ETV Bharat / entertainment

Fan proposes Salman Khan : आयफा प्री-इव्हेंटमध्ये एका महिलेने दिला सलमानला लग्नाच्या प्रस्ताव - महिलेने केले सलमानला प्रपोज

अभिनेता सलमान खानने इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी अवॉर्ड्स आयफा प्री-इव्हेंटमध्ये एका महिलेने दिला लग्नाच्या प्रस्ताव. त्यानंतर या प्रस्तावला प्रतिसाद देत सलमाने म्हटले...

Salman Khan
सलमान खान
author img

By

Published : May 27, 2023, 4:01 PM IST

मुंबई : बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खानवर अनेकांचे प्रेम आहे आणि वयासोबतच दबंग अभिनेत्याची फॅन फॉलोइंग दिवसेंदिवस वाढत आहे. सलमान हा इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी अवॉर्ड्स आयफा 23व्या सिझनसाठी अबुधाबीमध्ये आहेत आणि गेल्या काही दिवसांपासून तो चर्चेत आहेत. तथापि, एका महिलेने सलमानला लग्नाचा प्रस्ताव देऊन चकित केल्यानंतर आयफाच्या कार्यक्रमाला अनपेक्षित वळण लागले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

पापाराझीने शेअर केला व्हिडिओ : इन्स्टाग्रामवर पापाराझीने त्यांच्या अकाऊंटवर या इव्हेंटमधील व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये, एक महिला असे म्हणताना ऐकू येते, 'सलमान खान, मी हॉलीवूडमधून फक्त तुला हा प्रश्न विचारण्यासाठी आले आहे. मी ज्या क्षणी तुला पाहिलं त्या क्षणी मी तुझ्या प्रेमात पडले. ' यावर सलमानने खिल्ली उडवली, 'तुम्ही शाहरुख खानबद्दल बोलताय ना?'

महिलेने केले सलमानला प्रपोज : महिलेने संभाषण चालू ठेवत म्हटले, 'मी सलमान खानबद्दल बोलत आहे. तू माझ्याशी लग्न करशील का? 'या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना सलमान म्हणाला, 'माझे लग्न करण्याचे दिवस आता संपले आहेत. तू मला २० वर्षांपूर्वी भेटायला हवे होते.' आणि मग तो निघून गेला. व्हिडिओ शेअर होताच सोशल मीडिया यूजर्सनी कमेंट विभागात फार भरभरून कमेंट केली आहे. या व्हिडिओवर यूजर्सने प्रतिक्रिया टाकत म्हटले, 'सलमान, 'मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही पण मी तुला माझा फार्म हाऊस दाखवतो..!!' आणखी एका युजरने त्याच्या लूकवर कमेंट करत लिहिले, 'सलमान भाई को देखकर किक मूवी की याद आ गई (सलमान भावाचा हा लूक पाहिल्यानंतर मला किक चित्रपटाची आठवण झाली). आणखी एका युजरने लिहिले, 'कोणीही त्याच्या विनोदबुद्धीशी बरोबरी करू शकत नाही, 'तू शाहरुख खानबद्दल बोलत आहेस'? हाहा.' अशा कमेंट या पोस्टवर आल्या आहे.

टायगर 3 : सलमान खानच्या वर्कफ्रंट बोलायला गेले तर, सलमान हा कतरिना कैफ आणि इमरान हाश्मीसोबत टायगर 3 मध्ये दिसणार आहे. यशराज फिल्मचा स्पाय युनिव्हर्समधील हा पाचवा भाग आणि टायगर जिंदा हैचा सिक्वेल आहे. मनीष शर्मा दिग्दर्शित आणि आदित्य चोप्रा निर्मित, टायगर 3 या दिवाळीत सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा : Gulshan Devaya Birthday : फॅशन पदवीधर ते बॉलिवूड स्टार बनण्याचा गुलशन देवय्याचा प्रवास

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.