ETV Bharat / entertainment

Varun Tej And Lavanya Tripathi Engagement : वरुण आणि लावण्यने शेअर केले साखरपुड्याचे खास फोटो - अल्लू अर्जुन

तेलुगू अभिनेते वरुण तेज आणि लावण्य त्रिपाठी यांचा शुक्रवारी हैदराबादमध्ये साखरपुडा झाला. या जोडप्याने त्यांच्या साखरपुड्याचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. या पोस्टवर चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

Varun Tej And Lavanya Tripathi Engagement
वरुण तेज आणि लावण्य त्रिपाठी यांचा साखरपुडा
author img

By

Published : Jun 10, 2023, 1:58 PM IST

मुंबई : तेलुगू चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते वरुण तेज आणि लावण्य त्रिपाठी यांनी शुक्रवारी हैदराबादमध्ये साखरपुडा केला. या कार्यक्रमात वरुणच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. याशिवाय या कार्यक्रमात तेलुगू इंडस्ट्रीमधील काही खास सेलिब्रिटी उपस्थित असून यात अल्लू अर्जुन, राम चरण आणि त्यांची पत्नी उपासना कोनिडेला याशिवाय मेगास्टार चिरंजीवी हे देखील आले होते.

वरुण आणि लावण्यानी केली पोस्ट शेअर : वरुणने इंस्टाग्रामवर साखरपुड्यातील काही फोटो शेअर केली आहे. त्यांने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहले, 'फाउंड माय लव!' त्यानंतर लावण्‍यानेही फोटो शेअर करत लिहले, फाउंड माय फॉरएवर फ्रॉम 2016 टू इनफिनिटी।' आणि यासह तिने लाल हार्ट पोस्ट केले आहे. साखरपुड्याचे फोटो पोस्ट झाल्यानंतर या पोस्टवर चाहत्यांनी शुभेच्छाचा वर्षाव केला आहे. चाहत्यांनी या जोडप्याला त्यांच्या खास दिवसासाठी शुभेच्छा दिल्या आहे. शुभेच्छा देत एका चाहत्याने कमेंट केली, 'तुम्हा दोघांचे अभिनंदन (रेड हार्ट इमोजीसह)' दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले, 'तुमच्या खास दिवसासाठी तुम्हा दोघांनाही शुभेच्छा'.'आणखी एकाने लिहिले, 'अभिनंदन तुम्हा दोघांचे! अशा अनेक कमेंट या पोस्टवर आल्या आहे.

वरुण आणि लावण्या 2016 पासून करत होते डेट : लावण्यच्या पोस्टवरून हे दोघे 2016 पासून एकमेकांना डेट करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पण दोघांनीही याबद्दल कधीच उघडपणे बोललो नाही. त्यांच्या अफेअरच्या बातम्या अनेकदा मीडियात आल्या होत्या, पण दोघांनीही ते स्वीकारले नाही आणि नाकारले नाही. त्यानंतर बऱ्याच दिवसांनी दोघांनीही त्यांच्या साखरपुड्याचीची घोषणा केली आणि त्यांनी चाहत्यांना एक सुखद धक्का दिला. वरुण तेज हा अभिनेता आणि निर्माता नागेंद्र बाबू यांचा मुलगा आहे. शिवाय तो चिरंजीवी आणि पवन कल्याण यांचा पुतण्या आहे. दरम्यान, लावण्य त्रिपाठीने 2012 मध्ये आलेल्या 'अंदला राक्षसी' या चित्रपटाद्वारे तेलुगु चित्रपटात पदार्पण केले होते. वरुण आणि लावण्य 2017 च्या 'मिस्टर' चित्रपटाच्या सेटवर एकमेकांना भेटले आणि प्रेमात पडले. आता लवकरच वरुण आणि लावण्य लग्न बंधनात अडणार आहे. मात्र सध्याला लग्नाची तारीख ही निश्चित झाली नाही आहे. मीडिया रिपोर्टनुसार हे जोडपे नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये लग्न करू शकतात. त्यामुळे या लग्नाचे भव्य सेलिब्रेशन येणार काळात बघायला मिळेल.

हेही वाचा :

  1. Varun Tej-Lavanya Tripathi engagement : वरुण तेज-लावण्य त्रिपाठी यांचा हैदराबादमध्ये झाला साखरपुडा
  2. Parineet and Raghav wedding : परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा या ठिकाणी करणार आहे लग्न जाणून घ्या...
  3. Kajol deletes social media posts : 'कठीण परीक्षेचा सामना करत आहे' म्हणत, काजोलने घेतला सोशल मीडियावरुन संन्यास

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.