ETV Bharat / entertainment

फहाद फसिलने पत्नी नझारियासोबत साजरा केला वाढदिवस - खलनायक फहाद फासिल

फहाद फासिल 8 ऑगस्ट रोजी त्याचा 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसानिमित्त फहादने पत्नी नाझरिया नाझिमसोबत केक कापला. केक कटिंगचे फोटो फहादने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

फहाद फसिल
फहाद फसिल
author img

By

Published : Aug 8, 2022, 3:40 PM IST

हैदराबाद - मल्याळम फिल्म इंडस्ट्रीतील सर्वोत्कृष्ट कलाकार फहाद फासिल 8 ऑगस्ट रोजी त्याचा 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. फहादला 'पुष्पा - द राइज' या चित्रपटामुळे देशभर ओळख मिळाली. वाढदिवसानिमित्त फहादने पत्नी नाझरिया नाझिमसोबत केक कापला आणि सेलेब्रिशनला सुरुवात केली. केक कटिंगचे फोटो फहादने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

फहादने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंट इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये तो साध्या लूकमध्ये दिसत आहे आणि त्याच्यासोबत त्याची पत्नी नाझरिया उभी आहे. नाझरियाने डेनिम आणि ब्लॅक शर्ट घातला आहे आणि ती खूप सुंदर दिसत आहे.

एका फोटोत दोघे खूप जवळ आले आहेत आणि एकत्र केक कापत आहेत. नाझरिया नाझीम स्वतः मल्याळम अभिनेत्री आणि निर्माती आहेत. केरळमधील अलप्पुझा येथे जन्मलेल्या फहाद फासिलला 'पुष्पा - द राइज' या चित्रपटातील आयपीएस अधिकारी भंवर सिंह शेखावतच्या भूमिकेमुळे देशभर मोठी ओळख मिळाली आहे.

फहादने आपल्या वडिलांनी दिग्दर्शित केलेल्या 'कायथुम दुरथ' (2002) या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. फहादचा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर इतका मोठा फ्लॉप ठरला की तो अभिनय सोडून अमेरिकेला गेला होता.

तिथे तो पुढील शिक्षण घेत होता आणि चित्रपटही पाहत असे. एके दिवशी त्याने दिवंगत बॉलिवूड अभिनेता इरफान खानचा 'युं होता तो क्या होता' हा चित्रपट पाहिला. आणि तो इरफानच्या अभिनयाने इतका प्रभावित झाला की त्याने इरफानचे सर्व चित्रपट शोधले आणि पाहून टाकले.

यानंतर फहादने अमेरिकेतील आपला बिछाना गुंडाळला आणि घरी परतला. केरळमध्ये आल्यानंतर त्याने पुन्हा चित्रपट करायला सुरुवात केली. फहादने त्याच्या करिअरमध्ये आतापर्यंत जवळपास 50 चित्रपटांमध्ये काम केले आहे. 2018 मध्ये अभिनेत्याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता श्रेणीमध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

'सी यू सून', 'जोजी' आणि 'मालिक' या चित्रपटांमुळे त्याला हिंदी पट्ट्यातील प्रेक्षकांमध्ये चांगलीच ओळख मिळाली. फहद फासिलने गेल्या वर्षी 'पुष्पा' आणि या वर्षी रिलीज झालेल्या कमल हसनचा 'विक्रम' चित्रपटात चमकदार कामगिरी केली आहे.

हेही वाचा - 'ब्रह्मास्त्र' चित्रपटातील जबरदस्त गाणे 'देवा देवा' झाले लॉन्च!!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.