मुंबई - Raj Kumar Kohli passed away : दिग्गज चित्रपट निर्माते राज कुमार कोहली यांचे निधन झालं आहे. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी ते आंघोळीला गेले असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. बराचवेळ ते बाथरुम बाहेर न आल्यानं त्यांचा मुलगा अरमान कोहलीनं दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केल्यानंतर ते निपचीत पडल्याचं दिसून आलं. त्यानंतर अरमानने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. अरमानच्या जवळच्या मित्रांकडून समजलं की आज संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
-
Veteran film director Raj Kumar Kohli passed away in Mumbai today. He was 93 years old.
— ANI (@ANI) November 24, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Veteran film director Raj Kumar Kohli passed away in Mumbai today. He was 93 years old.
— ANI (@ANI) November 24, 2023Veteran film director Raj Kumar Kohli passed away in Mumbai today. He was 93 years old.
— ANI (@ANI) November 24, 2023
प्रसिद्ध अभिनेता अरमान कोहलीचे वडील असणाऱ्या राज कुमार कोहली यांनी पाच दशकापासून हिंदी सिनेजगतात सक्रिय राहून मोठं योगदान दिलंय. गेल्या काही काळापसून त्यांच्या प्रकृतीच्या तक्रारी सुरु झाल्या होत्या. त्यांच्या निधनामुळे हिंदी सिनेविश्वात शोक व्यक्त केला जात आहे.
चित्रपटसृष्टीत अनेक दर्जेदार मनोरंजक चित्रपट बनवण्यामध्ये राज कुमार कोहलींचं मोठं योगदान होतं. साठच्या दशकात त्यांनी मनोरंजन जगतात प्रवेश केला. सुरुवातीच्या काळात संघर्ष केल्यानंतर त्यांनी 1966 मध्ये धुला भाटी आणि 1970 मध्ये लुटेरा चित्रपटाचं दिग्दर्शन करुन प्रेक्षकांना निखळ आनंद दिला.
सत्तरच्या दशकात कहानी हम सब की, नागिण, मुकाबला, जानी दुश्मन सारख्या चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली. त्यानंतर बदले की आग, नौकरी बिवी का, राज तिलक, जीने नही दुंगा, इन्सानियत के दुश्मन, इंतेकाम, साजीश, बीस साल बाद, पती पत्नी और तवायफ या सारख्या लोकप्रिय चित्रपटांचं दिग्दर्शन त्यांनी केली. नव्वदच्या दशाकतही ते स्वस्थ बसले नाहीत व त्यांनी विरोधी, औलाद के दुश्मन, कहर, जानी दुश्मन एक अनोखी कहानी सारखे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. निर्माता म्हणूनही राज कुमार कोहली हिंदी सिने जगतात यशस्वी ठरले. त्यांनी गोरा और काला, लुटेरा या हिंदी चित्रपटासह डंका, मै जट्टी पंजाब दी, पिंद की कुऱ्ही, सपनी या पंजाबी भाषेतील चित्रटांची निर्मितीही केली.
हेही वाचा -
2. इसरा झाली इसामरा : गायकांच्या हक्क संघटनेत आता संगीतकारांचाही समावेश
2. अॅनिमलच्या ट्रेलरमध्ये रणबीर कपूर दिसतोय संजू बाबा; पाहा नेटिझन्सच्या प्रतिक्रिया