ETV Bharat / entertainment

गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या धमकीनं गिप्पी ग्रेवाल आणि सलमान खानच्या चाहत्यांना बसला धक्का - सलमान खान

Gangster Lawrence Bishnoi : गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोईनं गिप्पी ग्रेवाल आणि सलमान खानला दिलेल्या धमकीमुळं अनेकांना धक्का बसला आहे. ग्रेवालच्या निवासस्थानी झालेल्या गोळीबाराच्या घटनेची जबाबदारी बिश्नोईनं स्वीकारल्यानंतर चाहते आता चिंता व्यक्त करत आहे.

Gangster Lawrence Bishnoi
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 27, 2023, 12:40 PM IST

मुंबई - Gangster Lawrence Bishnoi : गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोईनं शनिवारी पहाटे कॅनडामधील पंजाबी गायक गिप्पी ग्रेवालच्या निवासस्थानी झालेल्या गोळीबाराच्या घटनेची जबाबदारी स्वीकारली आहे. ग्रेवालला याद्वारे बिश्नोईनं वॉर्निंग दिली आहे. ही कथित घटना कॅनडातील व्हँकुव्हरमधील व्हाईट रॉक परिसरात घडली. बिश्नोईनं म्हटलं की, हा गिप्पीला इशारा दिला आहे. त्यानं बॉलीवूड स्टार सलमान खानचं कौतुक करणं थांबवावं. त्यानं शेअर केलेल्या पोस्टमध्ये भाईजानला धमकीही दिली आहे. कॅनडातील बातम्यांनी ग्रेवालचा उल्लेख न करता म्हटलं आहे की, गोळीबाराची घटना स्थानिक कायदा अंमलबजावणी एजन्सीद्वारे पाहिली जात आहे. यावेळी कुणालाही दुखापत झाली नाही.

लॉरेन्स बिश्नोई शेअर केली पोस्ट : एका फेसबुक पोस्टमध्ये, बिश्नोईनं म्हटलं होतं की, 'तू सलमान खानचा भाई आहेस ना? त्याला सांग आता तुला वाचव. सलमान खानला हा एक संदेश नक्की दे. तुला आमच्यापासून कोणी वाचवू शकणार नाही. तू सिद्धू मूसवालाच्या मृत्यूवर खूप जास्त ओव्हरअ‍ॅक्ट केलं होतं. तो किती अहंकारी माणूस होता. तो कोणत्या गुन्हेगारी लोकांच्या संपर्कात होता हे तुला माहीत आहे. जोपर्यंत विकी मिड्डूखेडा जिवंत होता, तोपर्यंत तू त्याच्या मागे-पुढे फिरायचा. तू आता रडारवर आला आहे'. त्यानं असं पोस्टमध्ये लिहून गिप्पीला धमकी दिली होती. या घटनेनं पंजाबी संगीत उद्योगात धक्का बसला आहे.

लॉरेन्स बिश्नोई दिली धमकी : गिप्पी ग्रेवाल आणि सलमान खानचे चाहते आता त्यांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त करत आहेत. बिश्नोईनं दिलेल्या स्पष्ट धमक्यांमुळं अनेकांना त्याच्या हेतूंबद्दल आश्चर्य वाटू लागलं आहे. कॅनेडियन पोलीस आणि प्रसारमाध्यमांनी हत्येबाबत मौन बाळगलं असताना, बिश्नोईनं त्याच्या सिंडिकेट सदस्यांनी केलेल्या फेसबुक पोस्टद्वारे हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. बिश्नोई सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या अनेक दिवसांपासून देत आहे. दरम्यान गिप्पीचा 'मौजा ही मौजा' हा कॉमेडी चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. ट्रेलर लॉन्चच्या वेळी सलमान खान देखील उपस्थित होता.

हेही वाचा :

  1. जावयाचं कौतुक करत महेश भट्टनं रणबीर कपूरला म्हटलं, 'जगातील सर्वोत्तम पिता'
  2. सुशांत सिंग राजपूतचे घर विकत घेतल्याच्या अफवांवर अदा शर्मानं मौन सोडले ; म्हणाली 'माझे घर हेच माझे मंदिर'
  3. 'वीकेंड का वार'वर सनी लिओनीची झाली एंट्री, वाइल्डकार्ड एंट्री म्हणून ओरी बिग बॉसच्या घरात दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.