हैदराबाद भक्तीला फिल्मी जादूची जोड देत अभिनेता अल्लु अर्जुनच्या Allu Arjun चित्रपटातून प्रेरणा घेऊन पुष्पा Pushpa या फिल्मी व्यक्तीरेखेच्या स्टाईलची गणेश मूर्तीची Ganesh idol स्थापना करून भाविकांनी लक्ष वेधून घेतले. या मूर्तीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. गणेश भक्त आणि अभिनेत्याच्या चाहत्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या.
बुधवारी देशभरात गणेश चतुर्थीच्या उत्साहाला सुरुवात झाली. दरवर्षी गणपतीच्या मूर्तींच्या वेगवेगळ्या डिझाईन्स त्या विशिष्ट वर्षाच्या ट्रेंडनुसार बनवल्या जातात. यावर्षीही एका अनोख्या गणेशमूर्तीने नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतले आहे. अल्लू अर्जुनच्या पुष्पा द राइज या सुपरहिट चित्रपटातील पुष्पराज स्टाईलची गणपती बाप्पाची मूर्ती व्हायरल होत आहे. पुष्पा गणपती पांढरा पोशाख परिधान करून पुष्पाच्या सिग्नेचर पोझमध्ये बसला आहे. गणेशाचे हात हनुवटीच्या खाली विसावलेले आहेत चित्रपटातील व्यक्तीरेखेच्या स्टाईलची ही प्रतिकृती असून 'मैं झुकेगा नहीं...' हा डायलॉग देखील आहे. इंटरनेट युजर्सनी या अनोख्या मूर्तीच्या व्हायरल फोटोवर त्वरित प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युजरने लिहिले की, 'मला वाटते की तो भगवान गणेश आहे आणि आपण सर्व त्याला मानतो. पण असे काम करू नये कारण तो देव आहे. तुम्ही अल्लू अर्जुनचे चाहते असाल तर ते तुमच्याकडेच ठेवा.'
आणखी एका युजरनेही संतापून लिहिले की, 'हा काय मूर्खपणा आहे, माझा यावर विश्वास बसत नाही. मला माहित आहे की तू अल्लू अर्जुनचा चाहता आहेस पण तू भगवान गणेशाची चेष्टा करत आहेस'.
अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांची भूमिका असलेला पुष्पा हा चित्रपट डिसेंबर २०२१ मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपट तेलगू तसेच हिंदी भाषेतही रिलीज झाला. बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या या चित्रपटातील संवादांसोबतच चित्रपटातील गाण्यांनीही जगभरात धमाल उडवून दिली. आता 'पुष्पा-द रुल' या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाच्या शूटिंगलाही सुरुवात झाली आहे. हा चित्रपट 2023 मध्ये थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
हेही वाचा - सेलेब्रिटी आणि त्यांचे गणपती सेलिब्रेशन