मुंबई : 'गदर २' आणि 'ओह माय गॉड २' हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी रूपेरी पडद्यावर प्रदर्शित झाले. प्रदर्शनापूर्वीच दोन्ही चित्रपटांमधल्या स्पर्धेची चर्चा रंगत होती. दोन्ही चित्रपटांमधला सामायिक मुद्दा दोन्ही 'सिक्वल' आहेत. तब्बल २३ वर्षांनंतर सनी देओलचा 'गदर: एक प्रेम कथा' या चित्रपटाचा 'गदर २' हा सिक्वल प्रदर्शित झाला आहे. तर अक्षय कुमारच्या 'ओह माय गॉड' या चित्रपटाचा सिक्वल 'ओह माय गॉड २' च्या रुपाने अकरा वर्षांनी प्रदर्शित झाला आहे. सनी देओलचा 'गदर: एक प्रेम कथा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान चालला होता. अक्षयच्या 'ओह माय गॉड'ने देखील चांगली कमाई केली होती. दरम्यान आता या दोन्ही चित्रपटाचे सिक्वल बॉक्स ऑफिसवर काय कमाल करतात, हे येत्या काही दिवसांत कळेलच. सध्या या चित्रपटांनी पहिल्या दिवशी किती कमाई केली, यावर आपण नजर टाकूया...
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
पहिल्या दिवसाची कमाई : बॉक्स ऑफिसवर दोन्ही चित्रपट दमदार कामगिरी करत आहेत. ओपनिंग डे कलेक्शनच्या आकड्यांबद्दल बोलायचे झाले तर, सध्या सनी देओलने मोठी झेप घेतली आहे. 'गदर २' ने पहिल्या दिवशी सुमारे ४० कोटींची कमाई केली आहे, तर मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'ओह माय गॉड २' ने ९ ते १० कोटींची कमाई केली आहे. 'गदर २'ने बॉक्स ऑफिसवर चांगलीच बाजी मारली आहे. हा चित्रपट लवकरच १०० कोटीचा टप्पा गाठेल असे दिसत आहे.
'गदर २'बद्दल : अनिल शर्मा दिग्दर्शित 'गदर २'मध्ये १९७१चे भारत-पाकिस्तान युद्ध हे रूपेरी पडद्यावर दाखविले आहे. याशिवाय तारा सिंग (सनी देओल) आणि सकिना (अमिषा पटेल) यांचा मुलगा चरण जीत सिंगला (उत्कर्ष शर्मा) पाकिस्तानी सैन्य कसे पकडते आणि आपल्या मुलाच्या सुटकेसाठी तारा सिंग पाकिस्तानात कसा जातो, हे या चित्रपटात दाखवले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
'ओ माय गॉड २'बद्दल : अमित राय दिग्दर्शित 'ओह माय गॉड २'ला प्रेक्षक चांगला प्रतिसाद देत आहे परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसच्या शर्यतीत पहिल्या दिवशी तरी थोडा मागे आहे. अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम यांचा 'ओह माय गॉड २' हा 'गदर २'च्या तुलनेत कमी कमाई करत आहे, मात्र या चित्रपटानेदेखील पहिल्या दिवशी चांगली ओपनिंग दिली आहे. 'ओह माय गॉड २' चित्रपटात पंकज त्रिपाठी (कांती शरण मुद्गल), आपल्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी कोर्टाची पायरी चढतो. याशिवाय या चित्रपटात अक्षय कुमार हा महादेवाच्या संदेशवाहकाच्या भूमिकेत आहे, तर यामी गौतमने वकिलाची भूमिका साकारली आहे.
हेही वाचा :