ETV Bharat / entertainment

'फायटर' चित्रपटातील खलनायकाचं फर्स्ट लुक पोस्टर रिलीज - फर्स्ट लुक पोस्टर रिलीज

Fighter's Villain Rishabh Sawhney : अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण स्टारर 'फायटर'मधील खलनायकाचं फर्स्ट लुक पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये या चित्रपटामधील खलनायक खूप भयानक दिसत आहे.

Fighter's Villain Rishabh Sawhney
फायटरचा खलनायक ऋषभ साहनी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 17, 2024, 4:53 PM IST

मुंबई - Fighter's Villain Rishabh Sawhney : हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण अभिनीत 'फायटर' चित्रपट रुपेरी पडद्यावर रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. हा एरियल अ‍ॅक्शन चित्रपट 'फायटर' 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाला कमाईच्याबाबतीत प्रजासत्ताक दिनाचा भरपूर फायदा होईल. नुकताच फायटर चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये हृतिक आणि दीपिका अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसले होते. 'फायटर'चा ट्रेलर पाहिल्यानंतर आता चाहते या चित्रपटाची वाट आतुरतेनं पाहात आहेत. या चित्रपटामध्ये हृतिक रोशन आणि दीपिकाशिवाय अनिल कपूर , करण सिंग ग्रोव्हर, अक्षय ओबेरॉय , तलत अझीझ , ऋषभ साहनी आणि इतर कलाकार दिसणार आहेत.

खलनायकाचा फर्स्ट लुक समोर : दरम्यान, चित्रपट निर्मात्यांनी 'फायटर'च्या खलनायकाचा फर्स्ट लुक पोस्टर शेअर केला आहे. या चित्रपटामध्ये हृतिक रोशन आणि त्याच्या टीमचा सामना करण्यासाठी अभिनेता ऋषभ साहनी करताना दिसणार आहे. ऋषभची निवड खलनायक म्हणून करण्यात आली आहे. ऋषभ साहनी हा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करत आहे. चित्रपटाचा ट्रेलरमध्ये पॉवरफुल मसल मॅन ऋषभला पाहून अनेकजण त्याचे कौतुक करताना दिसत आहेत. त्यानं आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली आहे. याशिवाय त्यानं अनेक फॅशन डिझायनर्ससाठी रॅम्प वॉक केला आहे. 2021 मध्ये, 'द एम्पायर' या मालिकेद्वारे त्यानं अभिनयाच्या जगात प्रवेश केला, मात्र त्याला फारशी ओळख मिळाली नाही.

'फायटर' चित्रपटाबद्दल : ऋषभनं सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केलं आहे. दरम्यान 'फायटर' निर्मात्यांनी चित्रपटातील खलनायकांचं फर्स्ट लूक पोस्टर रिलीज केले आहे. या पोस्टवर त्यांनी लिहिलं, ''खलनायकाच्या डोळ्यांना पाहण्यासाठी, तुम्ही मोठ्या स्क्रिनवर हा चित्रपट पाहा.'' 'फायटर' या चित्रपटात ऋषभ एका पाकिस्तानी व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केलंय. वायाकॉम 18 स्टुडिओ आणि मार्फलिक्स पिक्चर्स द्वारे निर्मित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाल करेल असं सध्या दिसत आहे. या चित्रपटाकडून हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण खूप आशा आहेत.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

हेही वाचा :

  1. 'हनुमान'नं रिलीजच्या पाचव्या दिवशी कमाईत 'गुंटूर कारम'ला टाकले मागे
  2. विद्या बालन आणि इलियाना डिक्रूझ स्टारर 'दो और दो प्यार'चं फर्स्ट लूक रिलीज
  3. रिचा चड्ढाने घेतला फ्लाइट विलंबाचा कटू अनुभव, एअरलाइन्समधील मक्तेदारीला दिला दोष

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.