ETV Bharat / entertainment

Karva Chauth 2023 : परिणीती चोप्रासह कियारा अडवाणीपर्यंत 'या' अभिनेत्री साजरा करणार पहिला करवा चौथ... - Parineeti Chopra

Karva Chauth 2023 : परिणीती चोप्रा आणि कियारा अडवाणीसह 2023साली लग्न झालेल्या सर्व अभिनेत्री यावर्षी करवा चौथचा पहिला व्रत करेल. हा व्रत 1 नोव्हेंबर रोजी साजरा केला जाणार आहे.

Karva Chauth 2023
करवा चौथ 2023
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 28, 2023, 6:07 PM IST

मुंबई - Karva Chauth 2023 : करवा चौथचे दिवस जवळ येत आहेत. यावर्षी करवा चौथ 1 नोव्हेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी विवाहित स्त्री आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी निर्जला व्रत करत असतात. बी-टाऊन आणि टीव्ही जगतातही करवा चौथचे खास सेलेब्रेशन केले जाते. या दिवशी अनेक बॉलिवूड अभिनेत्री त्यांच्या पतीसाठी करवा चौथचा व्रत ठेवतात. या खास दिवशी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री सोशल मीडियावर सुंदर फोटो देखील शेअर करत असतात. आपण या लेखात त्या अभिनेत्रींबद्दल बोलणार आहोत, ज्या या वर्षाचा पहिला करवा चौथ व्रत ठेवणार आहेत.

परिणीती चोप्रा- राघव चढ्ढा : बॉलीवूडची सुंदर अभिनेत्री परिणीती चोप्रानं या वर्षी 24 सप्टेंबर रोजी उदयपूरच्या रॉयल फोर्टमध्ये आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा यांच्याशी लग्न केले. आता परी तिच्या पहिल्या करवा चौथ व्रताची तयारी करत आहे.

कियारा अडवाणी-सिद्धार्थ मल्होत्रा : हिंदी चित्रपटसृष्टीतील सुंदर जोडपे सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी या वर्षी विवाहबद्ध झाले. 7 फेब्रुवारी 2023 रोजी सिद्धार्थ आणि कियारा यांनी लग्न केले. आता कियारा पती सिद्धार्थसाठी पहिला करवा चौथ व्रत ठेवणार आहे.

अथिया शेट्टी आणि केएल राहुल : अभिनेता सुनील शेट्टीनं 23 जानेवारी 2023 रोजी त्याची मुलगी अथिया शेट्टीशी लग्न केले. अथियानं क्रिकेटर केएल राहुलला तिचा जीवनसाथी म्हणून निवडले आहे. ती आता पहिल्यांदा पती राहुलसाठी हा व्रत करेल. या सणाला विशेष महत्त्व दक्षिणेकडील राज्यांमध्ये नाही, त्यामुळं अथिया हा व्रत करण्याची शक्यता फार कमी आहे.

शिवालिका ओबेरॉय आणि अभिषेक पाठक : 'दृश्यम 2' चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक पाठकनं 9 फेब्रुवारी 2023 रोजी त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री शिवालिका ओबेरॉयशी लग्न केले. शिवालिका ही तिच्या पतीसाठी पहिला करवा चौथ व्रत करणार आहे.

सोनाली सहगल-आशिष सजनानी : 2023 मध्ये लग्न करून सेटल होणार्‍या अभिनेत्रींमध्ये 'प्यार का पंचनामा' फेम अभिनेत्री सोनाली सहगल बिझनेसमन बॉयफ्रेंड आशिष सजनानीसोबत 7 जून रोजी लग्न केले. आता सोनाली तिचा पहिला करवा चौथ व्रत करणार आहे.

हेही वाचा :

  1. Jaane Tu Ya Jaane Na Movie : इमरान खान आणि जेनेलिया देशमुखच्या व्हायरल फोटोनंतर चाहत्यांमध्ये खळबळ
  2. Twinkle khanna on SOTY casting : ट्विंकल खन्नाला 'शाश्वत' स्टुडंट ऑफ द इयर म्हणत करण जोहरनं केलं अभिनंदन
  3. LEO box office collection day 10 : थलपथी स्टारर विजयचा अ‍ॅक्शन चित्रपट 'लिओ'नं घातला जगभरात धुमाकूळ...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.