ETV Bharat / entertainment

Elvish Yadav rave party case : रेव्ह पार्टी प्रकरणी एल्विश यादवचा जबाब नोंद, गारुड्यांसमोर होणार चौकशी - एल्विशनं आरोप फेटाळून लावलेत

Elvish Yadav rave party case : रेव्ह पार्टी प्रकरणी एल्विश यादवनं मंगळवारी नोएडाच्या सेक्टर 20 पोलीस ठाण्यात आपला जबाब नोंदवला. बुधवारी पोलिसांनी एल्विशला पुन्हा चौकशीसाठी बोलावलं आहे. त्याच्यावर रेव्हा पार्टी आयोजित करणे, सापांची तस्करी करणे व साप बाळगणे असे गंभीर आरोप आहेत.

Elvish Yadav rave party case
Elvish Yadav rave party case
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 8, 2023, 1:48 PM IST

नवी दिल्ली/नोएडा: Elvish Yadav rave party case : प्रसिद्ध यूट्यूबर आणि बिग बॉस ओटीटी 2 विजेता एल्विश यादव याच्यावर रेव्ह पार्टी आयोजित करणे आणि सापाच्या विषाची तस्करी करण्याचा आरोप आहे. यासाठी त्याच्या विरोधात नोएडातील पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर नोंद करण्यात आलीय. यामध्ये आपला जवाब नोंदवण्यासाठी तो मंगळवारी सेक्टर 20 पोलिस स्टेशनमध्ये आला होता. याआधी नोएडा पोलिसांनी एल्विशला चौकशीसाठी नोटीस पाठवली होती. सुमारे तीन तास ही चौकशी चालली, यादरम्यान पोलिसांनी डझनभर प्रश्न त्याला विचारले. यानंतर एल्विशला जाण्याची परवानगी मिळाली. मात्र, बुधवारी एल्विशला पुन्हा पोलिस ठाण्यात बोलावून चौकशी केली जाणार आहे.

Elvish Yadav rave party case
पोलिसांनी विषारी सापंसह गारुड्यांना पकडले

एल्विश यादवनं मंगळवारी रात्री उशिरा सहकाऱ्यांसह सेक्टर 20 पोलिस स्टेशन गाठलं आणि त्याचा जबाब नोंदवला. पोलीस सूत्रांनी सांगितले की, कोणत्या ठिकाणी पार्ट्या आयोजित केल्या गेल्या, सापाचे विष देणे आणि विषारी साप बाळगणे यासंबंधीची सुमारे 15 ते 20 प्रश्न एल्विश यादवला विचारण्यात आले. पोलिस सूत्रांनी असेही सांगितले की, चौकशीदरम्यान एल्विश यादव खूप घाबरलेला दिसला. त्याला या प्रकरणात गोवले जात असल्याचे तो सांगत होता.

बुधवारी एल्विश यादव आणि गारुडी समोरासमोर बसवून चौकशी केली जाऊ शकते, असे सांगण्यात आले. याशिवाय पोलिसांना एल्विश यादवकडून आणखी काही प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची आहेत. या चौकशीनंतर गारुडी आणि एल्विश यादव किती वेळा संपर्कात आले आणि किती वेळा आणि कोणत्या ठिकाणी पार्ट्या झाल्या हे स्पष्ट होऊ शकेल. याआधीही अधिकाऱ्यांनी गारुड्यांचे जबाब नोंदवले आहेत. आता पोलीस सर्व जबाब जोडण्याचे आणि पडताळणी करण्याचा काम करणार आहेत.

एल्विशनं आपल्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावलेत. आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं त्यानं एक व्हिडिओ शेअर करुन कळवलं होतं. भाजपाच्या खासदार मेनका गांधी आपल्याला बदनाम करत असल्याचा व त्याच्या विरोधात मानहाणीचा खटला भरण्याचा विचारही त्यानं बोलून दाखवलाय. एल्विशवर आरोप झाल्यानंतर मनोरंजन जगतात एक प्रकारे खभळबळ माजली आहे.

हेही वाचा -

1. Janhvi Kapoor And Shikhar Pahariya : जान्हवी कपूरला शिखर पहारियानं म्हटलं, 'मी पूर्णपणे तुझा आहे'

2. Swara Bhasker Diwali : दिवाळीच्या आठवणीत रमली स्वरा भास्कर, शेअर केली उत्सवाची झलक

3. Diwali Party : चित्रपट निर्माते रमेश तौरानी यांच्या पार्टीत 'या' स्टार्सनं लावली हजेरी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.