ETV Bharat / entertainment

Shanya bags role :बॉलिवूड डेब्यूपूर्वीच शनाया कपूरने पटकवला मोहनलालच्या पॅन इंडिया चित्रपटात रोल - Mohanlals pan India film Vrushabha

शनाया कपूरने करण जोहरच्या 'बेधडक'मध्ये अद्याप पदार्पण केलेले नाही. तोपर्यंत तिला मल्याळम सुपरस्टार मोहनलालसोबत भूमिका मिळाली आहे. 'वृषभ' असे शीर्षक असलेल्या या चित्रपटाचे शुटिंग पुढील महिन्यात सुरू होईल.

Shanya bags role
शनाया कपूर
author img

By

Published : Jul 15, 2023, 3:56 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता संजय कपूर आणि ज्वेलरी डिझायनर महीप कपूर यांची कन्या शनाया कपूर बॉलिवूड पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. ती करण जोहरच्या आगामी 'बेधडक' चित्रपटात काम करणार असल्याच्या बातम्या यापूर्वी झळकल्या होत्या. 'बेधडक' चित्रपटाचे शुटिंग सुरू होण्यापूर्वीच शनायाला मल्याळम सुपरस्टार मोहनलालसोबत आगामी पॅन इंडिया चित्रपट 'वृषभ'मध्ये रोल मिळाला आहे.

ट्रेड विश्लेषक तरण आदर्श यांनी शनाया कपूर मोहनलाल यांच्या आगामी 'वृषभ'मध्ये भूमिका करणार असल्याचे कळवले आहे. केवळ शनायाच नाही तर सलमा आगाची मुलगी झहरा एस खानदेखील या चित्रपटात काम करणार आहे. 'वृषभ' या चित्रपटाचे दिग्दर्शन नंदा किशोर करत आहेत. एपिक अ‍ॅक्शन एन्टरटेनर 'वृषभ' चित्रपटाच्या शुटिंगला पुढील महिन्यात सुरूवात होईल.

एकता कपूरच्या बालाजी टेलिफिल्म्सने कन्नेक्ट मीडिया आणि एव्हीएस स्टुडिओसोबत 'वृषभ' या बहुभाषिक चित्रपटाची निर्मिती करण्याचे ठरवले आहे. हा चित्रपट तेलुगु आणि मल्याळममध्ये शूट होणार असून कन्नड, तमिळ आणि हिंदी भाषेत रिलीज केला जाणार आहे. या चित्रपटाबद्दलचा अधिक तपशील अद्याप गुलदस्त्यात आहे. हा एक भावनाप्रधान आणि व्हिज्युअल इफेक्ट असलेला भव्य चित्रपट असणार असल्याचे सांगितले जाते. शनाया आणि झहरासह तेलुगु अभिनेता रोशन या चित्रपटात मोहनलालच्या मुलाची भूमिका करताना दिसणार आहे.

शनायाच्या बॉलिवूड पदार्पणाच्या 'बेधडक'चा विचार करता या चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक खेतान करत असून करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन बॅनरखाली बनत आहे. या चित्रपटाची घोषणा मार्च २०२२ मध्ये करण्यात आली होती, मात्र काही अडथळ्यामुळे हा चित्रपट अद्याप शुटिंग फ्लोअरवर गेलेला नाही. या चित्रपटासाठी शनायाने अनेक रिडींग सेशन्स व वर्कशॉप केली आहेत. 'बेधडक'मध्ये गुरफतेह पिरजादा आणि लक्ष्य मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. शनाया कपूरने अभिनयात पदार्पण केले नसले तरी तिला मिळत असलेली प्रसिद्धी लक्षणिय आहे. सोशल मीडियावर तिला प्रचंड फॉलोअर्स मिळाले असून ती फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून नेयमित संपर्कात असते.

हेही वाचा -

१. Saf Aftra Strike : ग्लोबल स्टार प्रियांका चोप्राने हॉलिवूड लेखकांच्या संपाचे केले समर्थन

२. Mi 7 Collection Day 3 : टॉम क्रूझ स्टारर 'मिशन इम्पॉसिबल ७' ची भारतात बाजी, जगभरात तुफान कमाई सुरूच

३. Rohit Shetty On Cirkus Failure : 'सर्कस'च्या अपयशाची रोहित शेट्टीने स्वीकारली जबाबदारी , केले धक्कादायक खुलासे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.