ETV Bharat / entertainment

Kajol deletes social media posts : 'कठीण परीक्षेचा सामना करत आहे' म्हणत, काजोलने घेतला सोशल मीडियावरुन संन्यास - she announces break from social media

काजोलने शुक्रवारी सोशल मीडियापासून ब्रेक घेण्याची घोषणा केली. तिने इंस्टाग्रामवर आयुष्यातील सर्वात कठीण परीक्षेला सामोरे जावे लागत असल्याचे लिहिले आहे. यामुळे चाहते चिंतेत असून काहीजणांनी ही आगामी वेब सिरीजच्या प्रमोशनसाठीची नौटंकी असल्याचे वाटत आहे.

Kajol deletes social media posts
काजोलने घेतला सोशल मीडियावरुन संन्यास
author img

By

Published : Jun 9, 2023, 3:14 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री काजोलने शुक्रवारी इंस्टाग्रामवर एक महत्त्वाची घोषणा केली आहे. इंस्टाग्रामवर 14.4 दशलक्ष फॉलोअर्सचा आनंद घेणार्‍या काजोलने सोशल मीडियातून ब्रेक घ्यायचा निर्णय घेतलाय. तिने आपल्या सोशल मीडियावरील सर्व पोस्ट हटवल्या आहेत. यामुळे काही हितचिंतक आणि फॉलोअर्स चिंतेत असून सोशल मीडियावर सक्रिय असले तरी यातील एका मोठ्या वर्गाला असे वाटतंय की आगामी मालिकेच्या प्रमोशनसाठी काजोलने केलेली ही नौटंकी आहे.

काजोलने तिच्या सोशल मीडियावरुन जाहीर केले की ती डिजिटल डिटॉक्सवर जात आहे. या घोषणेने सोशल मीडियावर वादळ निर्माण केले कारण तिने आयुष्यात खडतर प्रसंगातून जात असल्याचे लिहिलंय. 'माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एकाचा सामना करत आहे', असे लिहिलेली एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर करताना काजोलने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'सोशल मीडियापासून ब्रेक घेत आहे.'

अभिनेत्री काजोलने ट्विटर आणि फेसबुकवरुनही ब्रेक घेत असल्याचे म्हटलंय. ट्विटरवर तिचे 3.6 दशलक्ष आणि फेसबुकवर 28 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. तिने इंस्टाग्रामवरील सर्व पोस्ट हटवल्या असताना, तिच्या फेसबुक आणि ट्विटर हँडलमध्ये अजूनही जुन्या पोस्ट आहेत. काजोलच्या नवीन पोस्टने चाहत्यांना चिंता वाटते. तिने अशी पोस्ट लिहिण्यामागचे खरे कारण काय असेल यावर अनेकजण मंथन करत आहेत.

काजोलने सोशल मीडिया ब्रेकची घोषणा केल्यानंतर लगेचच, चाहत्यांनी तिला काळजी घेण्याचा सल्ला दिलाय. अशा प्रसंगी धीर धरण्याचा व आपण पाठीशी ठाम असल्याचेही काहीजण सांगताना दिसत आहेत. असे असले तरी काही नेटिझनला शंका आहे की काजोल तिच्या आगामी प्रोजेक्टच्या प्रमोशनचा भाग म्हणून सोशल मीडिया ग्रिडमधून जात आहे. इंस्टाग्रामवर एका युजरने लिहिलंय की, 'तिच्या आगामी ओटीटी मालिका, द गुड वाईफसाठी ही एक प्रमोशनल स्ट्रॅटेजी आहे.'

अनव्हर्स्डसाठी, काजोल द गुड वाईफमध्ये दिसणार आहे. ही मालिका हेच शीर्षक असलेल्या यूएस मालिकेचे भारतीय रूपांतर आहे. सुपरण वर्मा दिग्दर्शित आठ भागांची मालिका डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रीमियर होईल.

हेही वाचा -

१. Zhzb: पहिल्या विकेंडला 'जरा हटके जरा बचके'ची धमाकेदार कमाई, पाहा एकूण गल्ला

२. Miss World 2022 Karolina Bielawska : कॅरोलिना बिएलॉस्का म्हणते, 'भारताचा शोध घेण्यासाठी १ महिना पुरेसा नाही'

३. Akshay Kumars Omg 2 : ओटीटीवर नाही तर थिएटरमध्ये झळकणार ओएमजी २, अक्षय कुमारने जाहीर केली तारीख

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.