ETV Bharat / entertainment

Gadar २ VS OMG २ box office day २४ : 'गदर 2' आणि 'ओएमजी 2'; कोणाचे किती कलेक्शन? घ्या जाणून... - सनी देओल

Gadar 2 VS OMG 2 box office day 24 : सनी देओलचा 'गदर 2' आणि अक्षय कुमारचा 'ओएमजी 2' चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट रिलीज होण्यापूर्वी या चित्रपटांना कमाई करण्याची चांगली संधी आहे.

Gadar 2 VS OMG 2 box office day 24
गदर 2 आणि ओएमजी 2 बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 24
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 3, 2023, 1:12 PM IST

मुंबई - Gadar 2 VS OMG 2 box office day 24 : सनी देओलचा 'गदर 2' बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर वादळ निर्माण केले आहे. गेले काही महिने बॉलिवूडसाठी खूप चांगले गेले आहेत. जवळपास सर्वच चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. आता सप्टेंबरमध्ये अनेक मोठे चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे. 'जवान' रिलीज होण्यापूर्वी 'गदर-2' आणि 'ओएमजी 2'च्या व्यवसायवर परिणाम होत आहे. 'गदर-2'ने चित्रपटाच्या बजेटपेक्षा जास्त कमाई केली आहे. चला तर जाणून घेऊया 'गदर-2' आणि 'ओएमजी 2'ने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली तर...

'गदर 2' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 24: 'गदर-2'ने रिलीजच्या 23व्या 5.72ची कमाई केली आहे. त्यानंतर आज हा चित्रपट म्हणजेच रविवारी 7.50 कोटी कमाई करू शकेल असा अंदाज बांधला जात आहे. यासह या चित्रपटाचे एकूण कलेक्शन 500.87 होईल. 'गदर-2' हा देशांतर्गत आज 500 कोटीचा टप्पा ओलांडेल असे सध्या दिसत आहे. या चित्रपटाने तीन आठवड्यात 490 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. तारा सिंग आणि सकिना जोडी प्रेक्षकांना खूप आवडली आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी आता देखील खूप गर्दी चित्रपटगृहांमध्ये होत आहे.

'ओएमजी 2' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 24: अक्षय कुमारचा चित्रपट 'ओएमजी 2' आणि सनी देओलचा गदर 2 हे वेगवेगळ्या शैलीतील चित्रपट आहेत. दोघेही एकाच दिवशी रिलीज झाले, असले तरीही या चित्रपटांच्या कमाईत मोठी तफावत आहे. सनी देओलचा चित्रपट रिलीजच्या 24व्या दिवशी देखील राज्य करत आहे तर, अक्षय कुमारचा 'ओएमजी 2' कमाईच्या बाबतीत खूप संघर्ष करत आहे. 'ओएमजी 2' हा बॉक्स ऑफिसवर 150 कोटी रुपयेही कमवू शकलेला नाही. या चित्रपटाने रिलीजच्या 23व्या दिवशी म्हणजेच शनिवारी 1.61 कोटीचा व्यवसाय केला आहे. हा चित्रपट 24 व्या दिवशी म्हणजेच रविवारी 1.83 कोटीची कमाई करू शकतो. यासह या चित्रपटाचे एकूण कलेक्शन 146.36 कोटी होईल.

हेही वाचा :

  1. Gadar २ Success Party : 'गदर 2'च्या सक्सेस पार्टीत दिग्गज बॉलिवूड कलाकारांची हजेरी; पाहा व्हिडिओ
  2. Rakhi Sawant On Religion : आदिल खान दुर्रानी आणि राखी सावंतच्या वादावर अर्शी खानची खास मुलाखत...
  3. Rubina Dilaik Pregnancy Confirms : रुबिना दिलैक आणि अभिनव शुक्लाच्या घरी होणार नव्या पाहुण्याचे आगमन?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.