ETV Bharat / entertainment

First look poster : विजयच्या ४९ व्या वाढदिवसानिमित्त लिओ चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर लॉन्च - पहिल्या लूक

अभिनेता विजय हा 22 जून रोजी आपला 49वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या खास दिवशी, त्याच्या आगामी चित्रपट लिओच्या निर्मात्यांनी फर्स्ट लुक पोस्टरचे अनावरण केले आहे.

First look poster
लिओ फर्स्ट लुक पोस्टर
author img

By

Published : Jun 22, 2023, 12:27 PM IST

मुंबई : साऊथ सुप्पर स्टार विजय यांचा आज, २२ जून रोजी वाढदिवस आहे. विजयच्या 49 व्या वाढदिवसानिमित्त चित्रपट निर्माते लोकेश कनगराज यांनी लिओ या चित्रपटाच्या फर्स्ट लुक पोस्टरचे अनावरण केले आहे. 22 जून रोजी घड्याळात 12 वाजले असताना, लिओच्या निर्मात्यांनी चित्रपटाचे फर्स्ट लुक पोस्टर प्रदर्शित केले. पोस्टरमध्ये विजयच्या हातात रक्ताने माखलेला स्लेजहॅमर दिसत आहे. लोकेश कनागराज दिग्दर्शित, अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट 19 ऑक्टोबर रोजी प्रदर्शनासाठी सज्ज आहे. लोकेश कनागराजने त्याच्या ट्विटर अकाउंटवर चित्रपटाचे पोस्टर पोस्ट केले आहे. पोस्टर शेअर करत कॅप्शनमध्ये त्याने लिहले, 'लिओचे फर्ट लूक (#LeoFirstLook ) येथे आहे! वाढदिवसाच्या शुभेच्छा अभिनेता विजय अण्णा ( @Actorvijay anna!) पुन्हा तुमच्याशी हात जोडून आनंद झाला! मजा कर!'

लिओ चित्रपट फर्स्ट-लूक पोस्टर : चित्रपटाचे पोस्टर शेअर झाल्यानंतर लगेचच सोशल मीडिया वापरकर्त्यांनी या पोस्टवर कमेंट करण्यास सुरूवात केली, फर्स्ट लूक पोस्टरवर प्रतिक्रिया देताना, एका ट्विटर वापरकर्त्याने लिहिले, 'हा कॉलीवूडचा चित्रपट आहे की हॉलीवूडचा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा विजय, ( फर्स्ट लूक पोस्टर ) दुसर्‍या यूजरने लिहिले, 'थलैवा वाटता.' आणखी एका वापरकर्त्याने लिहिले, 'मच वेटिंग फॉर लिओ फिल्म.' फर्स्ट-लूक पोस्टरमध्ये विजय अ‍ॅक्शन मोडमध्ये आहे आणि त्याच्या हातात हातोडा आहे आणि त्यातून रक्त टपकत आहे. काश्मीरच्या पार्श्‍वभूमीवर रक्ताने माखलेला हात, आणि उखरलेले केसही आपण पोस्टरमध्ये पाहू शकतो. पोस्टरवर अशी टॅगलाइन आहे की, 'अशक्त नद्यांच्या जगात, शांत पाणी एकतर दैवी देव किंवा भयानक राक्षस बनतात.'मास्टरच्या यशानंतर विजय आणि लोकेश कनगराज यांनी दुसऱ्यांदा लिओसाठी हातमिळवणी केली आहे.

अ‍ॅक्शन चित्रपट : अ‍ॅक्शन चित्रपटाची कहाणी लोकेश, रत्ना कुमार आणि दीरज वैद्य यांनी लिहिली आहे. या चित्रपटात त्रिशा, संजय दत्त, अर्जुन, प्रिया आनंद, गौतम वासुदेव मेनन, मन्सूर अली खान, सँडी आणि मायस्किन यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. फिलोमिन राज यांनी संगीत दिले आहे. लिओ या आगामी चित्रपटाचे शूटिंग काश्मीरमध्ये झाले आहे.

हेही वाचा :

  1. Haddi Movie : नवाजुद्दीनच्या 'हड्डी' चित्रपटात 300 ट्रान्सजेंडर दिसणार
  2. Honey Singh Death Threat : हनी सिंगला जीवे मारण्याची धमकी, गोल्डी ब्रारने पाठवली व्हॉईस नोट
  3. release date of Subhedar : 'सुभेदार’च्या प्रदर्शन तारखेची घोषणा झाली, टीझरचेही झाले अनावरण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.