ETV Bharat / entertainment

Gadar 2 box office collection day 6 : सनी देओल स्टारर 'गदर २' ची 'क्लब ३०० कोटी'च्या दिशेने वाटचाल - गदर २ बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस ६

सनी देओलचा 'गदर २' बॉक्स ऑफिसवर वादळ निर्माण करत आहे. हा चित्रपट खूप झपाट्याने कमाई करत आहे. लवकरच 'गदर २' ३०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे.

Gadar 2
गदर २
author img

By

Published : Aug 17, 2023, 10:52 AM IST

Updated : Aug 17, 2023, 11:34 AM IST

मुंबई : सनी देओलचा चित्रपट 'गदर २' शीर्षकानुसारच कामगिरी करत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवत आहे. नुकताच 'गदर २' २०० कोटी क्लबमध्ये दाखल झाला आहे. आता या चित्रपटाने २५० कोटींचा टप्पा पार केला आहे आणि लवकरच ३०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार हे आता नक्की मानले जात आहे. 'गदर २' खूप झपट्याने बॉक्स ऑफिसवर कमाई करत आहे. चित्रपट रिलीज होऊन फक्त ६ दिवस झाले आहेत. ६ दिवसांत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी भरारी मारली आहे. 'गदर २'ने पहिल्या दिवशी ४० कोटींची कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हा आकडा ४३ कोटी आणि तिसऱ्या दिवशी ५१ कोटींच्या पुढे गेला. या चित्रपटाने ३ दिवसात ओपनिंग वीकेंडला १३४.८८ कोटींची कमाई करत १०० कोटींच्या क्लबमध्ये दिमाखात प्रवेश केला.

अशा प्रकारे मी २०० कोटींमध्ये प्रवेश केला : 'गदर २'ने सोमवारी देखील तिकीट खिडकीवरील पकड सोडली नाही. या चित्रपटाने पहिल्या सोमवारी ३८ कोटींहून अधिकचा व्यवसाय केल्याने समीक्षक आणि प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का दिला. यानंतर, स्वातंत्र्यदिनी 'गदर २'ने भरपूर कमाई करत २०० कोटी क्लबमध्ये प्रवेश केला. आता या चित्रपटाने २५० कोटींहून अधिक कमाई केली आहे. 'गदर २' ने १५ ऑगस्ट रोजी सार्वजनिक सुट्टीचा फायदा घेत ५५.४० कोटींचे कलेक्शन केले. दुसरीकडे, आता १६ ऑगस्ट रोजी व्यवसायात थोडीशी घसरण झाली होती. पण तरीही या चित्रपटाने बुधवारी देशभरात सुमारे ३४.५० कोटींची कमाई केली. यासह, देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 'गदर २'चे कलेक्शन २६३.४८ कोटींवर गेले आहे.

  • NEW ALL TIME DOMESTIC HIGHEST GROSSER Loading#Pathaan (only Hindi) Vs #Gadar2:

    Day 1: 55 cr / 40.10 cr
    Day 2: 68 cr / 43.08 cr
    Day 3: 38 cr / 51.70 cr
    Day 4: 51.50 cr / 38.70 cr
    Day 5: 58.50 cr / 55.40 cr
    Day 6: 25.50 / 33.50 cr

    Total: 306.50 cr / 262.48 cr (15% behind)… https://t.co/GeBmrnJyUn

    — Box Office Worldwide (@BOWorldwide) August 16, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

ब्लॉकबस्टर चित्रपट : 'गदर २' अशाच वेगाने धावत राहिल्यास येत्या काही दिवसांत ३०० कोटींचा आकडा सहज पार करेल. हा चित्रपट भारतातच नाही तर जगभर चांगलीच कमाई करत आहे. चित्रपटाला प्रेक्षकांची खूप पसंती मिळत आहे. यातली गाणी देखील खूप हिट झाली आहेत. याशिवाय या चित्रपटामधील संवादांनाही प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.

हेही वाचा :

  1. Alia Bhatt and Elvish Yadav : एल्विश यादवने आलिया भट्टचेही मन जिंकले, 'आय लव्ह यू'ने दिला प्रतिसाद
  2. Aamir Khans next production : 'वन डे' फिल्मच्या रिमेकमध्ये झळकणार आमिरचा मुलगा जुनैद खान आणि खुशी कपूर?
  3. Saif Ali Khan Birthday : ज्युनियर एनटीआरने सैफ अली खानला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा... 'देवरा'तील फर्स्ट लुक शेअर...

Last Updated : Aug 17, 2023, 11:34 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.