मुंबई - प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि गीतकार सावन कुमार टाक यांना गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना रुग्णालयाच्या आयसीयू वॉर्डात हलवण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्यांच्या पुतण्याने एका मुलाखतीदरम्यान सांगितले आहे.
सावन कुमार यांच्या पुतण्याने अलीकडेच मीडियाशी बोलताना सांगितले की, काही दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना किडनीशी संबंधित आजार होता, पण यावेळी ते गंभीर असून त्यांचे हृदय नीट काम करत नाही. काका या कठीण काळातून बाहेर पडावेत यासाठी आम्ही चाहत्यांना आणि त्यांच्या अनुयायांना प्रार्थना करण्याचे आवाहन करतो.
संजीव कपूर आणि मेहमूद जूनियर यांना स्टार बनवण्याचे श्रेय सावन कुमारला दिले जाते. 1967 मध्ये आलेल्या नौनिहाल या चित्रपटातून त्यांनी निर्माता म्हणून करिअरची सुरुवात केली, ज्यामध्ये संजीव कपूर मुख्य भूमिकेत होते. त्यांच्या पहिल्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
त्यांच्या दिग्दर्शनातील पहिला चित्रपट गोमती के किनारे हा मीना कुमारीच्या कारकिर्दीतील शेवटचा चित्रपट होता. पुढे त्यांनी सौतन, सौतन की बेटी, सनम बेवफा, बेवफा से वफा अशा अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले. निर्माता आणि दिग्दर्शक असण्यासोबतच ते उत्कृष्ट गीतकारही आहेत. 'जिंदगी प्यार का गीत है..' हे प्रसिद्ध गाणे त्यांनी लिहिले आहे. याशिवाय कहो ना प्यार है आणि देव या चित्रपटातील गाणीही त्यांच्या लेखणीतून साकारली आहेत.
हेही वाचा - लायगर हा मसाला चित्रपट असल्याने प्रेक्षकांनी आवडेल याची अनन्या पांडेला खात्री