या आगामी चित्रपटाची अनेक पोस्टर शेअर केली आहेत. यात तो त्याची पत्नी अभिनेता जेनेलिया डिसूझासोबत भूमिका साकारणार आहे. अभिनेत्याने फर्स्ट लूक पोस्टर टाकल्यानंतर लगेचच चाहत्यांनी कमेंट सेक्शन भरुन टाकले आणि हार्ट आणि फायर इमोटिकॉन्सचा वर्षाव केला आहे.

"अभिनंदन...आमचे दिग्दर्शक आणि निर्माते उर्फ ​​तुम्ही आणि जीनी यांना खूप खूप शुभेच्छा....,"अशी एका चाहत्याने कमेंट केली. दुसर्‍या एका चाहत्याने लिहिले, "रितेश जेनेलिया तुम्हा सर्वांनो तुमच्या वेडसाठी खूप खूप शुभेच्छा." रितेश दिग्दर्शित हा मराठी चित्रपट 30 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

या वर्षी जुलैमध्ये रितेशने त्याच्या चित्रपटाचे शुटिंग पूर्ण झाल्याचे कळवले होते. विशेष म्हणजे अभिनेता सलमान खान त्याच्या दिग्दर्शनाच्या पहिल्या प्रोजेक्टमध्ये पाहुण्यांच्या भूमिकेत दिसणार आहे. 'वेड' चित्रपटातून जेनेलिया डिसूझाही मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.

दरम्यान, रितेश नुकताच तमन्ना भाटियासोबत 'प्लॅन ए प्लान बी' या रोमँटिक कॉमेडी चित्रपटात दिसला होता. शशांक घोष दिग्दर्शित, या चित्रपटाचा प्रीमियर केवळ नेटफ्लिक्सवर झाला आणि प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. तो सोनाक्षी सिन्हा आणि साकिब सलीम सोबत आगामी हॉरर कॉमेडी चित्रपट 'काकुडा' मध्ये देखील दिसणार आहे.

त्याच्याकडे जेनेलिया डिसूझासोबत 'मिस्टर ममी' हा विनोदी चित्रपट आणि जॉन अब्राहम, नोरा फतेही आणि शहनाज गिल यांच्यासोबत '100%' हा चित्रपटही आहे.

हेही वाचा - ऐंशीच्या दशकातील प्रसिद्ध दिग्दर्शक इस्माईल श्रॉफ यांनी घेतला जगाचा निरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.