ETV Bharat / entertainment

Gadar 2 Collection : 'गदर २'ने गाठले कमाईचे शिखर; केली 'इतकी' कमाई.... - सनी देओल

'गदर २' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप झपाट्याने कमाई करत आहे. हा चित्रपट काही दिवसात ४०० कोटीचा टप्पा ओलांडेल असे सध्या दिसत आहे.

Gadar 2
गदर २
author img

By

Published : Aug 20, 2023, 3:27 PM IST

मुंबई : सुपरस्टार सनी देओलचा चित्रपट 'गदर २'ने बॉक्स ऑफिसवर आपला दुसरा आठवडा सुरू केला आहे, मात्र तरीही या चित्रपटाच्या कमाईवर कोणताही परिणाम झालेला नाही. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट अजून वेगाने कमाई करत आहे. सनी देओल आणि अमिषा पटेल स्टारर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३०० कोटीचा टप्पा पार केल्यानंतर आता नवीन आकडा गाठण्यासाठी सज्ज झाला आहे. अनिल शर्मा दिग्दर्शित, 'गदर २'मध्ये सनी देओल, अमिषा पटेल, सिमरत कौर, मनीष वाधवा, उत्कर्ष शर्मा आणि लव सिन्हा यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. 'गदर २' चित्रपटाची एकूण कमाई ३३६.१३ पोहचली आहे.

'गदर २' चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन : 'गदर २'च्या जगभरातील कमाईबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाने ३६९ कोटींचे कलेक्शन केले आहे. 'गदर २' चित्रपटाने एका आठवड्यात २८४.६३ कोटी कमावले, ज्यामध्ये पहिल्या दिवशी ४० कोटी, दुसऱ्या दिवशी ४३.०८ कोटी, तिसऱ्या दिवशी ५१.०७ कोटी, चौथ्या दिवशी ३८.०७ कोटी, पाचव्या दिवशी ५५.४० कोटी, सहाव्या दिवशी ३२ कोटी , सातव्या दिवशी २३.२८ कोटी ,आठव्या दिवशी २०.५ नव्या दिवशी ३१.०७ कोटींची कमाई केली. हा चित्रपट बॉक्सवर खूप झपाट्याने कमाई करत आहे. विशेष म्हणजे ८० कोटींच्या बजेटमध्ये बनलेला 'गदर २' पठाणनंतर सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाची आता देखील कमाई सुरूच आहे.

ब्लॉकबस्टर चित्रपट : 'गदर २' अशाच वेगाने कमाई करत राहिला तर काही दिवसांत हा चित्रपट ४०० कोटींचा आकडा सहज पार करेल. 'गदर २' भारतातच नाही तर जगभर चांगलीच कमाई करत आहे. 'गदर २' चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहांमध्ये खूप गर्दी करत आहे. या चित्रपटामधील गाणी देखील खूप हिट झाली आहेत. याशिवाय या चित्रपटामधील डायलॉग खूप जबरदस्त असल्याने प्रेक्षकांचे मनोरंजन होत आहे. हा चित्रपट पाहत असताना प्रेक्षक 'वन्दे मातरम'चे नारे देखील म्हणत आहे.

हेही वाचा :

  1. Jailer box office collection day 10 : 'जेलर' चित्रपटाने १० दिवसात केली बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई...
  2. Alia Bhatt and Ranbir Kapoor : आलिया भट्ट-रणबीर कपूर निघाले सुट्टीला.. मुंबई विमानतळावर झाले स्पॉट!
  3. Hema Malini : 'गदर २' चित्रपट कसा वाटला, सनी देओलच्या सावत्र आईने 'ही' दिली प्रतिक्रिया

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.