ETV Bharat / entertainment

पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राला ईडीकडून क्लीनचीट

Raj Kundra : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राचा पॉर्नोग्राफी रॅकेटमध्ये कोणताही थेट संबंध नसल्याचं समोर आलं आहे. सध्या ईडीच्या रडारवर इंग्लंडस्थित कुंद्राच्या मेव्हण्याची कंपनी कॅनरीन आली आहे.

Raj Kundra
राज कुंद्रा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 7, 2023, 4:39 PM IST

मुंबई - Raj Kundra : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राबाबत एक बातमी समोर आली आहे. 2021 मध्ये मुंबई पोलिसांनी कथित पोर्नोग्राफी रॅकेटमध्ये राज कुंद्रा यांच्यावर आरोप केल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयानं (ED) मे 2022 मध्ये मनी लाँड्रिंगचा तपास सुरू केला होता. आता यासंदर्भात एक नवी अपडेट समोर आली आहे. ईडीला राज कुंद्रा यांचा पॉर्नोग्राफी रॅकेटमध्ये कोणताही थेट संबंध तसेच पुरावे सापडलेले नाहीत. सध्या ईडी याप्रकरणी पैशांच्या झालेल्या गैरव्यवहारांची चौकशी करत आहे. इंग्लंडस्थित कंपनी कॅनरीन आता ईडीच्या रडारवर आहे.

राज कुंद्रा केला होता आरोप : सुरुवातीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं दिलेल्या माहितीनुसार, राज कुंद्रा हा 'हॉटशॉट' नावाच्या ऍपचा मालक होता. या ऍपवर अश्लील व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आले होते. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर बॉलिवूड इंडस्ट्रीतील काही मॉडेलनं समोर येऊन राज कुंद्राच्या विरोधात स्टेटमेंट दिलं होतं. यानंतर राज कुंद्राला अटक करण्यात आली होती. राज जवळपास दोन महिने आर्थर रोड कारागृहात राहिला होता.

'हॉटशॉट ऍप'चं प्रकरण : आर्म्स प्राइम मीडिया लिमिटेड (APML) चे संस्थापक सौरभ कुशवाह यांनी राजला 2019 मध्ये त्यांच्या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितलं होतं. त्यानंतर राज फेब्रुवारी ते डिसेंबरपर्यंत त्या कंपनीचा एक भाग होते. यादरम्यान कंपनीने 'हॉटशॉट ऍप' तयार केले होते. यानंतर कॅनरीन कंपनीनं हे ऍप सुमारे 20 लाख रुपयांना विकत घेतले होते. फेब्रुवारी 2019 मध्ये, राज कुंद्रानं आर्म्स प्राइम मीडिया लिमिटेड नावाची कंपनी विकत घेतली आणि हॉटशॉट्स नावाचे ऍप विकसित केले. यूकेस्थित कॅनरीन कंपनीचे सीईओ प्रदीप बक्षी हे राज कुंद्राचे मेहुणे आहेत.

ईडीनं राज कुंद्रावर केला गुन्हा दाखल : 'हॉटशॉट्स ऍप' चालविण्यासाठी राज कुंद्राच्या विहान कंपनीनं कॅनरीन कंपनीशी करार केला होता. तसेच हे अ‍ॅप सुरू ठेवण्यासाठी विहान कंपनीच्या 13 बँक खात्यांमध्ये लाखो रुपयांचे व्यवहार झाल आहे. आता या प्रकरणी ईडी चौकशी करत आहे. 2021 मध्ये पॉर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्राला अटक झाली आणि त्यानंतर तो जामीनावर बाहेर आला होता, मात्र मे 2022 मध्ये ईडीनं राज कुंद्रा विरोधात फेमा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

हेही वाचा :

  1. 'अ‍ॅनिमल'चा जगभरात 500 कोटीचा टप्पा पार, देशांतर्गत झाली 300 कोटीची कमाई
  2. 'डंकी' ठरला सर्वाधिक पाहिला गेलेला हिंदी ट्रेलर, 'सालार'चाही मोडला विक्रम
  3. मुनावर फारुकीने मन्नारा चोप्राची मागितली माफी, विकी आणि अंकिताचं पुन्हा बिनसलं

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.