ETV Bharat / entertainment

फराह खाननं वाढदिवसानिमित्त शेअर केला एक सुंदर व्हिडिओ

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 9, 2024, 7:18 PM IST

Farah Khan birthday : बॉलिवूड कोरिओग्राफर फराह खान तिचा 59 वा वाढदिवस साजरा करत आहे. या विशेष प्रसंगी तिनं एक सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे.

Farah Khan birthday
फराह खानचा वाढदिवस

मुंबई - Farah Khan birthday : बॉलिवूड फिल्म मेकर आणि कोरिओग्राफर फराह खान आज 9 जानेवारी रोजी तिचा 59 वा वाढदिवस साजरा करत आहे. फराहनं नुकताच एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामध्ये ती मलायका अरोरा, रवीना टंडन, युझवेंद्र चहल आणि इतर सेलिब्रिटींसोबत प्री-लंचचा आनंद घेत आहे. फराह खानचा वाढदिवस 9 जानेवारीला आहे. मात्र याआधीच 'झलक दिखला जा' जज आणि होस्ट्सनी प्री-बर्थडे पार्टी आयोजित केली. फराहचा वाढदिवस 'झलक दिखला जा'च्या सेटवर सेलिब्रेट करण्यात आला. फराहच्या वाढदिवसानिमित्त अर्जुन-मलायकानं प्री-लंचचं आयोजन केलं.

फराह खानचा वाढदिवस : फराह खाननं शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये प्री-लंचची झलक पाहायला मिळत आहे. हा लंच अर्जुन कपूरच्या घरून बनविण्यात आला आहे. फराह खाननं गंमतीत या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की, 'मलायका अरोरानं अर्जुन कपूरला कॉल करून घरून हे जेवण मागवलं आहे.'' व्हिडिओमध्ये रवीना टंडन, ऋत्विक धनजानी, युझवेंद्र चहल यांसारख्या सेलिब्रिटी मलायका अरोरासोबत जेवण करताना दिसत आहेत. फराह खाननं ही व्हिडिओ क्लिप शूट केली आहे. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मटण पुलाव, राजमा आणि फ्रेंच फ्राइज, चिकन, भात इत्यादी खाद्यपदार्थ दिसत आहेत. हे जेवण खूपच स्वादिष्ट दिसत आहे. याशिवाय व्हिडिओमध्ये फराहनं अर्जुन कपूरचे आभार मानले आहेत.

फराह खानला दिल्या शुभेच्छा : यासोबतच इंडस्ट्रीतील इतर लोकांनीही फराहला खास शुभेच्छा दिल्या. फराहला शुभेच्छा देताना अनिल कपूरनं लिहिले की, ''डिअर फराह, तू मला नेहमीच सर्वोत्कृष्ट म्हणतेस पण तू सर्वोत्कृष्टांपेक्षाही चांगली आहेस. याशिवाय फोटो शेअर करताना नोरा फतेही अलीनं लिहिलं की, 'हॅपी बर्थडे ब्यूटीफुल'. सोनू सूदनेही तिची इन्स्टा स्टोरी शेअर करून फराहला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. फराह खानला या खास दिवशी कतरिना कैफ, सोनाली बेंद्रे,अर्जुन कपूर, सोनम कपूर, नरगिस फाखरी, शिल्पा शेट्टी, रवीना टंडन, रोहित शेट्टी, सानिया मिर्झा, अनन्या पांडे, साऊथ स्टार सिद्धार्थ आणि बोमन ईरानी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा :

  1. हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण स्टारर 'फायटर'चा ट्रेलर 'या' तारखेला होणार प्रदर्शित
  2. आमिर खानचा जावई नुपूर शिखरेनं केला लुंगी डान्स, पाहा व्हिडिओ
  3. फार्महाऊसवर घुसखोरीनंतर विमानतळावर कडक बंदोबस्तात दिसला सलमान खान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.